Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महाड नगरपालिकेची शहरातील अतिक्रमणावर कारवाई

महाड ः प्रतिनिधी महाड शहरात अतिक्रमणाविरोधी कारवाईला पालिका प्रशासनाने सुरू केली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकामध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात असताना काही दुकानांच्या वाढीव पत्र्याच्या शेड तोडण्यात आल्या आणि काहींना अभय देण्यात आले. याबाबत चौकशी केली असता, माजी नगरसेवक सुनील कविस्कर यांनी …

Read More »

इंदापूर बाजारपेठेत भरधाव ट्रकची घरे, दुकानांना धडक

अज्ञात ट्रकचालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेत रस्त्यालगत असणार्‍या घरांना व दुकानांना  भरधाव ट्रकची धडक लागली. हा अपघात बुधवारी (दि. 22) रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद चिमणलाल भोगिलाल मेहता (वय 79) रा. इंदापूर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल …

Read More »

पोलादपुरातील पुनर्वसन संकुलांची दूरवस्था

 दुरुस्ती झाल्यानंतरच ताबा घेण्याची दरडग्रस्तांची भूमिका पोलादपूर : प्रतिनिधी अतिवृष्टी, महापूर आणि दरडग्रस्तांना देण्यात पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथील पुनर्वसन संकुलांची दुरवस्था सुरू आहे. या पुनर्वसन संकुलांमध्ये वास्तव्यासाठी जाण्यास दोन्ही गावांतील दरडग्रस्त उत्सुक नसल्याचे लॉटरीनंतर दिसून आले आहे. पोलादपूर तालुक्यातील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. …

Read More »

पोलादपुरातील शेतीबाबत बळीराजापुढे यक्षप्रश्न

देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्‍याच अन्नघटकांचा पुरवठा या भागातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या विशेषत: सुधारित भात …

Read More »

पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

महाड : प्रतिनिधी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 349 वी पुण्यतिथी पाचाड येथे साजरी बुधवारी (दि. 22) करण्यात आली. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त वतीने या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाचाड येथे असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी बुधवारी तिथीप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरमधील  रसायन रस्त्याकडेला सांडून नुकसान झाले आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रांमधील विनाती ऑर्गानिक या कंपनीतून रसायन घेऊन मुंबई दिशेने जाणार्‍या टँकरला बुधवारी मोहरे येथील वळणावर अपघात झाला. त्यामुळे टँकरमधून …

Read More »

रोहा तालुक्यात 70 टक्के पेरण्या पूर्ण; बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

रोहे : प्रतिनिधी तालुक्यात खरीप हंगामाची तयारी पुर्ण होत असताना पाऊस मात्र खोळंबला आहे. रोहा तालुक्यात आतापर्यंत सुमारे 70 टक्के पेरण्या झाल्या असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. भात पिकासाठी रोहा तालुका ओळखला जातो.तालुक्यात या वर्षी 9850 हेक्टर क्षेत्रावर भातशेती अपेक्षित आहे. भात बियाणे, खतांची व्यवस्था सुरुळीत सुरू असून औषधेही उपलब्ध …

Read More »

रोह्यात होणार यांत्रिक पद्धतीने भात लागवड

रोहे : प्रतिनिधी मजूरांची टंचाई पहाता यापुढे रोहा तालुक्यात यांत्रिक पध्दतीने भात लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने रोहा तालुक्यात ठिकठिकाणी यांत्रिक पध्दतीने भातलागवड प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीतील कामे अत्यंत सुलभ व्हावी, या दृष्टीने अनेक अवजारे शेतीच्या कामात उपयुक्त व्होवू लागली आहेत.नांगरणी, फवरणीसह अन्य कामे यांत्रिकी …

Read More »

गौरकामत शाळेतील पाणी योजनेचे लोकार्पण; कर्जत ग्रामीण ‘रोटरी’चा उपक्रम

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कर्जत : बातमीदार ग्रामीण रोटरी क्लब या संस्थेने कर्जत तालुक्यातील गौरकामत येथील शाळेसाठी पाणीपुरवठा योजना राबविली असून, या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी या भागातील पाच जिल्हा परिषद शाळांना संस्थे तर्फे संगणक वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ देवनार शाखेच्या वतीने कर्जत ग्रामीण …

Read More »

रायगडकरांना 44 कोटींचा चुना, दीड वर्षात फसवणुकीचे 224 गुन्हे

खोपोली : प्रतिनिधी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीचा व्यवहारात उपयोग न केल्याने, रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी  गेल्या दिड वर्षात दोनशे चोवीस फसवणुकीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात 44 कोटी रुपये गमावले आहेत. रायगड जिल्ह्यात सन 2021 पासून जून 2022 पर्यंत 224 फसवणूक, अपहाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात नागरिकांची 44 कोटी रूपयांची फसवणूक …

Read More »