Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलादपूर तालुक्यामधील परसुले गावातील प्राथमिक शाळेची इमारत पुन्हा उद्ध्वस्त

पोलादपूर : प्रतिनिधी  निसर्ग चक्रीवादळात छप्परावरील कौले उडालेली  पोलादपूर तालुक्यातील परसुले गावामधील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर मंगळवारी (दि. 4) संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये ही शाळा पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाली आहे. पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळीवारा व पावसामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर तसेच इमारतींवर कोसळल्या. शहरात पावसाचे काही …

Read More »

जिल्हा शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची तातडीने भरती करा; भाजपची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात नर्सेस भरतीला सुरूवात झाली आहे. येथील स्वच्छतेची समस्या  पाहता चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याचीदेखील  तातडीने भारती करा, अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्याकडे केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षीत नर्सेस भरतील सुरुवात झाली आहे. …

Read More »

खावटीची घोषणा कागदावरच; सुधागडातील आदिवासी अनुदानाच्या प्रतीक्षेत

पाली : प्रतिनिधी दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी, कातकरी समाज बांधवांना राज्य शासनाकडून खावटी अनुदान स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र आजतागायत ही मदत आमच्या बँक खात्यात जमा झालीच नाही, अशी ओरड सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांतून होताना दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार …

Read More »

आक्षी येथील शिलालेखाचे संवर्धन व्हावे

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील आक्षी येथील शिलालेख हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. मात्र इतिहासाच्या या अमुल्य ठेव्याच्या नशिबी उपेक्षाच आली आहे. आक्षी येथील एका रस्त्याच्या कडेला हा शिलालेख धुळ खात पडून आहे. पुरातत्व विभागानेही शिलालेखाच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न केलेले नाही. शिलालेखावरील अक्षरे अस्पष्ट होण्यास सुरवात झाली आहे. …

Read More »

खोपोलीत निषेध आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा खोपोलीतील कार्यकर्त्यांनी बुधवारी हातात फलक घेवून आपल्या घराबाहेर निषेध केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर   तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजप कार्यकर्त्यांवर खुनी हल्ले करीत आहेत. या हल्ल्याचा तसेच याबाबत मूग गिळून गुपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करण्याचे आवाहन भाजपचे …

Read More »

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध

अलिबाग : प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा बुधवारी (दि. 5) अलिबागमध्ये भाजपतर्फे निषेध करण्यात आला. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विधासभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल राज्यामध्ये  हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारात भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले …

Read More »

लसीकरण केंद्र मुरूडलाच ठेवावे; स्थानिक जनतेची मागणी

मुरूड : प्रतिनिधी येथील नवाबकालीन लेडी कुलसुम बेगम रुग्णालयात सध्या लसीकरण करण्यात येत आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केद्रांमध्येच लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने मुरूडमधील नागरिकांना लसीकरणासाठी आगरदांडा किंवा नांदगाव येथे जावे लागणार आहे. त्यात गैरसोय होणार असल्याने मुरूडमधील लसीकरण केंद्र शहरातच ठेवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मुरूड ग्रामीण …

Read More »

उंट लागले आपल्या परतीला; व्यावसायिकांना लॉकडाऊनची झळ

रेवदंडा, अलिबाग, नागाव, काशिद, मुरूड समुद्रकिनार्‍यांवर शुकशुकाट रेवदंडा : प्रतिनिधी पर्यटकांना उंट सवारीचा आनंद देणार्‍या उंट व्यावसायीकांना लॉकडाऊची झळ बसली आहे.  प्रतीवर्षी अलिबाग व मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांच्या सेवेसाठी येणारे उंट या वेळीही पर्यटन हंगाम सुरू होण्या आधीच परतीच्या प्रवासाला लागले आहेत. पावसाळ्यातील बंद असलेला समुद्रकिनार्‍यावरील पर्यटन व्यवसाय गणपती उत्सवानंतर …

Read More »

रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे झाली औषध फवारणी

धाटाव :  प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन रोहा तालुक्यातील रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे परिसरात जंतुनाशक औषधांची फावारणी करण्यात आली. धाटाव औद्योगीक वसाहतीमध्ये सर्वात जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, एक्सेल स्टॉप येथील सर्व दुकानाबाहेर तसेच परिसरातील नागरी वसाहतींमध्ये रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे जंतुनाशक …

Read More »

सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे शहरावर नेरळ पोलिसांची नजर

कर्जत : बातमीदार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नेरळ पोलिसांनकडून आता शहरातील मोक्याच्या ठिकाणी तसेच अंतर्गत रस्ते व रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात नेरळ शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होतानाचे चित्र समोर आले होते. सोनसाखळी चोरी बरोबरच वाहन चोरी तसेच वाहनाचे किमती सामान चोरीला जाणे …

Read More »