Breaking News

क्रीडा

भारताकडून बांगलादेशचा धुव्वा

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज रायपूर : वृत्तसंस्थारोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये शुक्रवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने बांगलादेश लिजंड्सवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अनेक वर्षांनंतर सचिन तेंडलुकर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी पुन्हा मैदानात पाहायला मिळाली.बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण बांगलादेशला …

Read More »

पोलार्ड ठरला नवा ‘षटकार किंग’

सहा चेंडूंत लगावले सहा शानदार सिक्सर अँटिग्वा : वृत्तसंस्थावेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात सुरू असणार्‍या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने सहज विजय मिळवला. विंडीजकडून कायरन पोलार्डने कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत अकीला धनंजयच्या एक षटकामध्ये सहा षटकार लगावले. यासोबतच पोलार्डने हर्षल गिब्ज आणि युवराज सिंग यांच्या विक्रमाशी …

Read More »

पहिला दिवस भारताचा; इंग्लंडचे लोटांगण

अहमदाबाद : वृत्तसंस्थातिसर्‍या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी चौथ्या सामन्यातही सपशेप लोटांगण घेतले. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि आर. आश्विन यांच्या भेदक मार्‍यासमोर इंग्लंडचा संघ टिकाव धरू शकला नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ 205 धावांवरच गारद झाला. बेन स्टोक्स वगळता एकाही खेळाडूनला जम बसवता आला नाही. भारताकडून अक्षरने …

Read More »

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून निर्णायक चौथी कसोटी

अहमदाबाद : वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा व अखेरचा सामना गुरुवार (दि. 4)पासून सुरू होणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यास किंवा अनिर्णीत राखला तरी भारत मालिकेवर कब्जा करेल, तर इंग्लंडने सामना जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटेल.आघाडीचा वेगवान …

Read More »

पेण येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच परीक्षा उत्साहात

अलिबाग :प्रतिनिधीडायरेक्ट व्हॉलीबॉल  असोसिएशनची अखिल भारतीय पंच परीक्षा पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिर येथे झाली.प्रारंभी डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे पेण तालुका अध्यक्ष जगनशेठ म्हात्रे यांच्या  हस्ते सरस्वतीचे पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष पी. डी. पाटील, अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्याचे जनरल सेक्रेटरी दीपक मोकल, …

Read More »

रसायनीतील सचिन म्हशीलकरचा मॅरेथॉन स्पर्धेत ‘डबल धमाका’

सुवर्ण व रौप्यपदक जिंकले मोहोपाडा : प्रतिनिधीरिस येथील सचिन घनश्याम म्हशीलकर याने छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या 32व्या ज्युनियर वेस्ट झोन नॅशनल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मॅरेथॉन प्रकारात सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके पटकाविली. फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सचिनने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत स्वत:सह रसायनी परिसराचे नाव उज्ज्वल केले …

Read More »

सुवर्णपदक विजेत्या आर्यन पाटीलचा सत्कार

माणगाव : प्रतिनिधीछत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र व सध्या माणगावमध्ये राहणारा आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकाविले. या यशाबद्दल त्याचा अमित कॉम्प्लेक्स रहिवाशी मंडळाकडून नुकताच सत्कार करण्यात आला.आर्यन पाटील याने उंच उडी या क्रीडा प्रकारात 18 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत …

Read More »

रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली असून, देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लोकांसाठी या अंतर्गत लस देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मंगळवारी(दि. 2) कोरोना लस घेतली. याबाबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांनी माहिती दिली.’आज कोरोना लसीचा पहिला …

Read More »

मुंबई संघ बाद फेरीत

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा जयपूर : वृत्तसंस्थामुंबई संघाने हिमाचल प्रदेशचा 200 धावांनी दणदणीत पराभव करीत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली, तसेच ‘ड’ गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली.जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 321 धावांचा डोंगर उभारला …

Read More »

किंग कोहलीची मैदानाबाहेरही ‘विराट’ कामगिरी

10 कोटी इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणारा ठरला पहिला क्रिकेटर मुंबई : प्रतिनिधीभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या वेळी हा रेकॉर्ड मैदानावर नाही तर मैदानाबाहेरचा आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या 10 कोटी झाली असून, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे …

Read More »