Breaking News

क्रीडा

भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता; श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव

दुबई : वृत्तसंस्था भारताचा अंडर-19 संघ आशिया कप चॅम्पियन बनला आहे. दुबईत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने डीएलएस पद्धतीनुसार श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. यासह ज्युनियर इंडियन टीम इंडियाने विक्रमी आठव्यांदा अंडर-19 आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा …

Read More »

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या महिलांची विजयी पताका

जबलपूर : वृत्तसंस्था बहुप्रतिक्षित वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद  स्पर्धेतील दोन्ही गटांची अंतिम फेरी अपेक्षेप्रमाणे कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये रंगली, परंतु यंदा महाराष्ट्राच्या महिलांनी 2019मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढत भारतीय विमानतळ प्राधिकरणाला धूळ चारून जबलपूरमध्ये विजयी जल्लोष केला, मात्र रेल्वेविरुद्ध पुरुषांचे सलग दुसर्‍यांदा विजेतेपद हुकले आहे.  महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या अंतिम …

Read More »

आशिया कपसाठी नवी मुंबईत फुटबॉल क्रीडांगण सज्ज

नवी मुंबई ः बातमीदार 17 वर्षाखालील महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या स्पर्धेच्या शुभारंभाचा आणि अंतिम सामना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. याशिवाय स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण …

Read More »

प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीची ‘दबंगगिरी’

गतविजेत्या बंगाल वॉरियर्सला लोळवले बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली दबंगने बंगाल वॉरियर्सला एकतर्फी लोळवले, तर दुसर्‍या सामन्यात यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. दिल्लीने तिसरा विजय मिळवत यंदाच्या हंगामात अजिंक्य राहाण्याची मालिका कायम ठेवत अव्वल स्थानी झेप घेतली, तर …

Read More »

भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

 पहिली कसोटी जिंकून ‘विराटसेने’ची मालिकेत आघाडी सेंच्युरिअन ः वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्षाची अखेर आनंदी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने 118 धावांनी ऐतिहासिक असा विजय साकारला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सेंच्युरियन मैदानावर भारताने कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. …

Read More »

कर्णधार निवडीबाबतचा अंतर्गत तपशिल सांगण्यास द्रविडचा नकार

सेंच्युरियन : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाबाबत निवड समितीशी झालेल्या अंतर्गत संभाषणाचा तपशील सांगण्यास भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी (दि. 25) नकार दिला; पण कर्णधारपदाचा निर्णय हा निवड समितीच्या कक्षेत येतो, हे मात्र द्रविडने स्पष्ट केले. कोणत्याही कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला होणार्‍या कर्णधार पत्रकार परिषदेला सामोरा जातो; …

Read More »

प्रो कबड्डी : यूपी योद्धाची पाटणा पायरेट्सवर मात; तर पुणेरी पलटणची बाजी

बंगळुरू : वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामाच्या चौथ्या दिवशीचा पहिला सामना हा पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा असा झाला. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या सामान्यात अखेर यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर 36-35 असा एका गुणाने विजय मिळवला. या सामन्यात यूपीचा प्रदीप नरवाल 12 गुण घेत …

Read More »

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्रासाठी कोरोना, थंडीसह अडथळ्यांची शर्यत

जबलपूर : वृत्तसंस्था मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील एमएलबी क्रीडांगणावर सुरू असलेल्या 54व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांपुढे यंदा जेतेपदाच्या मार्गावर परतण्याचे कठीण आव्हान असेल, मात्र रेल्वे, भारतीय विमानतळ प्राधिकरण या संघांकडून मिळणार्‍या कडव्या झुंजीसह जबलपूरमधील वाढती थंडी आणि करोनाचाही खो-खोपटूंना मुकाबला करायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य …

Read More »

ब्रायन लारा, डेल स्टेन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून प्रशिक्षकपदी नियुक्त

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज डेल स्टेन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सहभागी झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने लाराला फलंदाजी प्रशिक्षक आणि स्टेनला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. टॉम मूडी हे हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एका …

Read More »

आयपीएल मेगा लिलावाच्या तारखा ठरल्या?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएल लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. वृत्तानुसार आयपीएल 2022चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकार्‍यांनी सर्व फ्रेंचायझींना याबाबत माहिती दिली आहे. या वेळी 10 संघ लिलावात सहभागी होतील. यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या नव्या दोन संघांचा समावेश आहे. …

Read More »