Breaking News

क्रीडा

पुण्याच्या पराभवाची हॅट्ट्रिक

मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पुणेरी पलटण संघाला सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. बंगाल वॉरियर्सने पुण्यावर मात केली. पुण्याचे खेळाडू या सामन्यात बंगालच्या झंझावाताचा सामनाच करू शकले नाहीत. दुसरीकडे बंगालने अष्टपैलू खेळ करीत सामन्यात बाजी मारली. पहिल्या सत्रापासून बंगाल वॉरियर्सने आक्रमक खेळ करीत सामन्यात आघाडी घेतली होती. चढाईपटू …

Read More »

गेल वादळ घोंगावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेन्टी-20 लीगमध्ये जोरदार फटकेबाजी करीत शतक लगावले. त्याने या वादळी खेळीत 12 षटकार व 7 चौकारांसह 54 चेंडूंत 122 धावा चोपल्या. अर्धशतक होण्यापूर्वी गेल इतका आक्रमक नव्हता. त्याने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर …

Read More »

बॉक्सिंग चॅम्पियनशिपला खेळाडूंचा प्रतिसाद

बॉक्सिंग चॅम्पियनशिपला खेळाडूंचा प्रतिसाद पनवेल, उरण : वार्ताहर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने सब ज्युनिअर व ज्युनिअर कन्या चॅम्पियशनशिप जेएनपीटीच्या सहकार्याने उरण येथील जेएनपीटी वसाहत बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला. बेटी बचाओ बेटी पढावो यावर आधारित बॉक्सिंग स्पर्धेत राज्यातील 300 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये रायगड …

Read More »

भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी प्रवीण आम्रेंचा अर्ज

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदावरून सध्या कार्यरत असलेल्या संजय बांगरची गच्छंती अटळ असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांनी फलंदाज प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे बांगरचे पद धोक्यात आले आहे. ऑगस्ट 2014पासून बांगर भारतीय संघाचा फलंदाज प्रशिक्षक असून, त्याने काही काळ मुख्य प्रशिक्षकपदाची …

Read More »

रोहितसोबत मतभेद नाहीत : विराट

मुंबई : प्रतिनिधी अष्टपैलू खेळाडू, उपकर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत बेबनाव असल्याच्या बातम्यांचे कर्णधार विराट कोहलीने सोमवारी (दि. 29) स्वत: खंडन केले. आमच्यात बेबनाव असता, तर आम्ही सेमीफायनलपर्यंतचा पल्ला गाठलाच नसता, असे सांगतानाच या सर्व बातम्या हास्यास्पद असल्याचे विराटने सांगितले. विराटच्या या म्हणण्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही समर्थन केले. वेस्ट इंडिज …

Read More »

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सोमवारी (दि. 29) अधिकृत घोषणा केली. 1 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून या अजिंक्यपद स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील 14 ऑगस्टपासून सुरू होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि भारतीय संघाचा …

Read More »

आशिष कुमारला सुवर्ण; भारताची आठ पदकांची कमाई

बँकॉक ः वृत्तसंस्था आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या आशिष कुमारने शनिवारी (दि. 27) पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताने आठ पदकांची कमाई केली. जगातील 37 देशांच्या बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची …

Read More »

अल्टिमेट खो-खो लीग लांबणीवर!

मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता खो-खो लीग वर्षाअखेरीस किंवा पुढील वर्षीच्या प्रारंभी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोवा येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गेले दोन मुहूर्त मिळाले नव्हते; परंतु यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या …

Read More »

जपान ओपन : साईप्रणीतचे आव्हान अखेर संपुष्टात

टोकियो : वृत्तसंस्था भारताच्या बी. साईप्रणीतला जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. याबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.  पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित जपानच्या केंतो मोमोताने बी. साईप्रणीतचे आव्हान 21-18, 21-12 असे परतवून लावले. ही लढत 45 मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत केंतो अग्रस्थानी असून, …

Read More »

यू मुंबाची घरच्या मैदानावर विजयी सलामी ; पुणेरी पलटनवर 33-23 मात

मुंबई ः प्रतिनिधी यू मुंबाने होम लेगमध्ये पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. यू मुंबाने पुणेरी पलटनवर 33-23 अशी सहज बाजी मारली. दुसर्‍या सत्रात दोन लोण खाल्ल्यानंतर पुण्याने पराभव मान्य केला. सुरिंदर सिंग आणि फझल अत्राचली यांच्या पकडींनी पहिले सत्र गाजविले. सुरुवातीच्या काही मिनिटांत 2-5 अशा पिछाडीवर पडलेल्या यू मुंबाने नंतर …

Read More »