तिरुपती : वृत्तसंस्था 2019 सालच्या आयपीएलची फायनल 12 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यासाठी मुंबईची टीम हैदराबादमध्ये दाखल झाली आहे, पण मुंबई टीमचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याची पत्नी आणि मुलीसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेला होता. रोहित शर्माबरोबरच भारतीय टीमचा खेळाडू दिनेश कार्तिकनेही बालाजीचं दर्शन घेतलं. 7 मे रोजी चेन्नईविरुद्ध …
Read More »रोजा असूनही खेळणार्या त्या दोघांना धवनचा सलाम
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था आयपीएलचा 12वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. पहिल्या एलिमिनेटरमध्ये दिल्लीने हैदराबादचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. हैदराबादकडून राशिद खानने दोन विकेट घेतल्या, तर ऑलराऊंडर मोहम्मद नबीने 13 बॉलमध्ये 20 धावांची खेळी केली. या दोघांच्या चांगल्या कामगिरीनंतरही हैदराबादला ही मॅच जिंकता आली नाही. असं असलं तरी दिल्लीचा ओपनर …
Read More »दोन मिनिटांत फायनलची तिकिटे संपली ; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
हैदराबाद : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्या मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी होणार्या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेता जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सला आव्हान देणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेली फायनल लढत याची देही… पाहण्यासाठी …
Read More »हॉकीच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात भारताची विजयी सुरुवात
पर्थ : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या थंडरस्टिक्स संघावर 2-0 ने विजय नोंदवून ऑस्ट्रेलिया दौर्याची सकारात्मक सुरुवात केली. वीरेंद्र लाक्रा याने 23 व्या, तसेच हरमनप्रीतने 50 व्या मिनिटाला गोल केला. भारताला 15 तसेच 17 मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. उभय संघांनी पहिल्या क्वॉर्टरमध्ये वेगवान …
Read More »श्री धापया महाराज कुस्ती स्पर्धा ; कोकरे अजिंक्य, तर चव्हाण आखाडा किंग
कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय्य तृतीयेपासून सुरू झाला. त्यानिमित्ताने शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या कुस्तीच्या आखाड्यात आयोजित केलेल्या कुस्त्यांमध्ये गेल्या वर्षी अजिंक्य ठरलेला रसायनीचा विशाल कोकरे आणि दिल्लीचा मनजीत यांच्यात कुस्ती रंगली, परंतु कुस्ती ऐन रंगात आली असता मनजितने अचानक आखाडा सोडल्याने विशालला …
Read More »अटीतटीच्या सामन्यात दिल्ली विजयी ; आज चेन्नईशी भिडणार
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. दिल्लीने हैदराबादचा 2 गडी राखून पराभव केला. पंतच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्लीने एलिमिनेटर सामना जिंकला आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतने ताबडतोड खेळी केली. त्याने 21 चेंडूत 49 रन कुटल्या. दिल्लीने विकेट गमावल्यानंतर पंतने एकाकी खिंड लढवत दिल्लीला विजय मिळवून दिला. पंतचे दिल्लीच्या …
Read More »राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत रिद्धी व सिद्धीची सुवर्ण कामगिरी
औरंगाबाद : प्रतिनिधी पुणे येथे नुकत्याच झालेल्या 55व्या कनिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली. सिद्धी हत्तेकर हिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली, तर रिद्धीने एक सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राच्या यशात निर्णायक योगदान दिले. खेलो …
Read More »तिरंदाजीत भारतीय पुरुष संघ चौथ्या स्थानी
शांघाय : वृत्तसंस्था प्रशिक्षकाविना खेळणार्या भारतीय पुरुष संघाने येथे सुरू झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या कंपाऊंड प्रकारात पात्रता फेरीत चौथे स्थान मिळविले. प्रवीण कुमार याने वैयक्तिक गटात नववे स्थान मिळविले.प्रवीणने 704 गुणांची कमाई केली. यानंतर लवज्योत आणि गुरविंदर यांच्या सोबतीने प्रवीणने भारतीय संघासाठी 2091 गुणांची कमाई करीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारताची …
Read More »विश्वचषकासाठी भारताची मदार शिखर धवनवर
दिल्ली : वृत्तसंस्था आजवरच्या विश्वचषक स्पर्धांसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघांपैकी सर्वोत्तम संघ म्हणून या वेळच्या संघाकडे पाहिले जात आहे. इंग्लंडमधील वातावरणाचा आणि खेळपट्ट्यांचा फायदा उठवू शकणारे विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार अशा अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यातील सलामीवीर शिखर …
Read More »लिंबा राम यांना क्रीडा मंत्रालयाकडून मदतीचा हात
दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेले भारतीय तिरंदाजीतील पहिले विश्वविक्रमी नाव म्हणून ज्या लिंबा राम यांचे नाव घेतले जाते, त्यांना आजारपणात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लिंबा राम यांच्यावरील उपचारांसाठी पाच लाख रुपयांच्या अतिरिक्त आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 1992च्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper