Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत, खालापूर तालुक्यातील पर्यटनस्थळे परिसरात जमावबंदी

अलिबाग : प्रतिनिधी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.  त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता खालापूर तालुक्यातील धामणी कातकरवाडी तलाव, बोरगाव धबधबा, पोखरवाडी बंधारा-बोरगाव, झेनिथ धबधबा …

Read More »

कर्जत तालुक्यातील भाकरीपाडा शाळेत डिजिटल क्लासरूम

कर्जत : बातमीदार सामजिक क्षेत्रात काम करणार्‍या थिंकशार्प फाउंडेशनकडून कर्जत तालुक्यातील भाकरीपाडा येथील प्राथमिक शाळेसाठी डिजिटल क्लासरूम आणि स्टडीमॉल साहित्य भेट देण्यात आले. भाकरीपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या  शाळा भाकरीचापाडा येथील प्राथमिक शाळेला थींकशार्प फाउंडेशन या संस्थेने डिजिटल क्लासरुम, प्रोजेक्टर आणि स्टडीमॉल साहित्य भेट दिलेे. फाउंडेशनचे प्रमुख अमित कोतुळ आणि …

Read More »

रोह्यात मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला

रोहे : प्रतिनिधी तालुक्यात उशीरा का होईना गुरुवारपासून दमदार पावसाने सुरूवात केल्यानंतर शुक्रवारी (दि. 1) मुसळधार पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने कोसळण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले होते. कृषीदिनी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रोहा तालुक्यातील शेतकरी सुखावले आहेत. रोह्यातील बळीराजा पावसाची वाट पाहत असताना शुक्रवारी वरुणराजाने जोरदार …

Read More »

शेतीत आपत्कालीन व्यवस्थापन करण्याची आवश्यकता

उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांचे प्रतिपादन; रोहा किल्ला येथे कृषी दिन साजरा रोहे : प्रतिनिधी शेतीत येणार्‍या विविध अडचणींवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतीत आपत्कालीन व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन रोहा उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी शुक्रवारी (दि. 1) येथे केले.  कृषी संजीवनी सप्ताह समारोप व कृषी दिनानिमित्त  …

Read More »

जांभूळपाडा केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पाली : रामप्रहर वृत्त फॅन्ड्री फाउंडेशन तर्फे सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा केंद्रातील नऊ शाळांमधील सर्व गरीब, गरजू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. फँड्री फाउंडेशनच्या आशा चिमनकर, विनायक खांडेकर, लक्ष्मण पवार, सत्यवान वाघमोडे, स्वप्नील कूवर, आनंदा पाटील व इतर स्वयंसेवक तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी या …

Read More »

मुरूड व्यापारी असोसिशनकडून अपघातग्रस्त युवकाला आर्थिक मदत

मुरूड : प्रतिनिधी अपघातात जखमी झालेल्या माथाडी कामगाराला वैद्यकीय उपचारासाठी मुरूड व्यापारी असोसिएशनने आर्थिक मदत केली आहे. मुरूड व्यापारी असोसिएशनमध्ये 200 सदस्य आहेत. 50 वर्षे जुनी असलेली ही संस्था सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असते. मुरूड भांडारवाडा येथील रुक्षन भोसले हे गेली अनेक वर्षे येथील बाजारपेठेत हमालीचे काम करतात. अंगावर कपाट …

Read More »

जि. प.च्या वृक्षलागवड कार्यक्रमास प्रारंभ

जिल्हाभरात लावण्यात येणार सहा लाख 41 हजार 600 झाडे अलिबाग : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 1) अलिबागमध्ये वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी शहरातील कुंटेबाग व वरसोली समुद्रकिनारी विविध प्रजातींच्या …

Read More »

कर्जत तालुका नागरी सहकारी सोसायटीची 30 वर्षांनी निवडणूक

12 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात कर्जत : बातमीदार तालुक्यातील 20 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कर्जत तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी गुरुवारी (दि. 30) मतदान घेण्यात आले. दरम्यान, या सहकारी पतसंस्थेच्या 12 संचालक पदासाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. तब्ब्ल 30 वर्षांनी कर्जत नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुकीमध्ये मतदान होत आहे.   कर्जत …

Read More »

कर्जत रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

अनेक गुन्ह्यांची केली उकल कर्जत : बातमीदार कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजवर झालेल्या छोट्या मोठ्या गुन्ह्यांची उकल जलद गतीने करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी या गुन्ह्यांचा छडा लावल्याने त्यांचे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत दीपक शेखर रेड्डी हा संशयास्पदरित्या फिरताना …

Read More »

आमच्यामुळेच अनंत गीते यांची ओळख -आमदार भरत गोगावले

महाडमध्ये गोगावले समर्थकांचे शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका महाड : प्रतिनिधी आमदार भरत गोगावले यांना समर्थन देण्यासाठी  महाडमध्ये गुरुवारी (दि. 30) शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी आमदार गोगावले यांनी ऑनलाइन संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी खासदार अनंत गीते यांच्यावर जहरी टीका केली. आमच्यामुळेच गीते यांची ओळख असल्याचे भरत गोगावले यांनी …

Read More »