पनवेल : बातमीदार – ट्रकमध्ये भरलेला माल इतर कंपन्यांना पोहचवण्यासाठी दिलेला असताना त्या मालाचा अपहार केल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी आठ लाख 94 हजार दोनशे रुपयाच्या मालाचा अपहार केला आहे. बदलापूर येथील मनोहर शंकर पाटील यांचा अथर्व मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा स्टील प्रोसेसिंगचा व्यवसाय तळोजा येथे …
Read More »मंडळांचा गणेशोत्सव यंदा दीड दिवसाचा
पनवेल : बातमीदार – नवी मुंबईतील मोठ्या सार्वजनिक मंडळांनी 11 दिवसांऐवजी दीड ते पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळांनी लहान गणेशमूर्तीचे पूजन करून कृत्रिम तलावात विसर्जन करावयाचे नियोजन आखले आहे. शहरातील काही गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमावर भर दिला आहे. यात तुर्भेतील शिवछाया मित्रमंडळाने यंदा दीड …
Read More »सीकेटी महाविद्यालयात बीएमएस मेरिटाइम लॉजिस्टिक्स अभ्यासक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त – जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे देश व जगभरात व्यवस्थापन क्षेत्रातील बदलाचा वेध घेत रोजगार प्रशिक्षण आधारित पदवी मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) मेरिटाइम लॉजिस्टिक्स असे या …
Read More »मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली
नवी मुंबईकरांवर पाणीसंकट? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – जुलै महिना संपत आला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषत: नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईनंतर राज्यात …
Read More »कामोठ्यात नवीन उपकेंद्र उभारा -नगरसेवक विजय चिपळेकर
कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी कामोठ्यातील वीज पुरवठा तक्रारी संदर्भात मा. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ.(कामोठे विभाग) भिंगारी, पनवेल यांचे कार्यालयात कामोठे भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश गायकर यांचे समवेत एक निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी पहिली मागणी अशी केली …
Read More »शेअर बाजारात गुंतवणूक सुरु करावयाची आहे, त्यांच्यासाठी
शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावयाची भीती वाटते, पण ज्यांना शेअर बाजार खुणावतो आहे, त्यांना शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा फायदा घेण्याचे इतर मार्ग कोणते आहेत? त्या काही तुलनेने सुरक्षित मार्गांविषयी… अनेकांना वाटतं की, आपली कांही गुंतवणूक शेअर बाजारात देखील असावी. परंतु बाजाराबद्दल कुतूहल आणि त्याबद्दल असलेलं अज्ञान यामुळं अनेकांना शेअरबाजारात घाटा होताना …
Read More »व्याजदर कोणते कमी हवेत? ठेवींचे की कर्जाचे?
बँक ठेवींचे व्याजदर कमी होत आहेत, अशी तक्रार करण्यात येते आहे, पण ठेवी आणि कर्जाचे व्याजदर यांचा थेट संबंध लक्षात घेता ते अपरिहार्य आहे. नव्हे, ठेवी आणि कर्जाचे व्याजदर कमी होणे, हेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. जे बँकांत ठेवी ठेवतात, त्यांच्यासाठी वाईट आणि जे घरापासून सर्व कारणांसाठी कर्ज घेतात, त्यांच्यासाठी …
Read More »श्रीक्षेत्र महड येथील पथदिवे बंद
खोपोली : प्रतिनिधी – अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायकाचे मंदिर आहे. येथील मुख्य कमानीपासून मंदिरापर्यंतचे पथदिवे बंद आहेत. मंदिराच्या परिसरात मुख्य रस्त्यावर स्वागत कमान आहे. तिथूनच पथदिवे लावण्यात आलेले असून, सद्यस्थितीत ते बंद आहेत. महड हे खालापूर नगरपंचायत हद्दीत असल्याने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे, मात्र …
Read More »रान अळंबी बाजारात दाखल
माणगाव : प्रतिनिधी – पावसाळ्यात उगवणार्या रान भाज्यांपैकी खवय्यांची पसंती असलेली रान अळंबी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. भूछत्रसारख्या असलेली ही अळंबी पावसाळ्यातील ठराविक दिवसांतच उगवते. त्यामुळे या अळंबीला बाजारपेठेत चांगली मागणी असते. पावसाळ्यातील विशिष्ट दिवसांत रानात उगवणारी अळंबी रुचकर असते. त्यामुळे खवय्यांची या अळंबीला पसंती असून, अनेक जण तिची …
Read More »मुरूडमध्ये पोलिसाने केली कोरोनावर मात; सहकार्यांकडून जोरदार स्वागत
मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग तसेच प्रशासनातील विविध घटक अहोरात्र मेहनत घेत आहेत, मात्र यातील काही योद्द्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. अशाच प्रकारे मुरूड पोलीस ठाण्यातील शिपाई परेश म्हात्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पनवेलमधील कोविड केअर सेंटर तसेच मरोळ (मुंबई) येथील सेवन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper