कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली गावाच्या मागे असलेला मातीच बंधारा सततच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून फुटून गेला आहे. गतवर्षी देखील या बंधार्याचे पाणी सांडव्याऐवजी अन्य भागातून बाहेर पडल्याने स्थानिक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. उमरोली गावाच्या मागे वन क्षेत्र जमिनीजवळ मातीचा बंधारा आहे. त्या बंधार्यात स्थानिक ग्रामस्थ गणेश विसर्जन करीत …
Read More »मुरूडमध्ये महावितरणकडून दुरूस्ती सुरू
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड बाजारपेठ येथील पाडगे डेअरीजवळ असणारा विद्युत पोल व नगर परिषदेची पाण्याची टाकी येथे असणारा पोल नादुरूस्त झाल्याने नागरिकांसाठी धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने घेऊन दुरूस्ती काम …
Read More »निजामपुरात घरफोडी; पाच हजारांची रक्कम लंपास
आणखी पाचघरे फोडली माणगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील निजामपूर गावातील शिर्की आळीत अज्ञात चोरट्याने घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरली, तसेच अन्य पाच लोकांचे गोडाऊनच्या घराचा कडीकोयंढा तोडून चोरी केली. याबाबतची फिर्याद जनार्दन दगडू मोरे रा.निजामपूर शिर्की आळी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादी जनार्दन मोरे यांच्या घराच्या …
Read More »सततच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान
अनेक ठिकाणी रोपे कुजली; शेतकरी हवालदिल कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या कडेला असलेल्या भागातील शेतीमध्ये सलग पाच-सहा दिवस पाणी साचून राहिले आणि त्यामुळे रोपे कुजली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या संकटात भर पडली आहे. मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दुबार …
Read More »कर्जत येथे जिल्हा कॅरम निवड चाचणी स्पर्धा
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी कार्यवाह स्व. नथुराम पाटील यांच्या स्मरणार्थ 23 व 24 जुलै रोजी जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे कर्जत दहिवली येथील भवनात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष …
Read More »रोहा तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीची प्रात्यक्षिके
रोहे : प्रतिनिधी यांत्रिकी पध्दतीने भात लागवड फायदेशीर असून त्याची प्रात्यक्षिके रोहा तालुक्यात घेण्यात आली आहेत. या यांत्रिकी पध्दतीच्या भात लागवडीचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे. मजूरांचा तुटवडा व त्यामुळे घटत चाललेले भात क्षेत्र यावर उपाय म्हणून यांत्रिक पध्दतीने भात लागवड करणे …
Read More »बाईक रॅलीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत
43 स्थानकांना भेटी व 1665 किमीची मजल कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाने 1 जुलैपासून विविध स्थानकांवर ’आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांमध्ये बाइक रॅली सुरू झाल्या आहेत. बाईक रॅलींनी मध्य रेल्वेवरील एकूण 1665 किमी …
Read More »रेवस-आवरे पोर्टसाठी घेण्यात आलेल्या जमिनी परत करा
भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधी रेवस-आवरे पोर्ट प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनी पून्हा मूळ शेतकर्यांच्या नावे करण्याची मागणी भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून केली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी …
Read More »पेणमध्ये 12 लाखांच्या दागिन्यांची चोरी
चार तासात आरोपी जेरबंद पेण ़: प्रतिनिधी पेण खाटीक आळी येथील सुवर्ण कारागिराच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पेण पोलिसांनी पनवेलमधून दोन जणांना अटक केली आहे. सुमन विरेंद्र बेरा (वय 26) यांचा पेण खाटीक मोहल्ल्यात सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. …
Read More »धेरंड गावात घुसले उधाणाचे पाणी
अनेक घरांतील सामानाचे नुकसान अलिबाग : प्रतिनिधी दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे गुरुवारी (दि. 14) अलिबाग तालुक्यातील धेरंड गावतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले. गुरुवारी समुद्राला मोठी भरती आली. खरबंदिस्ती फुटली असल्यामुळे उधाणाचे पाणी धेरंड गावात शिरू लागले. त्यामुळे गावकर्यांची तारांबळ उडाली. उधाणाचे पाणी काही घरांमध्ये घुसले. या घरांमधील …
Read More »