कोविड रुग्णांना मोठा दिलासा अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर 45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या तीन टँकरसह ही ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी (दि. 26) सकाळी 11.30 सुमारास कळंबोली येथे दाखल झाली.विशाखापट्टणम् येथून …
Read More »नेरळ हॉस्पिटलला कोरोना उपचारांसाठी मान्यता; भाजपच्या पाठपुराव्याला यश
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नेरळ परिसरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने नेरळ हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरचा दर्जा देण्याची मागणी केली होती. दरम्यान, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्या अनुषंगाने नेरळ हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलचा दर्जा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या पाठपुराव्याला …
Read More »कर्जतमध्ये महावीर जयंती साधेपणात
कोरोनामुळे मिरवणूकही रद्द कर्जत : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कर्जतमध्ये रविवारी (दि. 25) श्री महावीर जयंती केवळ महावीरांच्या मूर्तीचे पूजन करून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. दरवर्षी काढण्यात येणारी भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली. गेल्या वर्षीही महावीर जयंती साधेपणानेच साजरी करण्यात आली होती. श्री महावीर जयंती म्हणजे जैन …
Read More »गरम पाण्याचे कुंड लाभलेले उन्हेरे गाव
पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील उन्हेरे व महाड येथील सव येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यातील उन्हेरे येथील कुंडांना पर्यटक व नागरिकांची सर्वाधिक अधिक पसंत आहे. कारण या कुंडातील पाणी आंघोळीसाठी योग्य आणि स्वच्छ आहे. अंबा नदीच्या शेजारी उन्हेरे गावात गरम पाण्याची दोन कुंड आहेत. या कुंड परिसरात …
Read More »अलिबागच्या हॅम रेडियो संघाचे सुयश
देशात मिळवला तृतीय क्रमांक अलिबाग ़: प्रतिनिधी आपत्ती काळात हॅम रेडीओ ऑपरेटर्सनी जास्तीत जास्त अंतरापर्यंत संपर्क साधण्याची क्षमता आजमविण्यासाठी अमॅच्युअर रेडीओ सोसायटी ऑफ इंडियाने (एआरएसआर) अखिल भारतीय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अलिबागहून सहभागी झालेल्या संघाने एकूण 102 क्यूएसओ गुण मिळवून देशात तृतीय क्रमांक मिळवला. एआरएसआर दर वर्षी हॅम …
Read More »बालरोगतज्ज्ञांनी दिले तीन नवजात बालकांना जीवदान
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण मयत होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीमवर आनंदाची बाब म्हणजे कमी वजनाच्या तीन नवजात बालकांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांनी जीवदान दिले आहे. तीनही बालकांवर उपचार करून त्यांचे वजन वाढल्यानंतर त्यांना सुखरूप घरी सोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे. अलिबागच्या …
Read More »खालापुरात पाच लाखांचा गुटखा जप्त
खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील माजगाव येथे एका किराणा स्टोअर्सवर धाड टाकून सुमारे पाच लाख किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.माजगाव गावाच्या नाक्यावर असणार्या माही किराणा स्टोअर्समध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला विक्रीसाठी आणला आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीकडून लवकरच जम्बो कोविड केअर सेंटर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पेणजवळील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली होती. त्या अनुषंगाने जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे रहात आहे. तब्बल 800 बेडचे हे अद्यावत कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात …
Read More »पेणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 15 दिवस बंद
कोरोना महामारीचा बसला फटका पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्य शासनाच्या आदेशानुसार व कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यास काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे आरटीओची ऑनलाइन कागदपत्रे पूर्तता करणारे केंद्र व्यवसायिकांना कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसलेला दिसून येत आहे. शासनाच्या आदेशानुसार पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय …
Read More »…अन् जिल्हा महिला व बालविकास अधिकार्यांनी रोखले बालविवाह
अलिबाग : जिमाका टाळेबंदी लागू असतानाही रायगड जिल्ह्यात विवाह सोहळे सुरू असून चक्क बालविवाहांच्या घटनाही समोर येत आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालकांचे विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रायगड जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तातडीने हालचाली करुन हे बालविवाह रोखले. तसेच या बालकांचे आई-वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व योग्य …
Read More »