Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नेरळमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आज गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नेरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दर्शन सालेकर  यांच्यासह स्टेशन आळी परिसरातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन, तीन आणि पाचमधील हे …

Read More »

खोपोली नगरपालिकेची संरक्षक भिंत कोसळली

जीवितहानी नाही, मात्र भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान खोपोली : प्रतिनिधी सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास खोपोलीत नगरपालिकेची संरक्षक भिंत कोसळली. पोलीस ठाणे व भाजी मार्केटदरम्यान ही संरक्षक भिंत होती. सात दुचाक्या व 10 ते 12 साहित्य ठेवलेल्या हातगाड्या या भिंतीखाली आल्याने भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. …

Read More »

शाळेच्या बसला अपघात

सुदैवाने कोणतीही हानी नाही खोपोली : प्रतिनिधी खोपोली परिसरातील विद्यार्थ्यांना लोधिवली येथील अंबानी स्कूलमध्ये घेऊन जाणार्‍या बसला अपघात झाला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी, चौक या परिसरातून लोधिवली येथील अंबानी स्कूलमध्ये विद्यार्थी येत असतात. त्यासाठी खासगी बसचा वापर केला जातो. शहेशा या खासगी ट्रान्सपोर्टची बस (एमएच-46, …

Read More »

राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठक

खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी -जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी अलिबाग : जिमाका कोकणातील महत्त्वाचा सण गणेशोत्सव 2 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज्याच्या विविध शहरातून गणेशोत्सवासाठी कोकणात नागरिक येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा याकरिता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय …

Read More »

महाडमध्ये शिरले पुराचे पाणी; नागरिक धास्तावले

महाड : गेले काही दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा या तालुक्यांतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. विशेषकरून महाडला मंगळवारी (दि. 6) पुराचा मोठा फटका बसला. सावित्री, काळ, गांधारी या नद्यांनी महाड शहरात प्रवेश केल्याने बाजारपेठेसह अन्य भागांत पाणी शिरले. दस्तुरी नाका, रायगड मार्ग, …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वढाव येथे सिलिंडर व शेगड्यांचे वाटप

पेण ़: प्रतिनिधी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात वढाव सरपंच पूजा अशोक पाटील आणि भाजप जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे यांच्यातर्फे सुभद्रा सुरेश म्हात्रे, महानंदा वामन म्हात्रे, मीरा महादेव म्हात्रे, अश्विनी डोंगरे, सुमन म्हात्रे, पद्माबाई म्हात्रे व शालिनी म्हात्रे यांना गॅस सिलिंडर व शेगड्यांचे …

Read More »

केंद्र सरकारच्या निर्णयाचे पेण, खोपोलीत स्वागत

पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारने सोमवारी काश्मीरमधील 370 कलम हटवून ऐतिहासिक पाऊल उचलले. या निर्णयाचे पेणमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या कोतवाल चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा जयजयकार करण्यात आला. नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा …

Read More »

पोलादपुरात वृक्ष कोसळून वाहने, दुकानांचे नुकसान

पोलादपूर : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे मंगळवारी (दि. 6) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पंचायत समिती कार्यालयासमोरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाकाय वृक्ष कोसळून एक झायलो गाडी, तीन मोटारसायकली आणि दोन दुकानांची हानी झाली. वृक्ष कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. या घटनेत महावितरणच्या विद्युत रोहित्राचीही हानी झाल्याने काही काळ …

Read More »

उद्धर येथे तीन घरे जमीनदोस्त

पाली : प्रतिनिधी मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यात उद्धर आदिवासी वाडीतील नवशा वाघमारे, संजय नारायण वाघमारे आणि भागूनाथ जाधव यांची तीन घरे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे भिजून मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून त्वरित …

Read More »

कलम 370 रद्द केल्याने नागोठण्यात आतषबाजी

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने सोमवारी (दि. 5) घेतला. या निर्णयाचे पडसाद नागोठण्यातसुद्धा उमटले असून, मंगळवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता येथील शिवाजी चौकात भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. रोहे तालुका …

Read More »