Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

उमरोलीत शाळेचे छप्पर उडाले

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर पाच महिन्यांपूर्वी घालण्यात आलेले छप्पर वादळी वार्‍याने उडून गेले आहे. दुसरीकडे, डिकसळपासून पुढे कर्जत भागातील वीज खंडित झाली. सरपंच सुनीता बुंधाटे यांनी दिवसभर उभे राहून शाळेची पत्रे पुन्हा इमारती वर छप्पर टाकण्यासाठी उभे राहून काम करीत होत्या; तर …

Read More »

रोहा-मुरूड मार्गावर संरक्षक कठडा कोसळला; रस्ता बंद

रोहे : प्रतिनिधी रोहा-मुरूड मार्गावर कवळटे अदिवासीवाडीजवळ रविवारी रात्री रस्त्याच्या संरक्षक कठड्याची एक बाजू पूर्णपणे कोसळल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे, तर याच मार्गावर नाल्यालगत असलेला रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे. चार दिवस रोह्यात अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीला पूर आला होता. नदीकाठावरील गावांचे नुकसान झालेे. पावसाचा कहर मोठा असल्याचा …

Read More »

नेरळ-शेलू रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

कर्जत ः बातमीदार मुसळधार पावसाने नेरळ-शेलू मार्गावर मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील खडी आणि दगड वाहून गेले होते. त्यामुळे खंडित झालेली मध्य रेल्वेची बदलापूर-कर्जतदरम्यानची वाहतूक पूर्ववत करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर न धावलेली रेल्वे वाहतूक लवकरच सुरू होईल. तीन मालगाड्या भरून दगड आणि खडी आणण्यात आली आहे. शनिवारी …

Read More »

पोलादपूरमध्ये रस्ता गेला वाहून

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कोतवाल खुर्द रेववाडी रस्त्यावर शनिवारी झालेल्या धरणी दुभंगाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी संपूर्ण रस्ताच दरीकडे झेपावत नदीच्या पाण्यापर्यंत वाहून गेला. त्यामुळे कोतवाल खुर्द रेववाडी, सकपाळवाडी आणि धनगरवाडीतील जनतेचा संपर्क तुटला आहे. या घटनेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पाहणी करण्यात येऊन सतर्कतेचा उपाय …

Read More »

रायगडात पावसाचा धुमाकूळ

अलिबाग : प्रतिनिधी सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 4) सलग दुसर्‍या दिवशी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पाऊस आणि भरतीचे पाणी यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. मुसळधार पावसाने रायगडला झोडपून काढले. त्यामुळे दरडी कोसळल्या, रस्ते वाहतूक …

Read More »

नागोठण्यात महापूर; 2005च्या आठवणी ताज्या

नागोठणे : प्रतिनिधी पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केल्याने मध्यरात्री येथील अंबा नदीने पुन्हा एकदा आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने नागरिकांची, तसेच व्यापार्‍यांची तारांबळ उडाली. रविवारी (दि. 4) पुरात अडकलेल्या 20 जणांना सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने कोठेही जीवितहानी झाली नाही. भाजपचे नेते माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी …

Read More »

कर्जतमध्ये जोरदार पाऊस

काही भागांत पाणी घुसले; नेरळमधील अनेक भागांना तडाखा कर्जत ः वार्ताहर मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे कर्जत तालुक्यातील उल्हास नदी, पेज नदी, शिलार नदी दुथडी भरून वाहत होत्या.  रविवारी (दि. 4) सकाळी आठ साडेआठच्या सुमारास कर्जत शहराच्या मध्य भागातून वाहणार्‍या उल्हास नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली त्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होणार्‍या मुख्य …

Read More »

रविशेठ पाटील यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील मुसळधार पावसाचा फटका खाडी किनारील गावांना बसला असून वाशी विभागातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या वेळी भर पावसातही माजी मंत्री रवि शेठ पाटील यांनी वाशी, कणे, बोर्झे, लाखोला, ओढांगी, येथील  पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी 100 टक्के नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रात, …

Read More »

राज्यात पावसाचे धुमशान

अनेक भागांत पूरस्थिती, धरणांतून पाण्याचा विसर्ग, जनजीवन विस्कळीत मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात रविवारी (दि. 4) दाणादाण उडाली. पालघर, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, खडवली, कल्याण, रत्नागिरीतील खेड, विदर्भात गडचिरोली, नाशिक आदी भागांत नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत …

Read More »

खोपोली पालिकेकडून स्वच्छतादूतांचा सन्मान

खोपोली : प्रतिनिधी स्वच्छता अभियानात सहकार्य केलेल्या सामाजिक संघटना, कंपनी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा खोपोली नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 1) स्मृतिचिन्ह, पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2019 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सन्मान, तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020च्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन शहरातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात करण्यात …

Read More »