कर्जत : बातमीदार तालुक्यातील दहिगाव येथील शाळेचे उपक्रमशील शिक्षक संतोष दातीर आणि झुगरेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांना राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात गुरुवारी (दि. 5) झालेल्या सोहळ्यात राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संतोष दातीर व रवी …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीच्या घरगुती गणपती स्पर्धेला प्रतिसाद
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट आणि उत्कृष्ट गणेशमूर्ती स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. उत्कृष्ट घरगुती गणेश मूर्ती स्पर्धेत प्रदीप जोशी यांनी तर घरगुती सजावट स्पर्धेत मयुरेश चंचे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून प्रमोद दहिवलीकर यांची निवड करण्यात आली. घरगुती गणेश सजावट स्पर्धेत 16, तर …
Read More »प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घ्यावा
मुरूड : प्रतिनिधी देशातील लघु व सीमांत शेतकर्यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण योजना केंद्र शासनाने सुरू केली असून त्याची अंमलबजावणी सर्वच तहसील कार्यालयातून होत आहे. शेतकर्यांना मदत करणार्या या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा मुरुड तालुक्यातील पात्र शेतकर्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान …
Read More »महाड-तुळशीखिंड-खेड रस्ता खचला
महाड : प्रतिनिधी कशेडी घाट मार्गाला पर्याय असलेला महाड-विन्हेरे-तुळशीखिंड -नातुनगर-खेड हा रस्ता गुरुवारी (दि. 5) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला खचल्याने हा रस्ता वाहातुकीला पूर्ण बंद झाला आहे. सुमारे वीस फूट रुंदीचा खड्डा पडल्यामुळे मोटारसायकलदेखील या रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याने नातुनगर मार्गाने जाणार्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती …
Read More »राष्ट्रवादीला आणखी एक झटका; आ. अवधूत तटकरेंचा राजीनामा
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकामागून एक पक्षातून बाहेर पडत असताना पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी गुरुवारी (दि. 5) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. …
Read More »रायगडात वरुणराजाची दमदार बरसात
अलिबाग : प्रकाश सोनवडेकर रायगड जिल्ह्यात पावसाने 20 वर्षांमध्ये प्रथमच चार हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारपर्यंत (दि. 5) चार हजार 135 मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार 142 मिमी आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या 131 टक्के पाऊस आजपर्यंत पडला. यंदा सरासरीच्या 150 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज …
Read More »मानिवलीमध्ये जि. प. शाळा इमारतीला गळती
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. 36 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये अजूनही विद्यार्थी बसायला गेले नाहीत, मात्र त्या अगोदरच या शाळा इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीच्या काही वर्गखोल्यांमध्ये पाणी पडत आहे. त्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे काम करणार्या …
Read More »निजामपूर विभागात राष्ट्रवादीला हादरा
माणगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कडापे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोकाशी यांनी येरद, येरद आदिवासीवाडी, कडापेवाडी, बांदलवाडी, कांदळगाव येथील ग्रामस्थांसह गुरुवारी (दि. 5) शिवबंधन बांधले. त्यांचे आमदार गोगावले यांनी शिवसेनेत स्वागत केले. येरद गावात झालेल्या या कार्यक्रमात सांगी आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांनीही …
Read More »शेकापला धक्का; कार्यकर्ते भाजपमध्ये
भाजपमुळेच मुरूड तालुक्याचा विकास होणार -अॅड. महेश मोहिते मुरूड : प्रतिनिधी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचेच आहेत. भाजप खर्या अर्थाने मुरूड तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देत असून, त्यामुळे कधी नव्हे इतका विकास झालेला मुरूडची जनता पाहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश …
Read More »ऐन गणेशोत्सवात पावसाचे धूमशान
रायगड जिल्ह्यात पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 4) सलग दुसर्या दिवशी झोडपून काढले. या पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, महाड आणि नागोठणे शहरात पुराचे पाणी शिरले होते, तर अलिबाग, रोहा शहरांतील सखल भागात घरांमध्ये पाणी घुसले. …
Read More »