वर्षभरात सहा हजार 427 अधिक लोकांवर हल्ले अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात भटक्या श्वानांनी वर्षभरात सहा हजार 427 अधिक लोकांवर हल्ले केले आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 82 जणांना श्वानदंश होत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. कुत्र्यांमुळे होणार्या अपघातांचे …
Read More »नेरळमध्ये एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री नेरळ बाजार पेठेतील एक मोबाईल शॉप, किराणा दुकान व चप्पलचे दुकान फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेरळमध्ये या आधीही एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या झाल्या होत्या. …
Read More »घरोघरी केंद्र सरकारच्या योजना पोहचवा भाजप नेते वैकुंठ पाटील यांचे आवाहन
पेण तालुक्यात मोदी @ 9 अभियान पेण : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यात मोदी ऽ 9 अभियानांतर्गत घर घर चलो मोहीम हमरापूर विभागातील उर्नोली येथून सुरू करण्यात आली. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी सोनखार येथे बोलताना केले. मोदी 9 घर घर चलो अभियानाला …
Read More »रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट
अलिबाग : प्रतिनिधी हवामान विभागाकडून 6 जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील दरडग्रस्त, पूरप्रवण, खाडीलगत सखल भागात राहणार्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. …
Read More »शेतकर्यांची ई-केवायसी करण्यात कोकणात रायगड जिल्हा अव्वल
अलिबाग : प्रतिनीधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत शेतकर्यांना देण्यात येणार्या अनुदानासाठी रायगड जिल्ह्यातील 93 टक्के शेतकर्यांचे ई-केवायसी करण्यात आले आहे. या योजनेसाठी शेतकर्यांची ई-केवायसी करण्यात कोकणात रायगड जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019पासून पीएम किसान योजना सुरू केली. सातबारा असलेल्या पात्र शेतकर्यांना वार्षिक सहा …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवनेरी बसला अपघात; सात जण जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ढेकू गावाच्या हद्दीत शिवनेरी बसने ट्रकला मागून धडक दिल्याने चालक व सहा प्रवासी असे सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. 4) रात्री 11.30च्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार शिवनेरी बस (एमएच 12-व्हीएफ 3924)वरील चालक विकास लाड (वय 40, …
Read More »लाच स्वीकारताना महिला तलाठीला रंगेहाथ पकडले
अलिबाग : प्रतिनिधी वडीलोपार्जित मिळकतीच्या सातबारा उतार्यावर वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अलिबाग तालुक्यातील बामणोलीच्या महिला तलाठीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पल्लवी यशवंत भोईर (वय 39) लाचखोर तलाठीचे नाव आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पल्लवी यशवंत भोईर यांची खंडाळा …
Read More »खोपोली सिटी बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य
बसचालकांसह विद्यार्थ्यांना होतोय त्रास खोपोली ः प्रतिनिधी नगर परिषदेच्या सिटी बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बस आदळत आहेत. सिटीबस सेवा ठेकेदार पद्धतीने सुरू असल्याने बसस्थानकातील खड्डे ठेकेदार की, नगर परिषद याबाबत साशंकता असल्याले खड्ड्यांचा त्रास मात्र सामान्यांना सहन करावा लागत आहे. राज्यातील एकमेव खोपोली …
Read More »खोपोलीतील शैक्षणिक समस्यांबद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली मुख्याधिकार्यांची भेट
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खोपोलीतील नगर परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात शुक्रवारी (दि. 30) मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांची घेतली भेट घेतली. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात; अन्यथा येणार्या पावसाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात येईल, असे …
Read More »रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर
केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी 125 कोटींचा निधी मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन 125 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या माध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे …
Read More »