Breaking News

Ankit Shah

श्रावण सोमवारी शिवमंदिरात भाविकांची गर्दी

उरण ः वार्ताहर शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. उरण शहरातील देऊळवाडी येथील संगमेश्वर, बोरी गावातील होणेश्वर, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकेश्वर, घारापुरीतील शंकर मंदिर, उरण रेल्वेस्टेशनजवळील नीळकंठेश्वर, सोनारी गावाजवळील फदलेश्वर आदी शंकराच्या मंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवळामध्ये अभिषेक सत्यनारायण पूजा करीत असताना भक्तगण दिसत होते. …

Read More »

पालवी सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

उरण ः रामप्रहर वृत्त पालवी सामाजिक संस्थेच्या वतीने भेंडखळ येथील श्री ठाणकेश्वर मंदिर परिसर, श्री बहिरीदेव मंदिर परिसर आणि खेळाचे मैदान परिसरात 50 फळवृक्षांची लागवड करण्यात आली. उरण नगर परिषद सदस्य धनंजय कडवे यांनी नगर परिषदेच्या वतीने पालवी सामाजिक संस्थेस आंबा, फणस, पेरू, चिकू, नारळ, बदाम, आवळा आदी 50 फळझाडे …

Read More »

प्रजपिता ब्रह्माकुमारीजकडून पनवेलमध्ये वृक्षारोपण

कळंबोली ः रामप्रहर वृत्त महातपस्विनी दीदी प्रकाशमणी यांच्या 12व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रजपिता ब्रह्मकुमारी यांच्या विद्यमाने पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील हुतात्मा स्मारकात वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी (दि. 25) आयोजित करण्यात आला होता. या वेळी पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चा सरचिटणीस दर्शना भोईर, कस्टमचे …

Read More »

‘तरुणांनी नोकरी देणारे बनावे’

पनवेल ः प्रतिनिधी सीकेपी समाजातील तरुणांनी नोकरी देणारे बनण्यासाठी व्यवसायात येणे आवश्यक आहे. त्यासाठी पनवेल सीकेपी समाजाने व्यवसायिकांना समाजरत्न पुरस्कार देऊन चांगली सुरुवात केली असल्याचे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते  यांनी पनवेल येथे रविवारी (दि. 25) श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आणि सीकेपी समाजरत्न पुरस्कार सोहळ्यात बोलताना सांगितले. पनवेलच्या …

Read More »

‘हर घर जल’साठी लोकसहभागाची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ‘हर घर जल’ अशी घोषणा केली आहे. याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक करायला हवे, पण त्यांच्या या अभियानाला प्रत्येक भारतीयाने साथ द्यायला हवी, तरच हे शक्य आहे. पंतप्रधानांनी अनेक योजना आणल्या आहे. स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक बंदी अशी कितीतरी नावे घेता येतील. त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक …

Read More »

मोदींच्या हाकेला देऊ साथ

प्रतिवर्षी लक्षावधी टनांचे प्लास्टिक समुद्रात विसर्जित होते आहे. त्यातून व्हेल आणि अन्य मत्स्यजीवांचे प्राण गुदमरत आहेत. हे आशिया खंडात सर्वाधिक होते आहे असेही म्हटले गेले आहे. अर्थात जगातील सर्वाधिक एकाकी बेटापासून सर्वाधिक उंच स्विस पर्वतराजीपर्यंत सर्वत्र प्लास्टिकचे प्रदूषण आढळते आहे. इतके की, जगभरातील नळाच्या पाण्यात आणि मानवी अन्नातही आता प्लास्टिकचे …

Read More »

जलव्यवस्थापन काळाची गरज

कोल्हापूर, सांगलीत आलेल्या जलप्रलयामुळे ‘जारे जारे पावसा’ अशी आळवणी तेथील लोकांना करावी लागली. एवढी पर्जन्यवृष्टी या दोन जिल्ह्यांत झाली. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भात यंदा पुराने हाहाकार माजवला, तर दुसरीकडे मराठवाड्याचा बहुतांश प्रदेश मात्र कोरडाच राहिला. इतकेच काय तर सांगली शहरासह काही भाग पाण्याखाली गेले असताना याच जिल्ह्यातील जत, आटपाडीसारख्या तालुक्यांमध्ये …

Read More »

चिदंबरम यांचा भ्रष्टाचार आणि हिंदू आतंकवाद

काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राजकीय स्फोट झालेला नाही. महाराष्ट्राची पूरपरिस्थिती हळूहळू सावरत आहे. भूतपूर्व केंद्रीय वित्त आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक भ्रष्टाचाराच्या संशयावरून चौकशी चालू आहे. या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी गेलो की त्यांचा संबंध राष्ट्रवादाशी येतो हे समजते.आपल्याकडे राष्ट्रवादावर शास्त्रीय पद्धतीने गंभीर चर्चा न करण्याची बौद्धिक शिस्त आहे. …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांची ‘रोज बाजार’ला भेट

पनवेल : प्रतिनिधी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी पनवेलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रोज बाजाराला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्या ठिकाणी असलेले खड्डे भरून घेण्यास आणि किरकोळ दुरुस्त्या तातडीने करून घेण्यास महापालिका अधिकार्‍यांना सांगितले. पनवेल महापालिका हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रोज बाजाराला गुरुवार 22 ऑगस्ट रोजी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त जेएनपीटी महामार्गलगत कुंडेवहाळ येथे उभारण्यात येणार्‍या पनवेल तालुका दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 22) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.        या वेळी रायगड जिल्हा दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तालुका अध्यक्ष सुनील भोईर, …

Read More »