Breaking News

क्रीडा

वेस्ट इंडिज दौर्‍याआधी शंकर देणार फिटनेस टेस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आगामी वेस्ट इंडिज दौर्‍याआधी फिटनेस टेस्ट देणार आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत शंकरला ही टेस्ट द्यावी लागेल. विश्वचषक स्पर्धेत सरावादरम्यान जसप्रीत बुमराहचा यॉर्कर चेंडू विजय शंकरच्या पायाला लागला होता. या दुखापतीमुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते. विश्वचषक स्पर्धेसाठीच्या 15 …

Read More »

हिमा दासची ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक ; तिसरी स्पर्धा जिंकून रचला इतिहास

झेक प्रजासत्ताक : वृत्तसंस्था भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने 11 दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या क्लांदो स्मृती अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन …

Read More »

धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवणे संघाचा निर्णय : शास्त्री

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर टीका होत असतानाच टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी अखेर मौन सोडले आहे. धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता, असे स्पष्टीकरण शास्त्रींनी दिले आहे. ‘धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता. सर्व खेळाडूंचे …

Read More »

भारताची विंडीजवर मात

अ संघांमधील सामन्यात अहमद, अय्यर चमकले केपटाऊन : वृत्तसंस्था श्रेयस अय्यर आणि खलिल अहमद यांच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारत अ संघाने पहिल्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अकीम जॉर्डन आणि रोस्टन चेसच्या भेदक मार्‍यासमोर भारत अ संघाचा डाव 190 धावांत आटोपला, …

Read More »

दहा वर्षांत 27 कोटी भारतीय गरिबीमुक्त

नवी दिल्ली : गरिबी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणार्‍या 10 देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स 2019 (एमपी)च्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. हा रिपोर्ट ऑक्सफोर्ड पॉवर्टी अ‍ॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी मिळून तयार केला आहे. रिपोर्टनुसार, भारताने आपल्या येथील गरिबी 55.1 टक्क्यांवरून 27.9 …

Read More »

भारताचा विश्वचषक हुकला, पण संघ स्पर्धेत चमकला!

मुंबई : प्रतिनिधी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवाने भारताची मोहीम संपुष्टात आली. यासह जगभरातील अब्जावधी क्रिकेट चाहत्यांचाही हिरमोड झाला, पण भारताने यंदाच्या स्पर्धेत छाप पाडली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावताच रोहित शर्मा विश्वक्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत पोहोचला. सलग तीन सामन्यांत …

Read More »

जेसन रॉयला सामना मानधनातील 30 टक्के दंड

लंडन : वृत्तसंस्था यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला, पण या सामन्यात इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉयला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शिक्षा सुनावली आहे. 20व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेने गेला होता. त्यावर रॉयने फटका मारण्याचा प्रयत्न …

Read More »

चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे आम्हाला भोवले -रवी शास्त्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारा भारतीय संघ उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या मार्‍यासमोर ढेपाळला. भारताचे दिग्गज फलंदाज मोक्याच्या क्षणी झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे आम्हाला भोवल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मान्य केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. शास्त्री …

Read More »

नशीबाने चेंडू स्टंपला लागला : गप्टिल

लंडन : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात निर्णायक क्षणी मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीमुळे महेंद्रसिंह धोनी धावचीत झाला आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. धोनी धावबाद झाल्याने सामन्याला शेवटच्या क्षणी कलाटणी मिळाली असे मत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामन्यानंतर व्यक्त केले, मात्र आमचे नशीब बलवत्तर असल्याने तो चेंडू स्टंपला लागला, असे मत गप्टिलने …

Read More »

मोक्याच्या क्षणी अपयशी ठरलो; रोहितची कबुली

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या पराभवानंतर रोहित शर्माने ट्विट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मोक्याच्या क्षणी आम्ही अपयशी ठरलो. जेव्हा संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा …

Read More »