Breaking News

क्रीडा

तेलगू टायटन्सच्या पराभवाची हॅट्ट्रिक

इंदूर : वृत्तसंस्था प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना तेलगू टायटन्सने बुधवारी (दि. 24) आपल्या पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवली. अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने तेलगू टायटन्सवर 34-33 अशा एका गुणाच्या फरकाने मात केली. कोल्हापूरच्या सूरज आणि सिद्धार्थ देसाई या बंधूंनी या सामन्यात …

Read More »

संघनिवडीवरून ‘दादा’ नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या दौर्‍यात प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे यांचा विचार करण्यात करण्यात आलेला नाही. याबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने नाराजी व्यक्त केली आहे. टीम इंडियाचा विंडीज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दौर्‍यात उभय देशांमध्ये तीन ट्वेन्टी 20, …

Read More »

टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाच्या शर्यतीत जाँटी र्होड्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख असणार्‍या दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी र्‍होड्सने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) अर्ज केला आहे. दक्षिण अफ्रिका संघासाठी खेळत असताना र्‍होड्स क्षेत्ररक्षक म्हणून खूप मोठे योगदान दिले होते. त्यानंतर त्याची जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख निर्माण झाली. …

Read More »

जेएनपीटी फुटबॉल क्लब ठरला भावी आमदार चषकाचा मानकरी

उरण : वार्ताहर येथील मुनस्टार फुटबॉल क्लब आयोजित भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जेएनपीटी फुटबॉल क्लबने पटकाविले आहे. आरडीएफसी जसखार संघ उपविजेता ठरला. उरणच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात ही स्पर्धा रंगली. बेस्ट प्लेअर स्वप्नील म्हात्रे, बेस्ट स्ट्रायकर बापू, बेस्ट डिफेंडर आनंद आणि बेस्ट गोलकीपर म्हणून मुन्ना यांची निवड करण्यात आली. …

Read More »

‘मान्सून रन’ला नवी मुंबईकरांचा प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्मार्ट कॉन्सेप्टजच्या वतीने आयोजित ‘मान्सून रन’ला रविवारी (दि. 21) नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘मासिक पाळीतील स्वच्छता’ अशी थीम असलेल्या या जनजागृतीपर स्पर्धेत 3093 स्पर्धकांनी सहभाग घेतला. मुग्धा कथुरिया यांनी स्थापित केलेल्या स्मार्ट कॉन्सेप्टजच्या माध्यमातून गेली चार वर्षे वर्षा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. आपल्या समाजात …

Read More »

विंडीजचा ट्वेन्टी-20 संघ जाहीर

भारताविरुद्ध पोलार्ड, रसेल, ब्रेथवेट संघात केपटाऊन : वृत्तसंस्था भारतीय संघाविरुद्ध होणार्‍या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा ट्वेन्टी-20 संघ जाहीर करण्यात आला. या संघात किएरॉन पोलार्ड, आंद्रे रसल, कार्लोस ब्रेथवेट, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय फिरकीपटू सुनील नरिन याचेही संघात पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिज …

Read More »

अखेरच्या वन डे सामन्यात विजयासह भारत अ संघाने मालिका जिंकली

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचे शतक एका धावेने हुकले मुंबई ः प्रतिनिधी पाचव्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघावर मात करत मालिकेत 4-1ने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 237 धावांचे आव्हान भारतीय संघाने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतीय संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज …

Read More »

धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात

मुंबई ः प्रतिनिधी 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप धोनीने निवृत्तीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यात मात्र आपण खेळणार नसल्याचे धोनीने निवड समितीला कळवले आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात निवडायचे की नाही, हा निर्णय निवड समितीनेच …

Read More »

तमिम इक्बालकडे बांगलादेशचे नेतृत्व

ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझा मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे मोर्तझाच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज तमिम इक्बालकडे बांगलादेशचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 26 ते 31 जुलैदरम्यान कोलंबोत रंगणार्‍या या एकदिवसीय मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी अष्टपैलू शाकिब अल हसन …

Read More »

‘ढिंग एक्स्प्रेस’ सुऽऽसाट ; हिमा दासने जिंकले पाचवे सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ’ढिंग एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली भारताची स्टार धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून, तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्री. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.09 सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक पटकाविले. गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणार्‍या …

Read More »