खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील टाटा सायमाळजवळ सोमवारी (दि. 17) लोणावळा येथून खोपोलीत नो एन्ट्रीमधून येणार्या टेम्पोची धडक युनोव्हा गाडीला बसली. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. या अपघातात अक्षय ओझा, हेमंत पाटोळे, श्रावणी शेंडे, निखिल धांदडे, कार्तिक सहरे, मधू कवरे, अश्विनी चापले, राहुल चापले, रिवान चापले, …
Read More »सांगडे येथे 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
पनवेल : वार्ताहर 21 वर्षीय तरुणीने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सांगडे येथे घडली आहे. हर्षदा गावंड (वय 21, रा. दूरशेत, पेण) असे तिचे नाव आहे. हर्षदाने अज्ञात कारणावरून ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास लावला. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. …
Read More »कर्जतच्या घरपट्टीचा घोळ न्यायालयीन मार्गाने मिटेल!
काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये घरपट्टीबाबत मोठे आंदोलन करण्यात आले व घरपट्टी वाढ कमी झाली आहे. असे जाहीर करून ते थांबले. हे आंदोलन संपल्यावर मुख्याधिकारी यांनी जे पत्र दिले त्यावरून असे लक्षात आले होते की एक रुपयादेखील घरपट्टी कमी झालेली नाही फक्त तेव्हाचे मरण आज आले. उलट घरपट्टी वाढीमध्ये ज्या बिलामध्ये दुरुस्ती …
Read More »पेणमधील जिते येथे विद्युत उपकेंद्राची उभारणी
नागरिक, गणेशमूर्ती कारखान्यांना होणार सुरळीत वीजपुरवठा आमदार रविशेठ पाटील व वैकुंठ पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी पेणचे आमदार रविशेठ पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खरोशी विभागातील गावांना भेडसावणार्या विजेच्या समस्येवर जिते येथे 25 हजार के.वी. क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या …
Read More »खालापुरात पर्यटकाकडून हवेत गोळीबार
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील बोरगाव सोंडेवाडी येथे वर्षापर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्या पर्यटकावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. बदलापूर येथे राहणारा अमित गुरुनाथ मोरे मित्रांसह सोंडेवाडी धबधब्यावर आला …
Read More »ताम्र धातूवरील आकर्षक मिनाकारी व शिल्पकला
ताम्र धातूवरील आकर्षक मिनाकारी व शिल्पकला भारतात शेकडो वर्षांपासून आहे. आधुनिकतेच्या काळात ही कला लोप होण्याच्या मार्गावर असताना अलिबाग तालुक्यातील भायमळा या गावात संजय पाटील व त्यांचा मुलगा विक्रांत पाटील हे पिता-पुत्र ही प्राचीन कला जोपासण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे देशी-परदेशी नागरिक येथे येऊन ही कला जाणून घेत आहेत. …
Read More »दुर्गम गावात अन्नधान्याची तजवीज
पावसाळ्यात पुरेल इतके धान्य प्रशासनाकडून उपलब्ध अलिबाग : प्रतिनिधी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दुर्गम गावातील नागरिकांची अन्नधान्याअभावी आबाळ होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने गावातील कुटुंबांना सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल इतके धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन हजार क्विंटल गहू आणि पाच हजार क्विंटल तांदळाचा पुरवठा करण्यात आला आहे. दुर्गम डोंगराळ भागात …
Read More »माणगाव बसस्थानकात खड्डे व चिखलातून प्रवाशांची पायपीट
माणगाव ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे असणार्या माणगाव बसस्थानकात गेले अनेक दिवस प्रवाशांना खड्डे व चिखलातून पायपीट करावी लागत आहे. याबाबत युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी पाठपुरावा करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून निधी उपलब्ध करून घेतला होता. बसस्थानकातील काँक्रीटीकरणासाठी …
Read More »सराईत घरफोडी करणारे चोरटे जेरबंद
10 तोळे सोने व कार जप्त; राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंगमध्ये घुसून घरफोडी करणार्या सांगली येथील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले 10 तोळे सोन्याचे दागिने आणि …
Read More »साजगाव येथील कारखान्यात वायूगळती; तीन कामगार रुग्णालयात
खोपोली : प्रतिनिधी खालापुरातील साजगांव औद्योगिक वसाहतीतील युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेटमधील फिनोजल कंपनीत केमिकलमध्ये वायूगळतीमुळे तीन कामगार गुदमरल्याची घटना गुरूवारी (दि. 13)सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सहाय्यक पोलीस निरिक्षक हरेश काळसेकर, केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांच्या समवेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून एका कामगाराची परिस्थिती चिंताजनक असल्याने …
Read More »