Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कोरोना काळात गरजूंना अन्नदान

पेण येथील तरूणांचा स्तुत्य उपक्रम पेण : प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वसामान्य कुटुंबांची वाताहात झाली आहे. काहींना एका वेळचे जेवणही मिळेनासे झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेणमधील काही तरूणांनी एकत्र येऊन अन्नदानासारखा उपक्रम हाती घेतला आहे. पेणमधील अच्युत पाटील, राहुल शहाणे, आनंत बारमुख, आदित्य टेमघरे, मनिष कुंभार या मित्रांनी एकत्र येऊन पेणमधील बालाजी …

Read More »

‘पेणमध्ये कोविड रुग्णालय उभारणार’

साई सहारा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पेण : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पेणमध्ये लवकरात लवकर 200 खाटांचे हॉस्पिटल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सोमवारी (दि. 19) येथे दिली. साई सहारा प्रतिष्ठानच्या नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले, त्यावेळी …

Read More »

पेणमध्ये पतीकडून पत्नीची भररस्त्यात हत्या

पेण : प्रतिनिधीपत्नी नांदायला येत नाही म्हणून तिची पतीने भररस्त्यात चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 19) पेण तालुक्यातील नवेगाव आदिवासीवाडीजवळ घडली. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कविता दिनेश पवार (22) व तिची बहिण या दोघी सोमवारी दुपारी 3च्या …

Read More »

कर्जत डिकसळ येथील शिबिरात 36 जणांचे रक्तदान

कर्जत : बातमीदार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शांतीदूत मंडळ, रमाबाई महिला मंडळ आणि राज्य रक्त संक्रमण परिषद उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 18) कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 36 जणांनी रक्तदान केले. डिकसळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात …

Read More »

पीपीई किट घालून ‘त्याने’ पार्थिव स्मशानापर्यंत नेले

कर्जत : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान रात्री बाराच्या सुमारास मृत्यू झाला. रुग्णवाहिका असूनही त्या रुग्णाच्या पार्थिवाला स्मशानापर्यंत नेण्यासाठी चालक मिळत नव्हता. त्यावेळी क्षणाचाही विचार न करता कर्जतचे माजी उप नगराध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी पीपीई किट घालून पार्थिव स्मशानापर्यंत नेले व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. गणपत निकाळजे …

Read More »

मुरूड तालुक्यामध्ये लसीकरण केंद्रांत वाढ करण्याची मागणी

मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे रूग्णालयाचा परिसर कमी पडू लागला आहे. तसेच कोरोनाविषयक नियमाचा भंग होताना दिसत आहे. परिणामी संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी शहरातील कुलसुम बेगम हॉस्पिटल किंवा पटांगण तसेच तालुक्यातील  आगरदांडा व नादगांव …

Read More »

विनाकारण फिरणार्‍यांना दणका; रेवदंडा पोलिसांची कारवाई; दंड वसूल

रेवदंडा : प्रतिनिधी वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 19) सकाळी रस्त्यावर विनाकारण गर्दी करणार्‍या दुचाकीस्वार, पादचारी, व चारचाकी वाहनांच्या विरोधात रेवदंडा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. चौलनाक्यावरील चेकपॉईंटवर त्यांना अडवून त्यांच्याकडून दंडवसुली केली. चौलनाक्यावरील चेकपॉईंट परिसरात नाकाबंदी करुन रेवदंडा पोलिसांनी सोमवारी प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली. तसेच मास्क नसलेल्यांनासुद्धा हटकले. पोलिसांच्या या …

Read More »

जत्रांवर कोरोनाचे सावट; सलग दुसर्‍या वर्षी आनंदावर विरजण

माणगाव : प्रतिनिधी कोरोना महमारीचे संकट कायम असल्याने राज्यात  लॉकडाऊन, कडक निर्बंध, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही गावोगावी होणारे चैत्र पौर्णिमेचे कार्यक्रम, जत्रा, पालखी सोहळे होणार नसल्याने आबालवृद्धांच्या आनंदावर विरजण पडले आहे. कोकणात विशेष आकर्षण असलेल्या ग्रामदैवतांच्या यात्रा चैत्र पौर्णिमेपासून सुरू होतात. यावर्षी 27 एप्रिल रोजी …

Read More »

माणगाव, इंदापुरात विनामास्क, अनावश्यक फिरणार्‍यांवर कारवाई

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातही दरदिवशी सरासरी 35 कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष घातले असून, तालुक्यातील माणगाव आणि इंदापूर बाजारपेठेत सोमवारी (दि. 19) विनामास्क व गरज नसताना फिरणार्‍या 126 इसमांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 26 हजार 100 रुपये  दंड वसूल करण्यात आला …

Read More »

खोपोली बाजारात गर्दीचा महापूर; तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर नागरिक रस्त्यावर

खोपोली : प्रतिनिधी  तीन दिवसांचा झालेला जनता कर्फ्यु व त्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने मंगळवारी (दि. 20) खोपोली बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीने सोशल डिस्टन्सिंग व कोविड नियमांचा फज्जा उडविला. त्यामुळे तीन दिवसीय जनता कर्फ्युवर पाणी फेरल्याचे चित्र निर्माण झाले होते. जनता कर्फ्युमुळे खोपोली बाजारपेठ तीन दिवस …

Read More »