Breaking News

क्रीडा

बार्सिलोनाला नमवून अ‍ॅथलेटिक बिलबाओ अजिंक्य

स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल सेव्हिला : वृत्तसंस्थाअ‍ॅथलेटिक बिलबाओने पिछाडीवरून मुसंडी मारत बार्सिलोनाला 3-2 असे हरवून स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. इनाकी विलियम्स याने अतिरिक्त वेळेत केलेला गोल अ‍ॅथलेटिकच्या विजयात मोलाचा ठरला.अँटोनी ग्रिझमन याने 40व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करीत बार्सिलोनाला आघाडीवर आणले, पण दोन मिनिटांनी ऑस्कर डे …

Read More »

हिमाचल प्रदेशकडून महाराष्ट्राचा पराभव

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा बडोदा : वृत्तसंस्थारिषी धवनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर हिमाचल प्रदेशने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेण्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात महाराष्ट्रावर चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासह हिमाचल प्रदेशने गुणतालिकेत 16 गुणांनिशी दुसरे स्थान पटकावत बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्वप्नील …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा धडाकेबाज विजय

गिल, पंतची दमदार खेळी ब्रिस्बेन : वृत्तसंस्थाअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त विजय मिळवत मालिका 2-1 अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे कायम राखला. शुभमन गिल आणि ऋषभ पंत भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने 4 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. …

Read More »

सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था मोहम्मद सिराजचे पाच बळी आणि चार गडी बाद करून शार्दुल ठाकूरने दिलेली तोलामोलाची साथ या जोरावर भारताने ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाला 294 धावांपर्यंत रोखले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला 328 धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकबाबत संभ्रम

टोकियो : वृत्तसंस्था लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकबाबत काहीही घडू शकते, असे मत जपानचे संसदीय मंत्री तारो कोनो यांनी मांडले आहे. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितपणे आणि सर्वांची काळजी घेऊन टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येईल, असे संयोजन समिती आणि जपान सरकारद्वारे ठामपणे सांगितले जात असताना कोनो यांच्या वक्तव्याने मात्र ऑलिम्पिकबाबत संभ्रम निर्माण …

Read More »

धोनीचा विक्रम मोडण्यासाठी पंतला फक्त एका धावेची गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चौथ्या व अंतिम कसोटीतील पहिल्या डावात ऋषभ पंतने 23 धावांची छोटेखानी खेळी केली. यासह आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत पंतच्या नावावर 999 धावा झाल्या आहेत. कसोटीमध्ये एक हजार धावा करण्यासाठी एका धावेची गरज असतानाच तो बाद झाला. त्यामुळे धोनीच्या नावावरील विक्रम मोडण्यासाठी त्याला आता आणखी एका धावेची गरज …

Read More »

तुला परत मानला रे ठाकूर!; विराटकडून मराठमोळ्या अंदाजात शार्दुलची प्रशंसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी सुरुवातीला काहीशी डगमगली. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली. यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. भारताकडून पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक …

Read More »

भारताचे शेपूट ऑस्ट्रेलियाला पडले भारी; शार्दुल-वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था चौथ्या व निणार्यक ब्रिस्बेन कसोटीत मराठमोळा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांच्या भागिदारीच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत 33 धावांची आघाडी मिळाली असून, तिसर्‍या दिवसाखेर त्यांनी बिनबाद 21 धावा केल्याने एकूण आघाडी 54 …

Read More »

ब्रिस्बेन कसोटीत पावसाची खेळी; दुसर्‍या दिवसाखेर भारत दोन बाद 62

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पावसाने हजेरी लावली. सतत कोसळणार्‍या पावसामुळे पंच आणि सामनाधिकार्‍यांनी खेळ थांबवला. दुसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 307 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या …

Read More »

कुलदीपला संघात स्थान का नाही?

अजित आगरकरचा सवाल नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम ब्रिस्बेन कसोटीत डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान का नाही, असा सवाल माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने करून कुलदीपची संघात निवड करायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे. ब्रिस्बेन कसोटीसाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे कुलदीप यादव …

Read More »