Breaking News

क्रीडा

टीम इंडिया द. आफ्रिकेत पोहचली

केपटाऊन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या भक्कम इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहचली आहे. आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता भारतीय संघ क्वारंटाइन झाला आहे. भारतीय कसोटी संघ गुरुवारी सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आणि गुरुवारी संध्याकाळी दक्षिण …

Read More »

ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात; इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या कसोटीत पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित

अ‍ॅडलेड ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा सामना अ‍ॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. यजमानांकडून मार्नस लाबुशेनने शतक ठोकत 103 धावा केल्या. यासह गुलाबी चेंडू कसोटीत तीन शतके झळकावणारा लाबुशेन पहिला फलंदाज ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा …

Read More »

भारताकडून यजमान बांगलादेशचा धुव्वा

चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा नवी दिल्ली : वृत्तसंस्था आघाडीपटू दिलप्रीत सिंगने साकारलेल्या हॅट्ट्रिकमुळे गतविजेत्या भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत बुधवारी दुसर्‍या साखळी सामन्यामध्ये यजमान बांगलादेशचा 9-0 असा धुव्वा उडवला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. सलामीच्या लढतीत कोरियाने 2-2 असे बरोबरीत रोखल्यानंतर भारताने बांगलादेशविरुद्ध आक्रमक शैलीत …

Read More »

सुयश, प्रियंकाकडे महाराष्ट्राच्या संघांचे नेतृत्व

मुंबई : प्रतिनिधी जबलपूर, मध्य प्रदेश येथे 26 ते 30 डिसेंबरदरम्यान होणार्‍या 54व्या राष्ट्रीय अंजक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी बुधवारी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले. पुण्याचा सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे या स्पर्धेत अनुक्रमे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व करतील. सोलापूर येथे झालेल्या राज्य अंजक्यपद स्पर्धेतील कामगिरीद्वारे या संघांची निवड …

Read More »

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर रवाना

विराट मात्र फोटोंमधून गायब नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या संबंधीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार विराट कोहली या फोटोंमध्ये दिसत नाही. भारतीय संघ दौर्‍यावर जात असेल आणि …

Read More »

रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी; पेझारी, भेंडखळ येथे स्पर्धेला प्रारंभ

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा पुरुष गटाच्या  अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत चार ठिकाणी खेळली जाणार आहे. बुधवारी  (दि. 15) पेझारी (ता. अलिबाग) व भेंडखळ (ता. उरण) येथे या स्पर्धेला प्रारंभ झाला. 17 डिसेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील सहाण येथे अंतिम फेरी खेळली जाणार …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत अय्यान इलेव्हन थळ संघ ठरला ‘चॅम्पियन’

माणगाव ः प्रतिनिधी येथील सुपर सिलेक्टर्स संघाने आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत थळ (अलिबाग) संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन दाखवत चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यात अप्पर तुडील संघाचा दारुण पराभव करीत विजेतेपद पटकाविले. माणगावजवळील निळगुण फाटा येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ए वन निजामपूर संघाने तृतीय क्रमांक …

Read More »

महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकप; भारत-पाकिस्तान 6 मार्चला भिडणार

दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार्‍या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 6 मार्च रोजी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 4 मार्च रोजी होणार्‍या सामन्याने होईल. 31 दिवस चालणार्‍या …

Read More »

खेलो इंडिया अंतर्गत ‘सीकेटी’त कुस्ती सामने

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जिमखाना समितीच्या वतीने मंगळवारी (दि.14) खेलो इंडिया अंतर-विद्यापीठीय कुस्तीचे निवड सामने आयोजित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. या सामन्यांसाठी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मोहन अमृले प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; पुण्याला दुहेरी मुकुट

सोलापूर ः प्रतिनिधी महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अमॅचूर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने 57 वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे झाली. या स्पर्धेत पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला. यापूर्वी 1995-96 साली कुळगाव (ठाणे) येथे झालेल्या 34 व्या पुरुष- महिला राज्य …

Read More »