Breaking News

Ankit Shah

कोरोनामुळे पावसाळी पर्यटनाला फटका; धबधबे पडले ओस

माणगाव ः प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदर्‍यांतील धबधब्यांचे. अनेक जण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. यंदा मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे पर्यटन बंद असल्याने व साथीच्या भीतीने ताम्हिणी घाटातील धबधबे ओस पडले असून यानिमित्ताने होणारा …

Read More »

रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव

दोन दिवसांत 40 पॉझिटिव्ह; पाच जणांची संसर्गावर मात रोहे ः प्रतिनिधी – रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. शहरासह ग्रामीण भागात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सोमवारी (दि. 13) 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. त्यामुळे रोहा तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 106वर पोहचली …

Read More »

भेंड झाड नामशेष होण्याच्या मार्गावर

मोहोपाडा : प्रतिनिधी – कौले जाऊन घरावर सिमेंटपत्रे व सुरूचे वासे लावायला सुरुवात झाल्यावर भेंड (भेंडी) हे अनेक वापरात येणारे झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भेंड हे हिरवे गार सरळसोट व अनेक फांद्यांनी बहरून तयार असलेले झाड दिसायचे. गावचा शेतकरी आपल्या बैलगाडी साठी धुरंडी म्हणून …

Read More »

गुरे चोरणार्या टोळ्यांचा उरणमध्ये सुळसुळाट; बंदोबस्त करण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात पाळीव गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रीय  झाली असून, रात्री-अपरात्री गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बेहोष करून गुरे चोरून नेली जात आहेत. पर्यायाने बळीराजाचे पशुधन संकटात येत असल्याने या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पशुधन कमी झाले आहे. मात्र …

Read More »

नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये ड्रोनद्वारे होणार सॅनिटायझर फवारणी

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिकेने कोरोनाला आळा घालण्यासाठी कंबर कासल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार पालिका येत्या काळात शहरात ड्रोनद्वारे सॅनिटायजर  फवारणी करण्याच्या विचारात आहे. सुरुवातील दाटीवाटीने वसलेल्या विभागात कंटेन्मेंट झोनमध्ये ही फवारणी करण्यात येणार असून त्यानंतर उर्वरित भागात करण्यात येणार आहे.  शनिवारी (दि.11) पालिकेने मुख्यालयाच्या आवारात ड्रोनद्वारे …

Read More »

गुरूद्वारा ट्रस्टतर्फे निर्जंतुकीकरण सेवा

पनवेल : वार्ताहर – कळंबोली गुरूद्वारा ट्रस्टतर्फे वसाहतीत शिख बांधव मोठ्या प्रमाणात जंतुनाशक व औषध फवारणी टँकरद्वारे करीत आहेत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कळंबोली गुरूद्वारा ट्रस्ट व शिख बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावावर अटकाव आणण्यासाठी व कळंबोली वसाहतीतून कोरोना समुळ नष्ट करण्याच्या उद्देशाने ते वसाहतीत ठिकठिकाणी ट्रस्टच्या …

Read More »

लांडोरची शिकार करणारे अटकेत

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या डोंगरात लांडोर पक्षाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पनवेल तालुक्यातील डोलघर येथील मुकेश पाटील (30), अजित गायकर(26), प्रेमनाथ गायकर (24), चंद्रकांत पाटील (36) या चार आरोपींना काल शुक्रवारी अटक केली आहे. उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या वरच्या भागातील डोंगरात गुरुवारी 9 जुलै रोजी रात्री …

Read More »

‘कोविड उपचाराकरिता सिडकोने पनवेल पालिकेला 100 कोटी द्यावेत’

नगरसेवक मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल : प्रतिनिधी – पनवेल उप जिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी  आय. सी. यू. कक्ष उभारणे तसेच कोविड-19 साठी उपयुक्त असे रेमडिसीपीर  इंजक्शनचे 5 हजार डोस पुरविणे किंवा पनवेल महानगरपालिकेला कोविड-19च्या साथीवर उपचार करणे करिता 100 कोटी रुपयांचे  अर्थ सहाय्य देण्याची मागणी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडकोच्या …

Read More »

पनवेलमध्येकडक लॉकडाऊन

पनवेल : रामप्रहर वृत्त – राज्यामध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत आहे. पनवेलमध्ये व्यापार्‍यांसह नागरिकांनी लॉकडाऊनचे कडक पालन केले आहे. जागो जागो शुकशुकाट पहावयास मिळत आहे. तसेच एकीकडे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर …

Read More »

नवी मुंबईत लॉकडाऊनमध्ये सात दिवसांची वाढ

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनमध्ये सात दिवसांची वाढ केली आहे. त्यानुसार 13 तारखेच्या माध्यरात्रीपासून 19 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवेत मोडणारे एपीएमसी मार्केट व एमआयडीसी सुरू राहणार आहे. गेले तीन दिवस पालिका क्षेत्रातील रुग्णस संख्येत वाढ झालेली पाहायला …

Read More »