Breaking News

क्रीडा

आयपीएलपूर्वी इशानची तुफानी फलंदाजी

चौकार, षटकारांचा वर्षाव मुंबई ः प्रतिनिधीआयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचे धडाकेबाज फलंदाज आता चांगल्या फॉर्मात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलपूर्वी होणार्‍या बीसीसीआयच्या एका स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज इशान किशनने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावरच 142 धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघानेही या वेळी आपल्या खेळाडूचे या धडाकेबाज …

Read More »

जोकोव्हिच नवव्यांदा अंतिम फेरीत

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा सिडनी : वृत्तसंस्थागतविजेता आणि अग्रमानांकित सर्बिया नोव्हाक याने रशियाच्या अस्लान करात्झेव्ह याचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या 33 वर्षीय जोकोव्हिचने कारकीर्दीत 28व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आजे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत आठ …

Read More »

अर्जुन म्हणतो, मुंबईच्या संघात सहभागी होण्यास खूपच उत्सुक

मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या 14व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केले. मुंबईने अर्जुनला त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना खरेदी केले. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाल्याने आणि मुंबईसारख्या तगड्या संघाने खरेदी केल्यानंतर अर्जुन चांगलाच आनंदात आहे.लिलावानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. …

Read More »

आयपीएल लिलावात अष्टपैलूंचे वर्चस्व

आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या खेळाडूंना प्राधान्य चेन्नई : वृत्तसंस्थाचेन्नईतील हॉटेल आयटीसी ग्रँड छोला येथे झालेल्या आयपीएल लिलावाच्या रणधुमाळीत अष्टपैलू खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना संघमालकांनी प्राधान्य दिले.दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने आयपीएलच्या 14व्या हंगामासाठीच्या लिलावप्रक्रियेत विक्रमी झेप घेतली. आजवरच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याचा मान …

Read More »

आयपीएल-14 लिलाव : ख्रिस मॉरिस महागडा खेळाडू

चेन्नई : दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. न्यूझीलंडचा काइल जेमिसन व ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन हे दोघे अनुक्रमे 15 कोटी आणि 14 कोटींना बंगळुरू आणि पंजाब संघात …

Read More »

खारघर येथे उद्या सिडको मास्टर्स कप गोल्फ स्पर्धा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवानवी मुंबईतील सिडकोच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्स या गोल्फ मैदानावर 20 फेब्रुवारी रोजी सिडको मास्टर्स कप-2021 या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध टेनिसपटू लिअ‍ॅण्डर पेस यांसह मुंबई आणि पुण्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब (बीपीसीजी), विलिंग्डन गोल्फ क्लब, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट, पुना गोल्फ क्लब, युएस …

Read More »

रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा

पाली : प्रतिनिधीरायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची कुमारी गटाची जिल्हा निवडचाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 24  फेब्रुवारी रोजी पेण तालुक्यातील मुंढाणी येथे होत आहे. जिल्ह्यातील नामवंत 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेतया स्पर्धेतून 5 ते 8 मार्च या कालावधीत जळगाव येथे होणार्‍या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेणार्‍या जिल्ह्याच्या संघाची निवड …

Read More »

नदाल, बार्टीचे आव्हान संपुष्टात

सिडनी : वृत्तसंस्थास्पेनच्या दुसर्‍या मानांकित राफेल नदालचे कारकीर्दीतील 21वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न स्टेफानोस त्सित्सिपास याने उधळून लावले. जेतेपदाचा दावेदार समजला जाणारा नदाल तसेच महिलांमध्ये अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी यांचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.सुरुवातीचे दोन सेट जिंकूनही खेळात सातत्य राखता न आल्याने नदालला पराभवाचे तोंड पाहावे …

Read More »

राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड संघाची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सिनिअर राज्यस्तरीय व सातवी सबज्युनिअर पुरुष व महिला तसेच मुले व मुली राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान जळगाव येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी रायगड संघाची घोषणा करण्यात …

Read More »

किकबॉक्सिंग स्पर्धेत ‘यूएसकेए’ अजिंक्य

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड किकबॉक्सिंग असोसिएशन आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल समाज मंदिर हॉल येथे मुंबई विभागीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल, रायगड, नवी मुंबई, वसई, पालघर, मुंबई उपनगर आदी ठिकाणाहून 350 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे …

Read More »