Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

राज्य शासन सतत निर्णय बदलते त्यामुळे नुकसानभरपाईस विलंब

आमदार अमित साटम यांची टीका म्हसळा : प्रतिनिधी 3 जून रोजी झालेले निसर्ग चक्रीवादळ थांबून कोकणी माणूस शेतात पोहचला तरी, सत्ताधारी नुकसानभरपाई बाबत सतत निर्णय बदलत आहे हे चुकीचे आहे. सत्तारुठ पक्ष गरजूंना मदत देण्यामागे दुजाभाव करत आहे. श्रीवर्धन म्हसळ्यात शासनाचे धोरण पारदर्शकपणे राबविले जात नाही हे चुकीचे असल्याचे स्पष्ट …

Read More »

श्रीवर्धनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदतकार्य

पोलादपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीपूर्वीच श्रीवर्धन, मुरुड, माणगाव या तिन्ही ठिकाणी सर्वेक्षणात्मक बैठका झाल्या होत्या. वादळानंतर दोन-तीन तासानंतर स्थानिक संघ स्वयंसेवक एकत्र आले व मदतकार्याची दिशा ठरवली. श्रीवर्धन या तालुक्याच्या ठिकाणी रवींद्र राऊत हायस्कूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीचे मदत केंद्र कार्यान्वित झाले. तहसीलदार, नगरपरिषद …

Read More »

हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या इमारत पुनर्बांधणी कामाला अखेर सुरुवात

कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या कार्यकारी समितीने मागील वर्षी इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र वर्षभर इमारत बांधण्यावरून न्यायालयीन लढाई सुरू होती. ती आता थांबली असून, व्यायामशाळा इमारतीच्या पुनर्बांधणी कामाला सुरुवात झाली आहे.  हुतात्मा कोतवाल व्यायामशाळेच्या पुनर्बांधणीच्या प्रस्ताव दीड वर्ष वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. याबाबत …

Read More »

पेण नगर परिषदेकडून निर्जंतुकीकरण मोहीम

पेण : प्रतिनिधी पेण शहरात चार दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर नगर परिषदेकडून शहर निर्जंतुकीकरण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, गुरुवारी (दि. 25) सकाळपासून शहराच्या विविध भागांमध्ये मशिनच्या सहाय्याने व माणसे लावून निर्जंतुकीकरणाला सुरुवात झालेली आहे. या निर्जंतुक फवारणीमध्ये मिलीथिऑन, फ्लायगॉन, निमटेक्स, सोडिअम हायपोक्लोराईड, लिंबाडा या कीटकनाशकांचा उपयोग केला …

Read More »

रोजगार नाही, व्यवसाय नाही; मग शालेय फी कशी भरायची? पालकांचा सवाल

रोहे : प्रतिनिधी बहुतांशी खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. शालेय वर्षाला सुरुवात झाली म्हणजे फी भरावीच लागणार. शासनाने फीसाठी सक्ती करू नये, असे शैक्षणिक संस्थांना सूचना दिली असली तरी नंतर मात्र एकत्रित फी भरावी लागणार आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यातच …

Read More »

रायगडातील बागायतदार हवालदिल

चक्रीवादळग्रस्त अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील फळबागांना बसला असून, 22 हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. यात आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, मात्र पिकती झाडे उन्मळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गंभीर म्हणजे या बागायतदारांना अजूनही …

Read More »

पावसाअभावी रोपे सुकू लागली

कर्जत : बातमीदार गेल्या 15 दिवसांपासून वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे भाताची रोपे सुकू लागली आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही, तर बळीराजावर भाताची रोपे पुन्हा रुजविण्याची वेळ येणार आहे.  कर्जत हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखळा जातो. तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. खरिप हंगामासाठी शेतकर्‍यांनी …

Read More »

रायगडात कोरोनाचा हाहा:कार; तब्बल 160 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या तब्बल 160 रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 25) झाली, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात पहिल्यांदाच एवढे रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 82, पनवेल ग्रामीणमधील 36, अलिबाग तालुक्यातील नऊ, खालापूर तालुक्यातील आठ, उरण व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण तालुक्यातील चार, …

Read More »

रायगडात भीषण पाणीटंचाई

315 गावे-वाड्यांना टँकर्सद्वारे जलपुरवठा  अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण बनले आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त 315 गावे आणि वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स तसेच अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.उरण तालुक्यातील पाच वाड्यांमध्ये दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील एक गाव व एक वाडीची तहान एका खासगी टँकरद्वारे …

Read More »

पेणमध्ये कडकडीत बंद; नगराध्यक्षांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी व्यापारीवर्ग, दुकानदार व नागरिकांना चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पेणकरांनी गुरुवारी (दि. 25) पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळला. पेणमध्ये मागील आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी पेण शहरात जनता …

Read More »