Breaking News

Ankit Shah

घेता घेता एक दिवस…देणार्याचे हात घेणारी श्रद्धा

पनवेल : प्रतिनिधी – आपल्याला मिळालेली मदत पाहून तिचे डोळे पाणावले पण आपली गरज पूर्ण झाल्यावर घेता घेता एक दिवस…देणार्‍याचे हात घ्यावेत असे म्हणतात. आपली गरज पूर्ण झाल्यावर दुसर्‍याला मदत करण्याचा विचार करून श्रध्दा पटेल हिने आतापर्यंत 200 पेक्षा जास्त गरीबांना स्वत: मास्क शिवून मोफत दिले.  पनवेलमध्ये एका मोठ्या सोसायटीतील …

Read More »

खांदा कॉलनी पाण्याखाली गेल्यास सिडको जबाबदार -कुसुम पाटील

कळंबोली : प्रतिनिधी – खांदा काँलनीमधील पाणी वाहून नेणारा बाळोग्राम जवळील नाला सफाई करण्याचे काम यावर्षी सिडकोने काढले नसल्याने खांदा कॉलनी शहर पाण्याखाली जावून नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी सिडको प्रशासनाला जबाबदार धरण्यात येवून त्यांच्याकडून नुकसान भरपाई करण्यात यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेविका कुसुम पाटील यांनी दिली आहे. …

Read More »

मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत

नगरसेविका सुशिला घरत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – पावसाळा सुरु झाला तरीही नविन पनवेलमधील अद्याप काही ठिकाणी सिडकोने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली नाहीत, त्यामुळे ती कामे तातडीने करावीत, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशिला जगदीश घरत यांनी सिडकोकडे केली आहे. सुशिला घरत यांनी या संदर्भात यापूर्वीच निवेदन …

Read More »

खोपोलीत शेकाप कार्यकर्त्याची पक्षनेतृत्वावर तीव्र नाराजी

खोपोली : प्रतिनिधी – चार दिवसांपूर्वी सलिम शेख यांचे भाजीचे दुकान ऐन पावसाळ्यात तोडल्याने कोरोनाच्या टाळेबंद काळात माझ्यावर अन्याय झाला असल्याचा दावा करीत झालेल्या अन्यायाबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या शहरातील प्रमुख पदाधिकार्‍यांना माहिती देत न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यावेळेस कोणीही प्रतिसाद न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शेख यांनी …

Read More »

रायगडात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

पनवेल तालुक्यामध्ये 53 नवीन रुग्ण दोघांचा मृत्यू; तर 24 जण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी -पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 13) कोरोनाच्या 53 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 37 नवे रुग्ण आढळले असून 22 रूग्ण बरे झाले आहे. …

Read More »

पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांना पदक

पनवेल : रामप्रहर वृत्त – देशातील नक्षलग्रस्त आणि जोखिमच्या भागात 2015 ते 2018 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील झिंगापूर या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात प्रभारी अधिकारी म्हणून खडतर सेवा पार पाडल्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असणारे डँशिंग पोलीस उपनिरीक्षक रोहित पंडितराव बंडगर यांना केंद्र …

Read More »

नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे -संजय पाटील

पनवेल : वार्ताहर  – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये वाढला आहे. लॉकडाऊन उठविल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी न करता प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळून वागल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये होणार नाही या दृष्टीने सर्वांनी नियम पाळावे व कामोठ्यातून कोरोनाला पळवून लावावे असे आवाहन कामोठे वसाहतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील …

Read More »

पेरणीच्या हंगामाला सुरुवात

मोहोपाडा : प्रतिनिधी – पावसाचे आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या वर्षी 7 जून लाच पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीची जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी …

Read More »

अवैध 1400 लिटर गावठी दारु हस्तगत

पनवेल : वार्ताहर – अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्‍या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलने पाठलाग करून सदर गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये 1400 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचे निरिक्षक एस. एस. गोगावले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याचा फायदा घेऊन व्यापार्यांकडून लूट

पनवेल : वार्ताहर – रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग वादळामुळे नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घराच्या भिंती पडून जिवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील व्यापारी पत्रे, स्क्रु, बांधकाम साहित्य चढ्या भावाने विक्री करून नागरिकांची लुट करीत आहेत, अशा …

Read More »