Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात कोरोनाचा उच्चांक; तब्बल 142 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 24) तब्बल 142 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 95, पनवेल ग्रामीणमधील 27, उरण तालुक्यातील 10, खालापूर तालुक्यातील चार, रोहा तालुक्यातील तीन, तर कर्जत, पेण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. …

Read More »

चक्रीवादळग्रस्त माथेरानकर मदतीच्या प्रतीक्षेत

कर्जत : बातमीदार निसर्ग चक्रीवादळात माथेरानमध्येही दाणादाण उडाली. हे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल म्हणून राज्य शासनाकडून दिल्या जाणार्‍या मदतीकडे नुकसानग्रस्तांचे डोळे लागले आहेत, मात्र 20 उलटूनही माथेरानमध्ये मदत पोहोचलेली नाही.माथेरानमध्ये शेती नाही वा उद्योगधंदे नाहीत. फक्त येथे येणार्‍या पर्यटकांवर माथेरानकरांचा उदरनिर्वाह चालतो. त्यातच कोरोना विषाणूमुळे 17 मार्चपासून लागलेल्या लॉकडाऊनपासून …

Read More »

श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने धान्यवाटप

कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामजिक संस्था पुढे येत आहेत. कर्जत तालुक्यात अनेक कुटुंबांना या संकटकाळात त्यांनी मदतीचा हात दिल्याने मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणार्‍या आदिवासींना मोठा दिलासा मिळत आहे. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. भरत वाटवणी संचालित श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने …

Read More »

पावसावरील कवितांनी रसिक झाले ओलेचिंब!

माणगाव ः प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद साहित्याचा मधुघट समूहातर्फे रविवारी (दि. 21) ऑनलाइन कविसंमेलनाचे सातवे पर्व अतिशय उत्साहात पार पडले. पाऊस या विषयावरील विविध कवी-कवयित्रींच्या कवितांनी रसिक अक्षरशः चिंब झाले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, कोमसाप केंद्रीय अध्यक्ष अशोक ठाकूर, कार्याध्यक्षा नमिता किर, रायगड भूषण एल. बी. पाटील …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयातील स्वॅब मशिन हलविण्याची मागणीय; डिकसळमधील ग्रामस्थांचा तीव्र विरोध

कर्जत ः बातमीदार कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची टेस्ट घेण्यासाठी स्वॅब मशिन बसविण्यात आले आहे. ते मशिन डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलला हलविण्यात यावे, अशी मागणी कर्जतमधील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. दरम्यान, स्वॅब मशिन डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हलविण्यास तेथील ग्रामस्थांनी मात्र विरोध केला आहे. कोविड थ्रोट मशिन कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात …

Read More »

रोह्यात कृषी विभागाचे 1400 हेक्टरपर्यंत पंचनामे पूर्ण

रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील बिल्डिंगवरील शेड, खासगी शालेय संस्थांचे पत्रे, कौले, पोल्ट्री फार्म यासह सरकारी इमारती व जिल्हा परिषद शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी बांधवांची घरकुले पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या सार्‍या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व …

Read More »

कारखान्यांतील सांडपाणी थेट नाल्यात; ‘सावित्री’चे प्रदूषण वाढले

महाड ः प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडत आहेत. हे रासायनिक सांडपाणी नाल्यांमार्गे थेट सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडीकिनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांत असंतोष पसरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज रक्तदान शिबिर

अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रायगड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना उपचारादरम्यान रक्ताची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 24 जून रोजी अलिबागमध्ये पहिल्या टप्प्यातील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अलिबाग शहराजवळील कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज …

Read More »

‘भरमसाठ वीज बिले माफ करा’

महाड ः प्रतिनिधी कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्यांवर भरमसाठ वीजबिलांची कुर्‍हाड कोसळली आहे. अशा नागरिकांची वीज बिले माफ करावीत, अशी भूमिका घेत दक्षिण रायगड भाजपच्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात आली. याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. कोरोनाची वैश्विक महामारी, निसर्गाची अस्मानी व आघाडी सरकारची …

Read More »

दीपक मोकल यांची नियुक्ती

रेवदंडा ः प्रतिनिधी को. ए. सो. चे माजी मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक दीपक मोकल यांची व्हॉलीबॉल असोसिएशन इंडियाच्या उपाध्यक्षपदी आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे येथील पिंपळनेरमध्ये 19 जूनला व्हॉलीबॉल असोसिएशनच्या कार्यकारी  मंडळाची सभा झाली. या सभेत आमदार मंजुळा गावित, माजी खासदार डॉ. राजेंद्र गावित,  महाराष्ट्र …

Read More »