Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वाहतूक कोेंडीचे विघ्न

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बिकट माणगाव : प्रतिनिधी कोकणवासीयांचे आराध्य दैवत गणपतीला शनिवारी भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभ्ाूमीकडे निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे चाकरमानी प्रवासी तासन्तास या महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडीला तोंड देत होते. त्यामुळे चाकरमान्यांच्या वाट्याला …

Read More »

खोपोलीतील सार्वजनिक शौचालयांची होणार दुरुस्ती

खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम सुरू आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालयांची दुरुस्ती करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शौचालयांची पाहणी करून कामांच्या सूचना दिल्या. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांमधील असुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी …

Read More »

पुढच्या वर्षी लवकर या!

धो धो पावसातही खोपोली-खालापुरात विसर्जन खोपोली ः प्रतिनिधी भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची व पवित्र गौराईची यथासांग भक्ती करून शनिवारी (दि. 7) खालापूर-खोपोलीत बहुसंख्य सार्वजनिक व हजारो घरगुती गौरी गणपती बाप्पांचे कोसळणार्‍या धो-धो पावसात अत्यंत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे सांगत बाप्पाला निरोप देण्यात …

Read More »

रायगड ‘कोमसाप’तर्फे कवितांची कार्यशाळा आणि खुले कविसंमेलन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा नवीन पनवेल आणि उत्तर-दक्षिण रायगडच्या संयुक्त विद्यमाने कवितेची कार्यशाळा आणि खुले कविसंमेलन रविवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल मार्केट यार्ड येथील सभागृहात …

Read More »

विधानसभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

अलिबाग ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण झाली आहे. मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती रायगडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी रायगड …

Read More »

उमटे धरणातून 60 गावांना होतोय अशुद्ध पाणीपुरवठा; जि. प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची कबुली

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून मातीमिश्रित अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची कबुली रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी शुक्रवारी (दि. 6) पत्रकार परिषदेत दिली. उमटे धरणातून मातीमिश्रित अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली. रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम …

Read More »

कर्जत तालुक्यात 2609 गौरींचे पूजन

कर्जत : प्रतिनिधी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1345, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 अशा …

Read More »

पाऊस थांबल्याने म्हसळ्यात गौरीपूजन उत्साहात

म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात शुक्रवारी गौरींचे माहेरवाशिणीसारखे स्वागत करण्यात आले. सकाळच्या सत्रात पावसाने उघडीप घेतल्याने  विशेषत: म्हसळा तालुक्यातील खारगाव (बु), तोंडसुरे, खारगाव (खु), आगरवाडा, बनोटी, गणेशनगर, खरसई, मेंदडी, मेंदडी कोंड, वारळ, काळसुरी, गोंडघर या आगरी वस्तीच्या गावांतील  माहेरवाशिणींत या वेळी नेहमीपेक्षा जास्त उत्साह होता. ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात …

Read More »

वृद्धेच्या खूनप्रकरणी कुबेर पांडेला अटक

अलिबाग : प्रतिनिधी ऐन गणेशोत्सवात अलिबाग तालुक्यातील आवास गावात एका वृद्ध महिलेचा खून झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात कुबेर उर्फ मोबाइल अजोरा पांडे (40) या आरोपीला अटक केली आहे. आवास गावात राहणार्‍या प्रभावती सीताराम म्हात्रे (86) या महिलेचा 30 ऑगस्ट रोजी गळा आवळून खून करण्यात …

Read More »

युवकांनी जनतेला न्याय देण्याचे काम करावे -कृष्णा कोबनाक

स्वराज्य प्रतिष्ठानचा वर्धापन दिन दिमाखात साजरा म्हसळा : रामप्रहर वृत्त स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संस्थेचा सहावा वर्धापन दिन नुकताच म्हसळा सार्वजनिक वाचनालयात दिमाखात साजरा करण्यात आला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील पाचही तालुक्यांतील अनेक होतकरू युवक या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. त्यांनी भविष्यात अधिक संघटित होऊन जनतेला न्याय देण्याचे काम करावे, …

Read More »