अलिबाग : प्रतिनिधी मागील आठवड्यात आलेल्या उधाणाच्या लाटांच्या मार्यामुळे अलिबाग समुद्र किनार्यावरील बंधारा उखडला गेला आहे. या बंधार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किनार्यावरील सेल्फी पॉईंटदेखील मोडला आहे. तीन दिवसांपासून समुद्राला मोठी भरती आली. उधाणाच्या भरतीचा अलिबाग किनारपट्टीवरील भागाला तडाखा बसला. भरतीच्यावेळी महाकाय लाटा किनार्यावर धडकत होत्या. ज्यामुळे अलिबाग समुद्र …
Read More »रोहा-पांगळोली येथे स्थानिक प्रशासनाकडून आढावा
अलिबाग ः रामप्रहर वृत्त रोहा तालुक्यातील पांगळोली येथील पशुपालकांनी पशूसंवर्धन विभागाला गावातील जनावरे मृत झाल्याचे कळविले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्देशानुसार मंगळवारी (दि. 19) प्रांताधिकारी विट्ठल इनामदार, उपायुक्त, जिल्हा पशूसंवर्धन डॉ. रत्नाकर काळे, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम, रोहा तहसीलदार कविता जाधव, …
Read More »पावसाळी हंगामात रानभाज्या बहरल्या
मुरूड : प्रतिनिधी दमदार पावसामुळे बाजारात रानभाज्या विक्रीसाठी आल्या असून औषधी गुणांमुळे खवय्यांची त्यास पसंती लाभत आहे. यातून कष्टकरी, आदिवासींना पावसाळी हंगामात रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे. कोकणाला मोठे वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती या प्रांतात आढळतात. याचबरोबर आरोग्यवर्धक रानभाज्या पावसाळ्यात उगवतात. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने खाल्या जातात. …
Read More »धोकादायक दरडींवर उपाययोजना आवश्यक
वरंध भोर आणि महाबळेश्वर या दोन्ही घाट मार्गात सातत्याने दरडी कोसळत असल्याने या दोन्ही घाटातील वाहतूक मंदावली आहे. त्यातच प्रशासनाने अवजड वाहतूक बंद केली आहे. भितीपोटी लहान वाहनचालकांनी या घाटाकडे पाठ फिरवली आहे. महाडकरांच्या यातना काही संपता संपत नाहीत तर यामुळे या मार्गावरील पावसाळी पर्यटनालादेखील फटका बसला आहे. मात्र पर्यटकांनाही …
Read More »प्लास्टिक कचर्याने गुरांचे आरोग्य धोक्यात
पाली : प्रतिनिधी सुधागड पालीतील मोकाट गुरे सध्या आपले खाद्य कचरा कुंड्या व डम्पिंग ग्राउंडवर शोधत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय स्वच्छतेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. पालीतील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधलीआळी, बल्लाळेश्वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर …
Read More »सार्वजनिक बांधकाम खात्याचा दिलासा
मुरूडच्या विहूर पुलावरील खड्डे बुजविले मुरूड : प्रतिनिधी संततधार पावसामुळे तालुक्यातील विहूर येथील छोट्या पुलावर आणि जोड रस्त्यांवर खड्डे पडले होते. या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्या बाबतचे वृत्त प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम खात्यास खडबडून जाग आली. खडी व रेंजगा टाकून येथील मोठमोठे खड्डे बुजविण्यात आले आहेत. …
Read More »पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा शेतीकामात व्यस्त
कर्जत : बातमीदार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात भात शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतकरी लावणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. कर्जत तालुक्यात सुमारे 9800 हेक्टर जमिनीवर भात शेती केली जाते. कर्जत तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षात प्रयोगशील शेती करू लागले असून भाताचे …
Read More »ताम्हाणी घाटात दरडीचा दगड एसटी बसवर कोसळला
माणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोरेगाव-माजलगाव एसटी बसवर ताम्हाणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत दरडीचा मोठा दगड पडल्याची घटना सोमवारी (दि. 18) सकाळी घडली. या दगडाचे तुकडे चालकाच्या समोरील काचेवर व उजव्या बाजूकडील प्रवासी काचेवर पडून नुकसान झाले. या बसमधून चालक-वाहक आणि 33 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने यापैकी …
Read More »पोलादपूर शहरामध्ये टँकरने दूषित पाणीपुरवठा
नगरपंचायतीच्या विरोधी गटनेत्याकडून आंदोलनाचा इशारा पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायत पोलादपूरकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील जयहनुमाननगर भागात टँकरद्वारे गढूळ तसेच अस्वच्छ पाणीपुरवठा होत असून, या पाण्याला उग्र वास येत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, नगरपंचायतीचे विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी शुध्द पाणी मिळेपर्यंत जयहनुमाननगरच्या ग्रामस्थांसोबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. …
Read More »रायगड जि.प.चे 133 पूल धोकादायक
दुरुस्तीसाठी हवेत 98 कोटी रुपये अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेले 133 पूल धोकादायक झाले आहेत. या पुलांच्या दुरुस्तीसाठी 98 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 133 पूल धोकादायक आहेत. तर स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात आलेल्या पुलांची संख्या …
Read More »