Breaking News

क्रीडा

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कौशल्यात आणखी भर पडावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 10 ते 13 डिसेंबरदरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …

Read More »

टीम इंडियाचा ‘विराट’ विजय

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मात मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल 372 धावांनी नमवले. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसर्‍या डावात 167 धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वांत मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला …

Read More »

ट्वेन्टी-20 मालिकेतील निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे -रोहित; अश्विनचे खास कौतुक

कोलकाता ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील 3-0 अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे भारताचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. ट्वेन्टी-20 सामन्यातील मधल्या षटकांत संघाला बळींची नितांत आवश्यकता असते तेव्हा रविचंद्रन अश्विन हा नेहमीच कर्णधाराचा हुकमी पर्याय असतो, अशा शब्दांत कर्णधार रोहितने त्याची प्रशंसा केली. ईडन गार्डन्सवर भारताने …

Read More »

‘यलो ब्रिगेड’ जोमात; तामिळनाडूच्या विजयानंतर अनोखी हॅट्ट्रिक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था येथील स्टेडियमवर रंगलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने विक्रमी विजेतेपद मिळवले. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 5 धावांची आवश्यकता असताना प्रतिक जैनच्या चेंडूवर शाहरुख खानने उत्तुंग षटकार लगावत संघासाठी विजयश्री खेचून आणली. तामिळनाडूच्या विजयामुळे एक अजब असा योगायोग पाहायला मिळाला. क्रिकेटच्या क्षेत्रात यंदा काही मोजक्या मोठ्या …

Read More »

टीम इंडियाला मोठा धक्का; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून राहुल ‘आऊट’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज लोकेश राहुल हा दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला. त्याच्या जागी मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसी आय) ट्विट करून दिली. भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्धची …

Read More »

अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने कुस्तीच्या खुल्या दंगली (स्पर्धा) आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सोमवारी (दि. 22) दुपारी 1.30 वाजता बेलवली-वारदोली येथील माऊली मैदानात होणार आहे. स्पर्धेचे आयोजक भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील आणि बेलवली अध्यक्ष सतीश …

Read More »

फिटनेससाठी डॉक्टरांचा पुढाकार ; क्रीडा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग-मुरूडमधील डॉक्टरांनी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अलिबागजवळील आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय उपचाराबरोबरच शरीर फिट ठेवण्यासाठी वैयक्तिक व सांघिक खेळ महत्त्वाचे असल्याचा संदेश यातून देण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अलिबाग व मुरूड मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, …

Read More »

पनवेलच्या यश वनवेरूची संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः वार्ताहरफुटबॉलमध्ये महत्त्वाची असलेल्या संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी पनवेलमधील यश वनवेरू या युवा खेळाडूची महाराष्ट्र संघात निवडझाली आहे.यश वनवेरू हा रायगडमधून अनेक वर्षांनंतर निवडलेला पहिला खेळाडू आहे. त्याच्याबरोबरच सिद्धार्थ कोलाको, मध्यभागी, अलझार दिल्लीवाला, बचावपटू, अद्वैत शिंदे, मिड फिल्डर (सर्व रा. नवी मुंबई) यांचीसुद्धा संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे …

Read More »

आरपीएलमधील चार खेळाडू महाराष्ट्र संघात

कर्जत ः बातमीदाररायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या रायगड प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत असलेल्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेस्ट झोन स्पर्धेसाठी हे चार खेळाडू रायगडचे  प्रतिनिधित्व करतील.उरण येथील जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी येथील एनआयएसएम क्रिकेट मैदानावर 25 वर्षाखालील टी-20 स्पर्धा सुरू आहे. या …

Read More »

दीपक मोकल यांना राष्ट्रीय खेळ गौरव पुरस्कार प्रदान

रेवदंडा : प्रतिनिधीयेथील क्रीडाशिक्षक दीपक मोकल यांना नुकतेच राष्ट्रीय खेळ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय खेळ विकास परिषदेच्या वतीने देण्यात येत असलेला हा पुरस्कार नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलिबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलिबॉल …

Read More »