खोपोली : प्रतिनिधी स्वच्छता अभियानात सहकार्य केलेल्या सामाजिक संघटना, कंपनी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा खोपोली नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 1) स्मृतिचिन्ह, पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2019 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सन्मान, तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020च्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन शहरातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात करण्यात …
Read More »रोहा-कोलाड मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
रोहे : प्रतिनिधी रोह्यात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस चालू असून कुंडलिका नदी तुंडुब भरून वाहू लागली आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. रविवारी (दि. 4) सकाळी 7 वाजता रोहा कोलाड राज्यमार्गावर ग्रेगोरियन स्कूल येथे झाड कोसळल्याने सलग अडीच तास वाहतूक बंद होती. सुदैवाने शाळेला …
Read More »पाऊस वार्याने श्रीवर्धनकरांना झोडपले
श्रीवर्धन ः प्रतिनिधी सतत चार ते पाच दिवस सोसायट्याचे वादळी वारे व पावसाने श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना अक्षरशः झोडपले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी पावसाचे प्रमाण हे फारच चांगले आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी सामना करावा लागला होता, परंतु या वर्षी पाऊस हा चांगला …
Read More »रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचे धुमशान
रोह्यात पूरजन्य परिस्थिती कायम रोहे : प्रतिनिधी रोहा अष्टमी शहरासह तालुक्यातील पूरजन्य परिस्थिती कायम आहे. पावसाचे थैमान सुरूच असून रोह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस चालूच आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात पाणी असून कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रोहा अष्टमी पुलावरील पाणी अद्याप ओसरले नसून हा पूल …
Read More »रोहे, नागोठणे, महाडमध्ये पाणी शिरले
अलिबाग : प्रतिनिधी सलग दोन दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. रोहा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागोठणे आणि महाडमध्येही पाणी घुसून नुकसान …
Read More »म्हसळ्यातील विद्यार्थ्यांनी घेतले निवडणुकीचे धडे
म्हसळा : प्रतिनिधी लोकशाहीतील महत्वाचा घटक असलेल्या निवडणूक प्रक्रियेची जाणीव व्हावी, यासाठी म्हसळा शहरातील शाळा नं. 1 मधील विद्यार्थ्यानी निवडणुकीचे धडे घेतले. म्हसळा शाळा नं.1 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याध्यापिका शुभदा दातार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्वराज्य सभा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेत दूसरी ते चौथीच्या 115 विद्यार्थ्यांनी …
Read More »कृषिदुतांकडून कलम बांधणी प्रात्यक्षिक
रोहे ः प्रतिनिधी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत दापोली कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी रोहे तालुक्यात ठिकठिकाणी कलम बांधण्याच्या विविध पद्धती व बोर्डो मिश्रण तयार करणे यावर प्रात्याक्षिके सादर केली. तसेच कलमे बांधून त्यापासून अर्थार्जन करण्याचे उपाय शेतकर्यांना सांगीतले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, नवीन जाती, कृषी विभागाच्या …
Read More »नागोठणे शहरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत
Exif_JPEG_420 Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी अलिकडे झालेल्या अतिवृष्टीने नागोठणे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली होती. यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या चार नागरिकांना येथील ग्रामपंचायतीने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला होता. या धनादेशाचे वितरण शुक्रवारी (दि. 2) ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. नागोठण्यातील राजेंद्र नागोठणेकर (कुंभारआळी), दीपक बोरकर (खडकआळी), महंमद …
Read More »धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दाखल्यांचे वाटप
मुरूड तालुक्यात विद्यार्थी, नागरिकांना लाभ; कर्मचार्यांनी भाग घेण्याचे आवाहन मुरुड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे नुकताच डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यात विविध प्रकाराच्या 3204 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय कामासाठी लागणारे दाखले वाटपाचे काम शासनाचे आहे, मात्र हे काम प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात करीत आहे. म्हणूनच सर्व …
Read More »रायगडात अतिवृष्टीचा इशारा
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 2) दुपारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी व खाडी किनार्यावरील तसेच डोंगर उतारावर असणार्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी पावसाचा जोर कमी होता. आजही सकाळी पावसाने काहीशी …
Read More »