डॉक्टरांना थर्मासचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त – कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मासचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम भाजप शहर चिटणीस व नगरसेवक नितीन पाटील व सहकार्यांनी राबविला. या वेळी उमेश ईनामदार, भाजप पनवेल शहर सोशल मीडिया सेलचे शहर संयोजक प्रसाद …
Read More »कोरळवाडी आदिवासी उपोषणावर ठाम
पनवेल : रामप्रहर वृत्त – आदिवासी विकास विभागाच्या बैठकीनंतरही राज्य सरकारच्या कोणत्याही खात्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने काही मागण्यांसाठी कोरळवाडी आदिवासी बांधव 9 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीमधील कोरळवाडी आदिवासी वाडीत स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतरही आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रस्ता नाही …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर : कोरोना योद्धा
वैश्विक महामारी कोरोनामुळे मानवी जीवन पार बदलून गेले आहे. कोविड-19 विषाणूबद्दलची नागरिकांमधील दहशत चार महिन्यांनंतर काही प्रमाणात कमी झाली असली तरी धोका अद्याप कायम आहे. त्यामुळेच अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होऊनदेखील जनजीवन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. अशा या आपत्तीमध्ये फार कमी लोकप्रतिनिधी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी कार्यरत आहेत. …
Read More »नागोठण्यात पूरसदृश परिस्थिती
नागोठणे : प्रतिनिधी – सोमवारी रात्रीपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अंबा नदीने मंगळवारी (दि. 4) सकाळी आपले पात्र ओलांडून परिसरात पुराचे पाणी भरावयास प्रारंभ केल्याने नागोठणे शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुपारी दोनच्या सुमारास नागोठणे एसटी बसस्थानक, नागोठणे-रोहे जुना रस्ता तसेच इतर सखल भागात पुराचे शिरले होते. पावसाचा जोर असाच …
Read More »संशयाचे धुके गहिरे
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणातील गूढ वाढतच चालल्यासारखे भासते आहे. दीड महिन्याहून अधिक काळ तपास करूनही मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काहीही ठोस माहिती उजेडात आणल्याचे दिसले नाही. सीबीआय तपासाची मागणीही ठाकरे सरकारकडून सातत्याने फेटाळून लावण्यात आली. आणि आता तर त्यांनी तपासासाठी आलेल्या बिहारच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यालाच बळजबरीने क्वारंटाइन केल्याचा आरोप होतो …
Read More »पनवेल तालुक्यात 199 नवे कोरोनाग्रस्त
तिघांचा मृत्यू; 166 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 3) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 166 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 166 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 118 रुग्ण बरे …
Read More »कानसा-वारणा फाऊंडेशनकडून वृक्षलागवड; गरजूंना वस्तूंचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी – चौक वावर्ले येथील कानसा-वारणा फाऊंडेशनतर्फे राज्यातील विविध जिल्ह्यात विविध जातीच्या 4000 वृक्षाची लागवड करण्यात आली तर 2000 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन गरजूंना किराणा सामानाचे किटही वाटप करण्यात आले. संस्थापक दीपक पाटील, अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कानसा-वारणा फाऊंडेशनचे पदाधिकारी सहकारी यांच्या सहकार्याने योगेश …
Read More »विद्यार्थ्यांनी बांधल्या वृक्षांना राख्या
नवी मुंबई : प्रतिनिधी – वृक्ष ही सजीवांच्या जीवनासाठी अनमोल आहेत. परंतु सिमेंटची जंगले उभी राहत असताना वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. भावी पिढीकडून वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ नये. न्यू बॉम्बे सिटी स्कूल, घणसोलीमधील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधल्या व वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. घणसोली सेक्टर 9 मधील न्यू बॉम्बे …
Read More »अस्थिव्यंग असलेल्या टीनाने मिळवले 84 टक्के गुण
पनवेल : बातमीदार – अस्थिव्यंग असून देखील बेलवली येथील टीना दत्तात्रेय ढवळे या विद्यार्थिनीने दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश मिळवत 84.60 टक्के गुण मिळवले आहेत. दहावी नंतर पुढे सायन्समध्ये प्रवेश घेणार असल्याचे टिनाने सांगितले. टीना ढवळे ही शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील दत्तात्रेय ढवळे हे एका कोल्ड स्टोरेजमध्ये काम करतात. …
Read More »लॉकडाऊन काळात पनवेलमध्ये चार हजार 924 बाळांचा जन्म
कळंबोली : रामप्रहर वृत्त – लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या काळात पनवेल शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून उपलब्ध केल्यानंतर, येथील बाह्य रुग्णांसाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. त्यानुसार, येथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत, तर गरोदर मातांवरील उपचार, प्रसूती एमजीएम रुग्णालय कामोठे येथील रुग्णालयात केले जात आहे. त्यानुसार, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper