Breaking News

क्रीडा

इंग्लंडचा बांगलादेशवर 8 गडी राखून विजय

आबुधाबी : वृत्तसंस्था इंग्लंडने बांगलादेशवर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. इंग्लंडचा सुपर 12 फेरीतील सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे उपांत्य फेरीतील आशा वाढल्या आहेत. तर बांगलादेशचा पुढचा प्रवास बिकट झाला आहे. बांगलादेशनं इंग्लंडसमोर विजयासाठी 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशनं 20 षटकात 9 गडी गमवून 124 धावा केल्या …

Read More »

नामिबियाची स्कॉटलँडवर मात

आबुधाबी : वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकपमध्ये स्कॉटलँड विरुद्धच्या सामन्यात नामिबियाने विजय मिळवला. स्कॉटलँडने नामिबियासमोर विजयासाठी 110 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान नामिबियाने 4 गडी आणि 5 चेंडू राखून पूर्ण केलं. स्कॉटलँडला कमी धावांवर रोखण्यात नामिबियाला यश आलं त्यामुळे विजय खेचून आणता आला. नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. …

Read More »

रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग निवड चाचणी

खोपोली ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने निवड चाचणी स्पर्धा नुकतीच खोपोलीतील केएमसी कॉलेज येथे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मारुती आडकर यांच्या उपस्थितीत झाली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोशन निलदे उपस्थित होते. त्याचप्रमाणे पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे गिरीश वेदक, राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित, राहुल गजरबल, अरुण पाटकर हजर होते.या निवड चाचणी स्पर्धेत श्रुती …

Read More »

अफगाणिस्तानचा दणदणीत विजय; स्कॉटलंडची शरणागती

शारजा ः वृत्तसंस्था मुजीब उर रहमान (5/20) आणि रशीद खान (4/9) या फिरकी जोडीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषकात सोमवारी झालेल्या सुपर-12 सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल 130 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव अवघ्या 60 धावांत संपुष्टात आला. तीन षटकांत बिनबाद 27 …

Read More »

मँचेस्टर युनायटेड संघ आयपीएल खेळणार

मँचेस्टर ः वृत्तसंस्था आयपीएल 2022 स्पर्धेत दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी फुटबॉलमध्ये प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मॅनचेस्टर युनायटेडने रूची दाखवली आहे. मॅनचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेजर कुटुंबीयांनी नवी फ्रेंचाइसी विकत घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. ग्लेजर कुटुंबीयांनी एका खासगी इक्विटी कंपनीच्या माध्यमातून आयपीएल संघ बनवण्याचे दस्ताऐवज विकत …

Read More »

ऑस्ट्रेलियाची द. आफ्रिकेवर मात

आबुधाबी ः वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात चाहत्यांना थरार अनुभवायला मिळाला. जोश हेझलवूडची (2/19) प्रभावी गोलंदाजी आणि मार्कस स्टोयनिसच्या (16 चेंडूंत नाबाद 24 धावा) निर्णायक फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधली. आफ्रिकेने दिलेले 119 …

Read More »

इंग्लंडकडून विंडीजचा धुव्वा

दुबई ः वृत्तसंस्था इंग्लंडच्या आदिल रशीद (4/2) आणि मोईन अली (2/17) या फिरकीपटूंच्या जोडीपुढे गतविजेत्या वेस्ट इंडिजच्या नामांकित फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीच्या सामन्यात इंग्लंडने विंडीजचा सहा गडी आणि 70 चेंडू राखून फडशा पाडला. वेस्ट इंडिजने दिलेल्या 56 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचीसुद्धा एकवेळ 4 बाद 39 …

Read More »

टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाकिस्तान आमनेसामने; उत्सुकता शिगेला

दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (दि. 24) भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर पारंपरिक संघांमध्ये लढत रंगणार आहे. या हाय होल्टेज थराराकडे उभय देशांसह जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सुपर 12मधील हा पहिला सामना आहे. त्यामुळे सलामीचा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न …

Read More »

नामिबिया सुपर 12 फेरीत; आयर्लंडवर मात

शारजा ः वृत्तसंस्था नामिबिया आयर्लंडचा आठ गडी आणि नऊ चेंडू राखून धुव्वा उडवत पहिल्याच ट्वेन्टी-20 विश्वचषकात अव्वल-12 फेरी गाठण्याचा पराक्रम केला. डावखुरा गोलंदाज जॅन फ्रॅलिंकच्या (3/21) भेदक मार्‍यामुळे आयर्लंडला 8 बाद 125 धावांपर्यंतच जेमतेम मजल मारता आली. प्रत्युत्तरात कर्णधार जेरार्ड इरास्मस आणि डेव्हिड वीज यांच्या योगदानामुळे नामिबियाने आयर्लंडने दिलेले 126 …

Read More »

डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

कोपनहेगन ः वृत्तसंस्था भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने गुरुवारी थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानविरुद्ध तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवत डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीत सिंधूने 67 मिनिटांच्या झुंजीनंतर बुसाननवर 21-16, 12-21, 21-15 असा विजय मिळवला. ऑगस्ट महिन्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या सिंधूची विश्रांतीनंतरची ही पहिलीच …

Read More »