Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने मुरूड तालुका यंदा होणार टँकरमुक्त

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचघर, फणसाड, विहूर आणि आंबोली या धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे यंदा मुरूड तालुका टँकरमुक्त होण्याचे आशादायी चित्र दिसत आहे. गारंबी व सवतकडा या योजनांसह आंबोली धरणातून मुरुडसह पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. गारंबी व सवतकडा पाणी योजनेतून गुरुत्व पध्दतीने पिण्याचे पाणी पुरवले जाते तर आंबोली धरणातून …

Read More »

पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यालगतच्या महाकाय वृक्षांमुळे पावसाळ्यात धोका

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष पोलादपूर : प्रतिनिधी येथील पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दूतर्फा महाकाय वृक्ष आहेत. ते वादळवार्‍याने कोसळल्यास पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्यासह छोट्या हातगाड्या आणि टपरीव्यावसायिकांच्या जिवीताला तसेच मालमत्तेला धोका निर्माण होणार आहे. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दूर्लक्ष केले जात आहे. निसर्ग चक्रीवादळात पोलादपूर – …

Read More »

पेणच्या इनडोअर गेम हॉलमध्ये लसीकरण केंद्र

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा पुढाकार पेण : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची संख्या वाढत असून, येथेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे लसीकरणाला येणार्‍या रुग्णांना संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून, शहरातील इनडोअर गेम हॉल लसीकरणासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी दिली. …

Read More »

पाली, वावळोली सेंटरला सोयीसुविधा उपलब्ध करून देणार

आमदार रविशेठ पाटील यांचे आश्वासन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वावळोली कोविड केअर सेंटरला सोमवारी (दि. 19) आमदार रविशेठ पाटील यांनी भेट दिली. या दोन्ही ठिकाणी योग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी या वेळी दिले. आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी सुधागड तालुक्याचा …

Read More »

रेल्वे कर्मचार्‍याने वाचविले चिमुकल्याचे प्राण

वांगणी स्थानकावर थरार कर्जत ः बातमीदारपॉईंटमन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. वांगणी रेल्वेस्थानकात शनिवारी (दि. 17) ही घटना घडली. काळजाचा ठोका चुकवणारा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.वांगणी रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी 5च्या सुमारास मुलासह चालत होती. चालता …

Read More »

बनावट सोनेप्रकरणी आंतरराज्य टोळी जेरबंद

एका महिलेसह चौघांना बेड्या; 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत अलिबाग ः प्रतिनिधीसोन्याचे शिक्के देतो असे सांगून चक्क पितळेचे शिक्के देत गंडा घालणार्‍या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. यात चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे.प्रभूभाई गुलशनभाई सोलंकी ऊर्फ कल्पेश …

Read More »

लॉकडाऊनमुळे माठविक्रेतेही संकटात; वाढत्या कोरोनामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ

उरण : वार्ताहर दरवर्षी उन्हाळ्याची चाहूललागताच गार पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या माठाची मागणी वाढते. यामुळे माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहिसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते, मात्र कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यामुळे माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. एप्रिल महिना सुरू झाला …

Read More »

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात जिल्ह्यात अग्रेसर

खालापूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात अग्रस्थानी असून, या आरोग्य केंद्राने आत्तापर्यंत एक हजार 800 च्यावर 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करून कोविड विषाणूपासून भयमुक्त केले आहे. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी अनिल शहा, त्यांचे सहाय्यक अधिकारी तसेच संगिता चव्हाण, भगत इत्यादी कर्मचारी कोविड लसीकरण करण्यात …

Read More »

अलिबागमध्ये आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुरुड : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअर या संस्थेने नुकतेच झूमवर ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म‘ हा आहारावरील व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आहारतज्ज्ञ रंजना तत्ववादी यांनी समतोल आहार व मधुमेही व्यक्तींसाठीचा आहार या विषयावर व्याख्यान दिले, तर आहारतज्ज्ञ डॉ. भक्ती फफे पाटील यांनी हृदयविकार व उच्च …

Read More »

कर्जतमधील भाजी विक्रेते बाजारपेठेतून पोलीस मैदानात

कर्जत : प्रतिनिधी भाजीपाला घेण्यासाठी कर्जत बाजारपेठेत होणार्‍या गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने येथील भाजी व फळे तसेच अन्य विक्रेत्यांना सोमवार (दि. 19) पासून शहरातील पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे  बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे. कर्जत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भाजी व फळ विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बसतात. …

Read More »