Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

दुर्गवीर प्रतिष्ठानची सुरगड श्रमदान मोहीम फत्ते

भर पावसात किल्ल्यावर राबविले स्वच्छता अभियान पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील विविध किल्ल्यांवर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले संवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने नुकतीच घेरा सुरगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी भर पावसात प्रतिष्ठानच्या 20 सदस्यांनी किल्ल्याची व परिसराची साफसफाई व स्वच्छता …

Read More »

म्हैस शेतात घुसली म्हणून केला हल्ला

रेवदंडा : प्रतिनिधी म्हैस शेतात घुसल्याचा राग मनात धरून सागवाडी येथे दोघांवर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील सागवाडी येथील जयश्री फसाळ या दुसर्‍याच्या ठिकाणी काम करीत असताना महाजने येथील समीर पाटील यांनी तेथे …

Read More »

कर्जतचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पाहून मणिपूर राज्यातील अधिकारी खूश

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार नगरपालिकेच्या माध्यमातून कर्जतमध्ये उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा शून्य कचरा डेपो बनला आहे.  या कचरा डेपो परिसराची पाहणी केल्यानंतर मणिपूर राज्यातून आलेल्या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. कर्जत नगर परिषदेचा शून्य कचरा डेपो पाहण्यासाठी मणिपूर राज्यातील अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ आले होते. कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि नगर …

Read More »

तुंगी गावातील घर कोसळून नुकसान

कर्जत : बातमीदार संततधात पावसामुळे कर्जत तालुक्यातील तुंगी गावामधील चंद्रकांत सुपे यांचे कौलारू घर गुरुवारी कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाल्याने सुपे कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यात कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे कोसळून प्रचंड नुकसान झाले आहे. गुरुवारी …

Read More »

अन्न सुरक्षेमध्ये भाताचे योगदान महत्त्वपूर्ण

कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचे कर्जतमध्ये प्रतिपादन कर्जत : रामप्रहर वृत्त जगात भात लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र भारतामध्ये (4.39 दशलक्ष हेक्टर) असून उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात भाताचा वाटा 40 टक्के पेक्षा अधिक असल्याने अन्न सुरक्षेमध्ये भाताचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे …

Read More »

इको सेन्सेटिव्ह झोनच्या कायद्यात बदल करणार

पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासन; साहसी खेळांनाही देणार प्रोत्साहन कर्जत ः बातमीदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 2003मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला. त्यामुळे माथेरानवर आलेले निर्बंध दूर करण्यासाठी माथेरान नगरपालिका प्रयत्न करीत होती. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रश्नावर गेली तीन वर्षे सातत्याने आवाज उठविला. गुरुवारी (दि. 1) नवी …

Read More »

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बंगल्यावर

मुंबई : प्रतिनिधी एकामागोमाग एक नेते, आमदार सोडून चालल्यामुळे अस्वस्थ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेही भाजप प्रवेशाची चाचपणी करताहेत की काय, या चर्चेला उधाण आले …

Read More »

मांसाहारावर ताव मारून गटारी साजरी

अलिबाग : प्रतिनिधी श्रावण मासाची पूर्वसंध्या म्हणजे दीप अमावस्या. तिचा अपभ्रंश गटारी अमावस्या म्हणून झाला. तिखटावर म्हणजेच मांसाहारावर ताव मारून बुधवारी (दि. 31) सर्वत्र गटारी साजरी झाली. अर्थात मानवी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी शेकडो बकरे आणि कोंबड्यांचा बळी गेला. गुरुवारी दुपारपर्यंत अमावस्या असल्याने बुधवार हा हक्काचा मांसाहाराचा वार ठरला. त्यामुळे मटणाच्या …

Read More »

कर्जत तालुक्यात 31 ऑगस्टला निवडणुका

सात ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी चुरस; नेरळकडे जिल्ह्याचे लक्ष कर्जत : बातमीदार डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत, मात्र टेम्बरे ग्रामपंचायतचे विभाजन होऊन तयार झालेल्या रजपे आणि जामरूख या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मात्र जाहीर झाला नाही. कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, …

Read More »

रोह्यातील उर्दू शाळेत शालेय साहित्य वाटप

रोहा ः येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 4 मधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अलईन्स टुर्स अ‍ॅण्ड ट्रायव्हर्सतर्फे मंगळवारी नगरसेवक जुबेर चोगले यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष अलिम मुमेर, मकबुल दर्जी, इमरान नुराजी, मुद्दसर खामकर, मुजीब खामकर, इरफान नुराजी, शादुल्ला नुराजी, सुलेमान नुराजी, मुख्याध्यापक कलाब, नजीर …

Read More »