नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी या लढतीत त्यांनी तब्बल सात विक्रम रचले. 1. भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या सामन्यात तीन विकेट्स पटकावले. या तीन बळींसह त्याने ट्वेन्टी-20 कारकिर्दीमध्ये 51 विकेट्स पूर्ण केले. …
Read More »टीम इंडियाकडून निषेध अन् श्रद्धांजली
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात काळ्या फिती बांधून खेळ केला, तसेच मैदानावर मौन पळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यानंतर भारताने …
Read More »अफगाणिस्तानचा आयर्लंडला व्हाईटवॉश
डेहराडून : वृत्तसंस्था भारतीय संघाला ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, पण त्याच वेळी डेहरादून येथे सुरू असलेल्या टी-20त अफगाणिस्तान संघाने तिसर्या सामन्यातही आयर्लंडला नमवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. अफगानिस्तानच्या विजयात फिरकी गोलंदाज खान चमकला. अफगाणिस्तानने मोहम्मद नबीच्या 36 चेंडूंतील 81 धावांच्या जोरावर 7 बाद 210 धावांचा डोंगर …
Read More »भारतीय संघ हरला, पण बुमराने पराक्रम गाजवला!
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात बुमराहने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला, तरी बुमराने एका विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू आर. अश्विन याच्यानंतर टी-20मध्ये बळींचे अर्धशतक करणारा तो …
Read More »धोनीची संथ खेळी
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यातील ‘टुकूटुकू’ फलंदाजीमुळे धोनी हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक संथगतीने फलंदाजी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 126 …
Read More »भारतीय रेल्वे अजिंक्य
पं. दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा हिसार : वृत्तसंस्था हरियाणातील हिसार येथे झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अखिल भारतीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय रेल्वेने सेनादलाला 31-27 असे पराभूत करीत विजेतेपदाचा चषक व रोख एक कोटी रुपये आपल्या नावे केले. उपविजेत्या …
Read More »चिंचपाड्यात आर. आर. स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त रमेश रामा भोईर यांच्या स्मरणार्थ नियती स्पोर्ट्सच्या वतीने आर. आर. स्मृतिचषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चिंचपाडा येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) झाले. उद्घाटन समारंभास विनोद भोईर, रोहिदास नाईक, नंदकुमार भोईर, वासुदेव भोईर, …
Read More »टीम इंडियाची परदेश भरारी
ऑस्ट्रेलिया संघाला कसोटीत तब्बल 72 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ‘किवीं’ना पराभूत करून टीम इंडियाने ‘10 इयर चॅलेंज’ही यशस्वीपणे पूर्ण केले. आता ‘विराटसेना’ पुन्हा एकदा ‘कांगारूं’शी मायदेशात भिडणार आहे. सध्याचा भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, प्रत्येक खेळाडूला पर्याय उपलब्ध आहे. असे असूनही संघ कधी कधी मोक्याच्या वेळी …
Read More »भारतीय महिलांची इंग्लंडविरुद्ध विजयी सलामी
मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिलांनी पहिला एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 66 धावांनी दमदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती फिरकीपटू एकता बिश्त. एकताने या सामन्यात चार बळी मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 136 धावाच करता आल्या. …
Read More »आम्ही सरकारसोबत : कोहली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांनी याबाबत आपली मते मांडल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही मौन सोडले आहे. ‘पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper