Breaking News

क्रीडा

सराव सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव ; धोनी आणि लोकेश राहुलची शतकी खेळी

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषकापूर्वीच्या दुसर्‍या आणि अखेरच्या सराव सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीचा चांगलाच सराव केला आहे. सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 95 धावांनी जिंकला. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने धावांचा डोंगर रचण्यात यश आलं. टीम इंडियाने या सामन्यात बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं, …

Read More »

सराव सामन्यात इंग्लंडचा अफगाणिस्तानवर विजय

लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने वर्ल्डकप सराव सामन्यात मात्र अफगाणिस्तानवर सहज विजय मिळवला. जोफ्रा आर्चर आणि जो रूटच्या अचूक गोलंदाजीमुळे इंग्लंडने अफगाणिस्तानला 38.4 षटकांत 160 धावांत रोखले. यानंतर जेसन रॉयच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने विजयी लक्ष्य 17.3 षटकांतच पूर्ण केले. अफगाणिस्तान संघाने …

Read More »

पहिल्या वर्ल्ड कपची कथा आता मोठ्या पडद्यावर

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाने 1983 सालचा क्रिकेट विश्वचषक रोमहर्षक पद्धतीने जिंकला होता. या वर्ल्डकपची कथा आता बायोपिकच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘83’ या चित्रपटाद्वारे 1983 सालच्या वर्ल्डकपच्या आठवणी जागृत करण्यात येणार आहेत. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह हा कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. तर आदिनाथ कोठारे …

Read More »

राहीचा ‘सुवर्ण’वेध; ऑलिम्पिक प्रवेश निश्चित

म्युनिक : वृत्तसंस्था भारताच्या राही सरनोबतने जर्मनीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजीत सुवर्ण पदकाची कमाई केली. राहीने महिलांच्या 25 मीटर्स पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या कामगिरीने राहीला 2020 मधल्या टोकिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवून दिलं आहे. 25 मीटर्स पिस्टल प्रकारातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिलीच भारतीय नेमबाज ठरली. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात …

Read More »

‘लाख’ मोलाच्या महिला क्रिकेट चाहत्या

लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होत असलेल्या वर्ल्डकपचे एक वैशिष्ट्य पाहायचे झाले, तर या स्पर्धेसाठी तब्बल एक लाख महिला क्रिकेट चाहत्यांनी तिकिटांची खरेदी केली आहे. आतापर्यंत वर्ल्डकपसाठी महिलांनी दिलेली ही सर्वाधिक पसंती आहे. स्पर्धा संचालक स्टीव्ह इलवर्दी यांनी ही माहिती दिली आहे. इलवर्दी म्हणतात की, या वर्ल्डकपला …

Read More »

रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धेत गार्डन टीम विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त येथे रविवारी (दि. 26) सिडको गार्डन पनवेल पिल्ले कॉलेजसमोर रोटरी क्लब इंडस्ट्रीयल टाऊन पनवेल यांच्या विद्यमाने रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, डेप्युटी डायरेक्टर (स्पोर्ट्स) महाराष्ट्र राज्य व्ही. सी. म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल …

Read More »

राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी

नागोठणे : प्रतिनिधी अ‍ॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, दिल्ली लगोरी संघटनेच्या वतीने लगोरीचे जनक क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त आठवी सिनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद व एशियन निवड चाचणी स्पर्धा नुकतीच नवी दिल्ली येथे झाली. या स्पर्धेत 15 राज्य सहभागी झाले होते. या स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला …

Read More »

यंदाच्या वर्ल्ड कपमधील डार्क हॉर्स न्यूझीलंड

लंडन : वृत्तसंस्था 30 मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये अनेक टीम या तगड्या आहेत. न्यूझीलंडच्या संघाला या वर्ल्ड कपमध्ये डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जात आहे. या संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकाला गवसणी घालता आलेली नाही, मात्र या संघानं नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केलेली आहे. …

Read More »

फ्रेंच ओपन; 2015 नंतर रॉजर फेडरर जिंकला!

पॅरिस : वृत्तसंस्था रॉजर फेडररने रविवारी क्ले कोर्टवरील फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. 2015नंतर प्रथमच फेडररने या स्पर्धेत विजय मिळवला आहे. नूतनीकरण पार पडलेल्या फिलिप कार्टिरर संकुलात पार पडलेल्या सलामीच्या लढतीत वीस ग्रँडस्लॅम जेतेपदांचा धनी असलेल्या फेडररने नवोदित लॉरेंझो सोनेगोला 6-2, 6-4, 6-4 असे नमवले. 2016मध्ये पाठदुखीमुळे …

Read More »

नेमबाजी विश्वचषकात अपूर्वीचा ‘सुवर्ण’वेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या वर्षातील तिसर्‍या आयएसएसएफ रायफल पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत रविवारी चुरशीच्या लढतीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. जयपूरच्या या नेमबाजाने अंतिम फेरीमध्ये एकूण 251 गुण नोंदवले. तिच्या वर्चस्वापुढे चीनच्या वांग लुयाओ 205.8 गुणांसह …

Read More »