Breaking News

क्रीडा

धोनीची संथ खेळी

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यातील ‘टुकूटुकू’ फलंदाजीमुळे धोनी हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक संथगतीने फलंदाजी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 126 …

Read More »

भारतीय रेल्वे अजिंक्य

पं. दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा हिसार : वृत्तसंस्था हरियाणातील हिसार येथे झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अखिल भारतीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय रेल्वेने सेनादलाला 31-27 असे पराभूत करीत विजेतेपदाचा चषक व रोख एक कोटी रुपये आपल्या नावे केले. उपविजेत्या …

Read More »

चिंचपाड्यात आर. आर. स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त रमेश रामा भोईर यांच्या स्मरणार्थ नियती स्पोर्ट्सच्या वतीने आर. आर. स्मृतिचषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चिंचपाडा येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) झाले. उद्घाटन समारंभास विनोद भोईर, रोहिदास नाईक, नंदकुमार भोईर, वासुदेव भोईर, …

Read More »

टीम इंडियाची परदेश भरारी

ऑस्ट्रेलिया संघाला कसोटीत तब्बल 72 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ‘किवीं’ना पराभूत करून टीम इंडियाने ‘10 इयर चॅलेंज’ही यशस्वीपणे पूर्ण केले. आता ‘विराटसेना’ पुन्हा एकदा ‘कांगारूं’शी मायदेशात भिडणार आहे. सध्याचा भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, प्रत्येक खेळाडूला पर्याय उपलब्ध आहे. असे असूनही संघ कधी कधी मोक्याच्या वेळी …

Read More »

भारतीय महिलांची इंग्लंडविरुद्ध विजयी सलामी

मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिलांनी पहिला एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 66 धावांनी दमदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती फिरकीपटू एकता बिश्त. एकताने या सामन्यात चार बळी मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 136 धावाच करता आल्या. …

Read More »

आम्ही सरकारसोबत : कोहली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांनी याबाबत आपली मते मांडल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही मौन सोडले आहे. ‘पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय …

Read More »

अपूर्वीचा विश्वविक्रमी ‘सुवर्ण’वेध!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेलाने विश्वविक्रमी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मी. एअर रायफल प्रकारात अपूर्वीने भारताला विश्वचषक स्पर्धेत पदकाची कमाई करून देत धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे. या स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गील आणि एल्वेनिल वेल्वेरियन या खेळाडूही उतरल्या होत्या, मात्र पात्रता फेरीचा अडथळा दूर …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-20साठी भारत सज्ज

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला ट्वेन्टी-20 सामना रविवारी (दि. 25) विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून लोकेश राहुल भारतीय संघात पुनरागमन करणार असून, रिषभ पंतलाही आघाडीला खेळण्याची संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणार्‍या भारतीय संघाला ट्वेन्टी-20 मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पावसामुळे …

Read More »

भारत-पाक सामन्याबाबतचा निर्णय सरकारशी चर्चेनंतरच : बीसीसीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये म्हणून दबाव वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीने याबाबतचा चेंडू सरकारकडे टोलवला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळावा अथवा खेळू नये, याचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय …

Read More »

रायगड पोलीस संघ उपांत्य फेरीत

मुंबई : प्रतिनिधी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात एअर इंडिया, महिंद्रा, देना बँक या मुंबईच्या संघांबरोबर रायगडच्या पोलीस संघाने; तर महिला गटात महात्मा गांधी, संघर्ष या उपनगरच्या संघांबरोबर मुंबईचा शिवशक्ती आणि खेड-रत्नागिरीचा अनिकेत स्पोर्ट्स यांनी उपांत्य फेरीत …

Read More »