अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ आणि त्यांचे वडील राष्ट्रवादीचे जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू होती, मात्र काही दिवस त्यांनी वेट अँड …
Read More »शेकाप पक्षाला पुन्हा धक्का; माजी सरपंच, सदस्य, कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पेण : प्रतिनिधी निगडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा नाईक व माजी सदस्य जनार्दन गणपत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेकाप कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 11) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. पेण तालुक्यातील निगडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन गणपत नाईक व त्यांच्या पत्नी माजी सरपंच सुनंदा जनार्दन नाईक …
Read More »रायगडातील 23 पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
ए. बी. खेडकर म्हसळ्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हसळा : प्रतिनिधी रायगड पोलीस दलातील 23 अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. म्हसळ्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांची आलिबाग (पो.अ.वाचक) येथे तर ए. बी. खेडकर यांची म्हसळ्याला पोलीस निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य आधिकार्यांच्या बदल्या- पोलीस निरीक्षक आर. पी. शिंदे (जिल्हा विशेष …
Read More »खोपोलीतील मुलांचा शिक्षणमंत्र्यांंच्या हस्ते सत्कार
खोपोली : प्रतिनिधी स्काऊट गाईडच्या राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोपोली येथील शिशु मंदिर शाळेतील सृष्टी दिलीप म्हसे व चिन्मय मनोज हातणकर यांना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते स्काऊट्स आणि गाईड्स अंतर्गत राज्य पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि …
Read More »एसटीच्या धडकेत पादचारी ठार
पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली मार्गावरील हेदवली गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 9) रात्री एसटी बसने पादचार्याला धडक दिली. या अपघातात पादचारी काशिनाथ महादू भोय (रा. डोंगरआळी जांभूळपाडा, ता. सुधागड) यांचा जागीच मृत्यू झाला. रघुनाथ बाबूराव यशवंतराव (52) हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (एमएच-40, एन-8402) घेऊन सोमवारी पाली येथून पनवेलकडे जात होते. …
Read More »पारंगखार ग्रामस्थ भाजपमध्ये दाखल
अॅड. महेश मोहिते यांनी केले स्वागत रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघातील पारंगखार ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 9) भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे अॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. पारंगखार येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात राजकुमार ओळांबे, लखन घाग, विजय घाग, बाळकृष्ण ओळांबे, पांडुरंग पाटील, कमळाकर ओळांबे, मुकुंद गायकर, हरिश्चंद्र गावडे, …
Read More »खोपोलीत शिक्षकांचा गौरव
खोपोली : प्रतिनिधी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 9) खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात नगरपालिका शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी आदर्श समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गणेशोत्सावानिमित्त सुटी असल्याने शिक्षक दिनाचा कार्यक्रम 5 सप्टेंबरऐवजी सोमवारी घेण्यात आला. नगरपालिकेच्या शिक्षण …
Read More »जंजिरा किल्ल्यावरील वाहतुकीत हवामानाचा अडथळा
मुरूड : प्रतिनिधी सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार या सुट्यांचा योग साधून पर्यटक येत आहेत. मात्र बदलत्या हवामानामुळे सध्या किल्ल्यावर जाणारी शिडाची बोट वाहतूक विस्कळीत झाली असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. 1 सप्टेंबरपासून जंजिरा किल्ल्यावर जाणारी बोट वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र जोरदार पाऊस आणि वेगवान वारे …
Read More »वाकण-खोपोली मार्ग खड्डेमुक्तीसाठी पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांचा पुढाकार
पाली : प्रतिनिधी वाकण-पाली-खोपोली राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यातच पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पाली पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले निरीक्षक बाळा कुंभार यांनी या मार्गावर स्वतः उभे राहून शक्य तेवढे खड्डे बुजवून घेतले. वाकणपासून जंगलीपीर, बलाप, पाली ते थेट रासळ, …
Read More »खोपोलीत डेंग्यू; नागरिकांत भीती, आरोग्य यंत्रणा सतर्क
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहर व परिसरात डेंग्यूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात जवळपास 9 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यातील तीन रुग्ण पार्वती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, तीन रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत. तर अन्य रुग्ण शहरातील डोंगरे हॉस्पिटलमध्ये …
Read More »