Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलादपूरमध्ये झाली पंतप्रधान किसान सन्मान योजनेची ‘मन की बात’

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील 32 टक्के शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यश आल्याने रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका दुसर्‍या स्थानावर असल्याची माहिती नायब तहसीलदार समीर देसाई यांनी दिली. येथील तहसील, तालुका कृषी आणि पंचायत समिती कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी (दि. 24) पोलादपूरमधील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये पंतप्रधान किसान सन्मान …

Read More »

महिंद्र सीआयई कंपनीतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम

माणगाव : प्रतिनिधी येथील महिंद्रा सीआयई कंपोझिट डिव्हिजन कंपनीच्या  सीएसआर फंडातून कंपनी परिसरातील साले, तिलोरे व कोशिंबळे गावामध्ये 45 पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याचा सुमारे 1500 नागरिकांंना कायमस्वरूपी लाभ झाला असून, कंपनीने या पथदिव्यांच्या दोन वर्षांच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

श्रीवर्धन : प्रतिनिधी सद्गुरू बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या 65व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील भरडखोल, मामवली, गालसुरे येथील 100पेक्षा जास्त सेवकांनी त्यात सहभाग घेतला होता. सेवकांनी हाती घमेले आणि झाडू घेऊन रुग्णालय व परिसरातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंडवर …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरघोस मतदान

मुरुड तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव, उसरोली व आंबोली या तीन ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. 24) शांततेत मतदान झाले. त्यापैकी आंबोलीमध्ये सर्वाधिक मतदान झाले.  आंबोलीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या वेळी येथे शिवसेना विरुध्द ग्रामविकास आघाडी अशी लढत आहे. आंबोलीमध्ये एकूण 2540पैकी 1930 मतदारांनी मतदान …

Read More »

मोदींची स्पष्टोक्ती दिलासादायक

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे आता सूड उगवलाच पाहिजे अशी भावना देशभरातील सर्वसामान्यांकडून व्यक्त होऊ लागली. युद्ध वा सुडाच्या भावनेने पेटून केलेली कारवाई या प्रश्नात उपयोगाची नाही असे मत काही तज्ज्ञांनी तत्काळ व्यक्त केले होते. परंतु सर्वसामान्य असे काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परंतु आता काही …

Read More »

नेरळ पोलिसांकडून गावठी दारूभट्या उद्ध्वस्त

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगलात असलेल्या गावठी दारु तयार करण्याच्या दोन हातभट्ट्या नेरळ पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. बेकरे परिसरात गावठी दारुच्या हातभट्ट्या सुरु असल्याची माहिती शनिवारी (दि. 23) नेरळ पोलिसांना मिळाली, त्यानुसार  पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, पोलीस नाईक निलेश वाणी, होमगार्ड राहुल पाटील, सातपुते यांच्या पथकाने बेकरे …

Read More »

डॉक्टर भुलला स्वस्त सोन्याला

खालापुरातील घटना; सहा लाखाला लागला चुना खोपोली : प्रतिनिधी स्वस्त सोन्यासाठी खोपोलीतील एका नामांकित डॉक्टरची   सहा लाखला फसवणूक झाली आहे. डॉ. बन्सीलाल लक्ष्मण पाटील (रा. वृंदावन कॉम्पलेक्स, मुद्रे बुद्रुक, कर्जत) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून, त्यांचे खालची खोपोली (ता. खालापुर) येथे पाटील हेल्थकेअर सेंटर नावाचे रूग्णालय आहे. दिनेश प्रजापती …

Read More »

र्होडियो कंपनी कामगारांचे उपोषण तिसर्या दिवशीही सुरू

विविध कामगार संघटनांचा पाठींबा रोहे ः प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील र्‍होडियो (सॉल्वे) कंपनीच्या  कामगारांना व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांनी कामावर पुन्हा घ्यावे, या मागणीसाठी 22 फेब्रुवारीपासून कंपनीच्या प्रवेद्वारासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याची दखल न घेतल्याने तिसर्‍या दिवशीही कामगारांचे साखळी उपोषण सुरूच आहे. दरम्यान, …

Read More »

योजनेचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचवावा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन; प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा शुभारंभ अलिबाग : जिमाका केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबतची माहिती पात्र शेतकर्‍यांनी आपल्या परिचयातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 24) येथे केले. देशभरातील शेतकर्‍यांना प्रतिकुटूंब …

Read More »

एमएमआरडीएच्या विस्ताराला रायगड तयार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने आता आपल्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात एमएमआरडीए मुंबई आणि ठाणेपुरती मर्यादित न राहता रायगड आणि पालघर जिल्ह्यात आपले क्षेत्र वाढविणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. प्राधिकरणाने आपले क्षेत्र वाढविण्याआधी त्या भागात पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी सुरू केलेली सुरुवात हे राज्यातील भाजप- …

Read More »