खारघर : रामप्रहर वृत्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांना सेवा पुरविणार्या आस्थापनावर अतिरिक्त जबाबदारीचा भर पडला. त्यामुळे खारघर-तळोजा मंडळाचे संयोजक राजेंद्र मांजरेकर यांनी जीवाची व आरोग्याची पर्वा न करता दिवसरात्र नागरिकांची सेवा करणार्या पोलिसांना 21 दिवस चहा बिस्कीट देण्याचा संकल्प केला. तसेच मांजरेकर …
Read More »नवीन पनवेलमध्ये नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर मोठ्या रांगा
पनवेल : प्रतिनिधी : कोरोनामुळे देशात मंगळवार मध्यरात्रीपासून कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे आता अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. स्वयंपाकचा गॅस मिळणार नाही, अशा अफवा पसरल्याने नवीन पनवेलमध्ये नागरिकांनी गॅस एजन्सीच्या समोर मोठ्या रांगा लावल्या आहेत. त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा घेण्यात येत नव्हती. नवीन पनवेलमध्ये सिडको कार्यालयाच्याजवळ एचपी आणि भारत गॅस कंपनीचे वितरक …
Read More »पनवेल महापालिकेनेही थुंकणार्यांकडून दंड घेणे गरजेचे
पनवेल : प्रतिनिधी : राज्यात संचारबंदी लागू असताना देखील नागरिक बाहेर पडत असल्याने याचा परिणाम भयंकर होऊ शकतो याची जाणीव अद्याप नागरिकांना होत नसल्याने पोलिसांना आता रस्त्यावर भटकणार्यांवर चोप देण्याची वेळ आलेली आहे. या वेळी रस्त्यावर थुंकलेल्या रिक्षावाल्याला पोलिसांनी रस्ता साफ करायला लावून अद्दल घडवली. मुंबई महापालिकेप्रमाणे आता पनवेल महापालिकेनेही …
Read More »डी मार्ट बंद करा -संतोष शेट्टी
पनवेल : प्रतिनिधी : कोरोनामुळे संपूर्ण देशात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्फ्यू जाहीर केला. या वेळी मेडिकल, किराणा, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. डी मार्ट सारख्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरचा यामध्ये समावेश आहे. पण या डिपार्टमेंटल स्टोअरमुळे कोरोना संक्रमणाचा मोठा …
Read More »उरणमध्ये भाज्यांची चढ्या दराने विक्री
वस्तू महागल्या; नागरिक हैराण शासनाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी उरण : वार्ताहर : सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु याचा काही लोक फायदा घेत चढ्या दराने भाजीपाला व काही जीवनावश्यक वस्तू विकत असल्याचे उरण तालुक्यात पहावयास मिळत आहे. याची तत्काळ दखल …
Read More »पनवेलमध्ये पोलिसांकडून अन्नदान
पनवेल : बातमीदार : कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पनवेल परिसरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या कडेला बेघर असलेल्या भुकेल्या पोटासाठी पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी पुढाकार घेतला असून पनवेल परिसरातील बेघरांना अन्नदान केले. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र …
Read More »सावळ्यातील फार्म हाऊस सोसायटीमधील पाणीपुरवठा आणि वीज कोरोनामुळे कापली प्रशासन धावले मदतीला
कर्जत : बातमीदार : तालुक्यातील सावळा येथे 40 वर्षांपूर्वी फार्म हाऊस सोसायटी उभी राहिली. या फार्म हाऊसचे बहुतेक मालक सध्या तेथे राहून आहेत. कोणी अज्ञात लोकांनी या सोसायटीची वीज तोडली, त्या ठिकाणी जाणारे रस्ते बंद केले आणि तेथील पाणीपुरवठाही बंद केला होता. दरम्यान, तहसीलदार आणि पोलीस उपअधीक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन …
Read More »‘सतत प्रक्रिया उद्योग, फार्मासिटिकल कंपन्या कमी मनुष्यबळाचा वापर करून सुरू राहणार’
अलिबाग : जिमाका : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील कंपन्या सुरू राहण्याबाबतही प्रशासनाने शासन निर्देशाप्रमाणे काही निर्णय घेतलेले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह पाच सदस्यीय उद्योग समितीने राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या कोविड-19 साथीचे रोग अधिनियम 1897च्या लॉकडाऊन आदेशातील …
Read More »अपुरी झोप : गंभीर आजारास निमंत्रण
इंटरनेटच्या जमान्यात तरुण हे मोबाइलमध्ये गढलेले असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी तरुण मोबाइलवर ऑनलाइन स्ट्रिमिंगवर चित्रपट, वेबमालिका किंवा तत्सम काही पहात असतात. त्याचा मेंदूवर, डोळ्यांवर परिणाम होतोच, पण झोपेवरही परिणाम होतो. मुळात झोपच शांतपणे पूर्ण होत नाही. अपुरी झोप किंवा सात तासांपेक्षा कमी होणारी झोप ही गंभीर आजारांना आमंत्रण देणारी असते. …
Read More »‘तो’ प्रकार चुकीचा : पोलीस
नागोठणे : प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांसह विभागातील अनेक गावांमध्ये इतर ठिकाणच्या (बाहेरील) व्यक्तींना प्रवेशबंदी केली असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून रस्ते ताबडतोब खुले करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या सूचनेनुसार विशेष शाखेचे हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक यांनी केले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper