ऑस्ट्रेलियाविरुद्ध विहारी-अश्विनची चिवट फलंदाजी सिडनी : वृत्तसंस्थादुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढून तिसरी कसोटी अनिर्णीत राखत बॉर्डर गावसकर मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करीत सामना वाचवला. …
Read More »रोहित शर्मावर चाहत्यांकडून झाला कौतुकाचा वर्षाव
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारोहितला आयपीएल खेळताना दुखापत झाली होती, पण दुखापतीनंतर येऊन रोहितने सिडनीमध्ये अर्धशतक झळकावले आणि त्याच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दुखापतीनंतर संघात येऊन अर्धशतक झळकावल्यावर चाहत्यांनी रोहितचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याची निवड कशी सार्थ आहे हे दर्शवण्याचाही प्रयत्न केला. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियातील …
Read More »भारतासमोर तगडे आव्हान
चौथ्या दिवशीही गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका सिडनी : वृत्तसंस्थासिडनी येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसर्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने दोन विकेट्सच्या बदल्यात 98 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजूनही 309 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाच्या दुसर्या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या होत्या आणि 406 धावांची आघाडी घेतली. …
Read More »ब्रिस्बेनमधील चौथी कसोटी पुन्हा संकटात लॉकडाऊनमुळे आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह
ब्रिस्बेन : वृत्तसंस्था कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांची कठोर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारीच ब्रिस्बेनमधील नियम शिथिल करण्याबाबतचे पत्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) मंडळाला दिले, परंतु या घटनेच्या 24 तासांच्या आतच ब्रिस्बेनमधील नव्या टाळेबंदीने …
Read More »चॅपल गुरुजींच्या संघात विराटची वर्णी; सचिन, द्रविडला स्थान नाही
मेलबर्न : वृत्तसंस्था भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी आपला सर्वकालीन कसोटीचा संघ जाहीर केला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वर्तमानपत्राच्या एका लेखामध्ये चॅपल यांनी आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे. चॅपल गुरुजींच्या संघात चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा भरणा आहे तसेच भारत आणि वेस्ट इंडिज या देशातील …
Read More »टीम इंडियाची घसरगुंडी सिडनी कसोटीमध्ये फलंदाजांची हाराकिरी; ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची भक्कम आघाडी
सिडनी : वृत्तसंस्था सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 338 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. त्यामुळे तिसर्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाने तिसर्या दिवशी भारतीय फलंदाजांना झटपट माघारी धाडले. त्यानंतर संयमी पण आक्रमकपणे …
Read More »आयपीएल-14साठी खेळाडूंचा होणार लिलाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाचे आयोजन यूएईत केले होते. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करीत सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले. त्यानंतर आता बीसीसीआयने पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे. आयपीएलच्या 14व्या …
Read More »महेंद्रसिंह धोनी होणार मालामाल!
आयपीएलमध्ये 150 कोटी पगार घेणारा पहिलाच खेळाडू रांची : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये सर्वाधिक पगार घेणार्या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनी अग्रस्थानावर आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासात त्याने सर्वांत जास्त म्हणजेच 137 कोटी पगार घेतला आहे आणि यंदा होणार्या आयपीएल-14मध्ये तो आणखी एक विक्रम नावावर करणार आहे. आयपीएलच्या पुढील पर्वात धोनी आयपीएलमध्ये …
Read More »यंदा बालेवाडीत रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा?
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि 64व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, ही स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणावर फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित …
Read More »बलाढ्य बॉडीबिल्डरवर भारतीय राहुलची पंजा लढवण्यात मात
दुबई : वृत्तसंस्था भारताचा नॅशनल आर्म रेसलिंग चॅम्पियन राहुल पॅनिकरने जगातील सर्वांत मजबूत बॉडीबिल्डर लॅरी व्हिर्ल्सला पंजा लढवण्याच्या स्पर्धेत दमदार मात दिली. याबद्दल राहुलचे कौतुक होत असून, त्याचा व्हिडीओही व्हायरल झालाय. राहुलने नुकतीच लॅरी व्हिर्ल्ससोबत आर्म रेसलिंग मॅच खेळली. इंडियन आर्म रेसलिंग फेडरेशनने सांगितले की, लॅरीसोबतचा हा सामना सोपा नव्हता. …
Read More »