Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 15 दिवस बंद

कोरोना महामारीचा बसला फटका पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्य शासनाच्या आदेशानुसार व कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यास काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे आरटीओची ऑनलाइन कागदपत्रे पूर्तता करणारे केंद्र व्यवसायिकांना कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसलेला दिसून येत आहे. शासनाच्या आदेशानुसार पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय …

Read More »

…अन् जिल्हा महिला व बालविकास अधिकार्यांनी रोखले बालविवाह

अलिबाग : जिमाका टाळेबंदी लागू असतानाही रायगड जिल्ह्यात विवाह सोहळे सुरू असून चक्क बालविवाहांच्या घटनाही समोर येत आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालकांचे विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रायगड जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तातडीने हालचाली करुन हे बालविवाह रोखले. तसेच या बालकांचे आई-वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व योग्य …

Read More »

पालीतील व्यापार्यांना ऑनलाइन गंडा

पोलिसांचे सतर्क राहण्याचे आवाहन पाली : प्रतिनिधी आर्मीचा कॅम्प पालीजवळ लागला आहे, त्यासाठी दूध, दही, पनीर, किराणा, जेवण, भाजीपाला आदी पाहिजे असे फोनवर सांगून एटीएम फोटो आणि पिन नंबर घेवून पालीतील व्यापार्‍यांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याच्या घटना बुधवारी (दि. 21) समोर आल्या आहेत. यासंदर्भात व्यापार्‍यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाली …

Read More »

जेएसडब्ल्यूकडून 170 मेट्रिक टन ऑक्सिजनपुरवठा

पेण : प्रतिनिधी सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून मुंबई महानगर क्षेत्रासाठी 170 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नारायण बोलबंडा यांनी दिली. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी औद्योगिक कंपन्यांमध्ये तयार होणारा ऑक्सिजन आरोग्य …

Read More »

पोलादपुरात कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष; केवळ निर्बंध, दंडावर भर

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वच सरकारी यंत्रणांनी कोरोना संसर्गाबाबतच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कडक निर्बंधांचे पालन करण्यास भाग पाडून दंडात्मक कारवाईदेखील करून वसुलीचा सपाटा लावला आहे. परिणामी शहरासह तालुक्यातील व्यापार व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली …

Read More »

पालीजवळील अंबा नदीत दुर्मिळ पानमांजराचे दर्शन

भय घालवण्यासाठी वनविभागाचा पुढाकार पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीतील अंबा नदीमध्ये दुर्मिळ पानमांजरांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. पानमांजराचे वास्तव्य पर्यावरणासाठी बहुमूल्य असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. प्रारंभी या पानमांजराविषयी ग्रामस्थांत भीती निर्माण झाली होती, मात्र वनविभागाने जनजागृती करून लोकांचं भय कमी केलंय. पालीतील व्यापारी विजय घावटे यांना …

Read More »

एकदरा गावात साध्या पद्धतीने रामनवमी

मुरुड : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यातील एकदरा गावात बुधवारी (दि. 21) रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या वेळी कोरोनाचे संकट लवकर दूर करा, अशी प्रार्थना श्री रामांकडे करण्यात आली. मागील 58 वर्षांपासून एकदरा गावात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील …

Read More »

डिझेल परताव्यासाठी जनआंदोलन करणार

मनोहर बैले यांचा इशारा मुरुड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मत्स्यविभागाकडून डिझेल परतावा रक्कम प्राप्त झालेली नाही. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा  डिझेल परतावा मिळत नसल्याने जिल्ह्यातील मच्छीमार त्रस्त झाले आहेत. आता डिझेल परतावा मिळविण्यासाठी मच्छीमारांचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर बैले यांनी बुधवारी (दि. 21) …

Read More »

मुरूडमध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेची अंमलबजावणी सुरु

मुरुड पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आव्हान मुरुड : प्रतिनिधी  रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये मुरुडमध्ये बुधवार (दि. 21) पासून कोरनाविषयक नवीन नियमांचे पालन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मुरूड शहरात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दुकाने चालू ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता  राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमवाली जाहीर करण्यात …

Read More »

‘वळण‘ ची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

दिग्दर्शक प्रदिप गोगटे यांच्या उत्कर्ष इव्हेंट्स प्रॉडक्शन्सची गरुडझेप कडाव : प्रतिनिधी येथील दिग्दर्शक प्रदिप गोगटे यांच्या संकल्पनेतून उत्कर्ष इव्हेंट्स प्रॉडक्शनने साकारलेल्या ‘वळण‘ या शॉर्टफिल्मची नवादा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे.     वळण या शॉर्टफिल्ममध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग असून या शॉर्टफिल्मचे संपूर्ण शुटिंग कर्जतच्या …

Read More »