Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

संतप्त चिंचवली ग्रामस्थांनी खडीचे ट्रक रोखले

उडणार्‍या धुळीने लोक हैराण खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चिंचवली- मानकीवली रस्त्यावरील दगडखाणींतील सुरूंग स्फोटांमुळे चिंचवली येथील घरांना हादरे बसतात, त्यास शासनाने प्रतिबंध घालावा, तसेच गावाजवळून जाणार्‍या ट्रकमुळे उडणार्‍या  धुळीने चिंचवली ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर चिंचवली (शेकिंन) ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. 2) दगडखाणींचे ट्रक रोखून आंदोलन केले. चिंचवली …

Read More »

सुधागडातील शिळोशी येथील आखाड्याला क्रीडा साहित्य भेट

पाली : प्रतिनिधी अलिबाग येथील नेहरू युवा केंद्रातर्फे सुधागड तालुक्यातील शिळोशी येथील जय हनुमान आखाड्याला नुकतीच क्रीडा साहित्याची भेट देण्यात आली. जय हनुमान आखाड्यात शिवकालीन शस्त्रास्त्र चालविणे, लाठी- काठी व मल्लखांब आदी मर्दानी खेळ शिकविले जातात. नेहरू युवा केंद्राचे ऋषी झा यांनी पाली येथील क्रीडा संकुलात हे खेळाचे साहित्य आखाड्याचे …

Read More »

महिलांची आगोटची कामे सुरू

पापड, कुरडया, खारोड्या करण्याची लगबग कर्जत : प्रतिनिधी होलोकोत्सव झाला की ग्रामीण भागातील महिलांची आगोटीची कामे करण्याची लगबग सुरू होते. या दिवसांत वर्षभर पुरतील एव्हढे पापड, कुरडया, खारोड्या, पापड्या बनविण्याकडे महिलांचा कल असतो. ग्रामीण भागातील महिला होळीच्या पूर्वी वर्षभर पुरेल असा मसाला, हळद, धणे करून घेण्यात मग्न असतात. तर मार्गशीर्ष …

Read More »

कर्जत तालुक्यात टंचाईच्या झळा

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी कर्जत : बातमीदार उन्हाळा सुरू होताच कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. तालुक्यातील 17गावे आणि 59आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या असून, तेथे पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने ट्रँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे. कर्जत तालुक्यात …

Read More »

आंबा, काजूच्या बागांना कडक उन्हाची झळ

मोहोर करपल्याने बागायतदार हवालदिल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. पहिल्यांदाच मार्च महिन्यात पारा 40 अंशाच्या वर गेला आहे. याचा फटका इथल्या आंबा पिकाला बसला आहे. कडक उन्हामुळे आंब्याचा मोहोर करपून काळा पडला आहे. दक्षिण रायगडातील काजू पीकालाही या उष्णतेच्या लाटेचे चटके जाणवू लागले आहेत. …

Read More »

रायगड विकास प्राधिकरणाच्या मदतीला ‘नाम’

काँग्रेस नेते माणिक जगतापांनी दिले देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद महाड : प्रतिनिधीकिल्ले रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून परिसरातील 21 गावांचा विकास होत असताना या गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नाम फाऊंडेशन काम करणार आहे. तशी घोषणा नाम फाऊंडेशनचे सर्वोसर्वा नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी (दि. 2) पाचाड येथे केली. या वेळी …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये पोलिसांचे संचलन

मुरूड : प्रतिनिधी   राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांनी कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी बुधवारी (दि. 31) मुरूडमध्ये संचलन केले. मुरुड नगर परिषद कार्यालायापासून पोलीस संचलानास सुरूवात झाली. शहरातील …

Read More »

‘त्या’ रस्त्यांची कामे रायगड विकास प्राधिकरणामार्फत करावी; स्वराज्य संघटनेतर्फे खा. छत्रपती संभाजीराजेंना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी रायगड विकास प्राधिकरणामार्फत माणगाव व महाड तालुक्यातील खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पंकज तांबे यांनी पाचाड (ता. महाड) येथे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची …

Read More »

आवक घटल्याने मासळी महागली; खोल समुद्रात एलइडी मासेमारी सुरू असल्याचा मच्छीमारांचा दावा

मुरूड : प्रतिनिधी खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील  मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बाजारात फार थोड्या प्रमाणात येत असलेल्या मासळीचे भाव कडाडले आहेत. किनार्‍यालगत मासळी मिळत नसल्याने आठ दहा तास प्रवास करून मच्छीमार …

Read More »

रायगड रोप वे 16 दिवस राहणार बंद

महाड ः प्रतिनिधीकिल्ले रायगड येथील रोप वे देखभाल-दुरुस्तीसाठी 16 दिवस बंद राहणार असल्याची माहिती रोप वे व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पाहण्यासाठी लॉकडाऊननंतर मोठ्या संख्येने पर्यटक येत असून, रोप वेवर गर्दी होत आहे. चार चार तास पर्यटकांना रांगेत रहावे लागते. 3 ते 18 एप्रिलदरम्यान हा रोप वे …

Read More »