Breaking News

क्रीडा

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड रविवारी अंतिम लढत

दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 14) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. हा सामना दुबई येथील स्टेडियमवर खेळला जाईल. यानिमित्ताने या स्पर्धेला यंदा नवा विश्वविजेता मिळणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मात देऊन अंतिम …

Read More »

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा; विवेक प्रसाद भारताचा कर्णधार

भुवनेश्वर ः वृत्तसंस्था भुवनेश्वर येथे 24 नोव्हेंबरपासूर सुरू होणार्‍या एफआयएच कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विवेक सागर प्रसाद करणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. याआधी 2016मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकाविले होते. भारतीय संघात कर्णधार विवेक सागर …

Read More »

ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत; वेड-स्टॉइनिसच्या फटकेबाजीमुळे पाकिस्तावर मात

दुबई ः वृत्तसंस्था मॅथ्यू वेड (17 चेंडूंत नाबाद 41) आणि मार्कस स्टॉइनिस (31 चेंडूंत नाबाद 40) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला आणि दुसर्‍यांदा ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने दिलेले 177 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 19 …

Read More »

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा लांबणीवर

इस्तंबूल ः वृत्तसंस्था टर्कीमध्ये होणारी महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत लांबणीवर पडली असून भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी  महिला बॉक्सिंगपटूंना आता निवड चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा टर्कीतील इस्तंबूल शहरात या वर्षी 4 ते 18 डिसेंबरदरम्यान खेळवली जाणार होती, मात्र या शहरातील …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कानपूर येथे होणार्‍या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे, …

Read More »

युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तयुनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे वार्षिक हिवाळी शिबिर दि. 7 ते 10 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथे झाले. या शिबिरात कराटे, किकबॉक्सिंग, योगा, जलतरण आदी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच परीक्षण करण्यात आले.या शिबिरात खांदा कॉलनी शाखेतील दोन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या दोनही खेळाडूंनी बेल्ट टेस्टमध्ये …

Read More »

पी. व्ही. सिंधूसह सात खेळाडू सन्मानित; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराचे वितरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (8 नोव्हेंबर) पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरित करण्यात येत आहेत. एकूण सात खेळाडूंना या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची …

Read More »

खेळाडू देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात; कपिल देव यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने सुपर-12 फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसर्‍या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. …

Read More »

न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचे आव्हान संपुष्टात

आबूधाबी : वृत्तसंस्थाट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीचा चौथा संघ निश्चित झाला आहे. अफगाणिस्तानवर मात करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. न्यूझीलंडच्या या विजयासह भारताचे ट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान देखील आता संपुष्टात आले आहे. अबूधाबीच्या स्टेडियमवर झालेल्या रविवारच्या (दि. 7) सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह …

Read More »

भारतीय खेळाडूंची स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट

दुबई : वृत्तसंस्था कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील खेळाडूंनी ट्वेन्टी-20 विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट दिली. विराट, रोहित, जसप्रीत बुमरा आणि रविचंद्रन अश्विन यांनी स्कॉटलंड संघातील खेळाडूंशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. ‘विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंनी वेळ काढून आमच्या खेळाडूंशी संवाद साधल्याबद्दल आभार,’ …

Read More »