उरण : वार्ताहर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शंभर दिवस स्वस्थ (एसएचजी) परिवारानुसार पोषण अभियान कार्यक्रम उरण नगर परिषद येथे बुधवार (दि. 12) रोजी घेण्यात आला. या वेळी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधिपरिचारिका नेहा चव्हाण, आरोग्य सेवक मोहन जगताप, आरोग्य सेविका निवेदिता कोटकर, माविमच्या कविता म्हात्रे, दीनदयाळ …
Read More »साईकृपा मित्रमंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साईकृपा मित्रमंडळ खारघर यांच्या वतीने गुरुवारी शलेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आणि रायटिंग पॅड वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खारघर गाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक निधीतून चिपळे गावातील शिवशंकर मंदिर ते चिपळे स्टॉप या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे मार्गदर्शन व तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत …
Read More »कळंबोलीकरांची दुर्गंधीपासून होणार सुटका
मलनिस्सारण वाहिन्या अत्याधुनिक पद्धतीने सफाईचा सिडकोचा निर्णय कळंबोली : विकास पाटील कळंबोली वसाहतीतील मलनिस्सारण वााहिन्या सतत तुंबण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाययोजना करताना सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वाहन्या साफ करण्यासाठी हायफ्लो डिसल्डींग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत …
Read More »उरणच्या निसर्ग मित्रांचा कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात
उरण ः प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण होऊन त्यामधील बहुतांशी गावे पूरग्रस्त होऊन तेथील जनतेचे अतोनात नुकसान झाल्याने या पूरग्रस्त जनतेच्या मदतीसाठी उरण तालुक्यातील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था पुढे आली असून या पूरग्रस्तांना तातडीने जीवनावश्यक वस्तूचे वाटपही त्यांच्या मार्फत करण्यात आले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक …
Read More »एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल
उरण ः रामप्रहर वृत्त महानगरपालिका परिवहन उपक्रमास केंद्र शासनाकडून 30 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. यामधील पहिली बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली असून पुढील एक महिन्यात या बसेस प्रत्यक्ष रोडवर धावणार आहेत. महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महानगर …
Read More »आवरे येथे सार्वजनिक स्वच्छता शिबिर
उरण ः प्रतिनिधी नेहरू युवा केंद्र अलिबाग, रायगड युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार, वीर वाजेकर स्पोर्टस अॅण्ड कल्चरल अकॅडमी व महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे याच्या संयुक्त विद्यमाने रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे स्वच्छता पंधरवाडा सार्वजनिक स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. या शिबिराची सुरुवात रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील …
Read More »मुले अशी का वागतात समजून घ्या!
अभ्यासाचे टेंशन आल्याने नुकतीच एका दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. मुबईमध्ये एका पोलीस अधिकार्याच्या मुलाने काही वर्षांपूर्वी आई अभ्यास करायला सांगते म्हणून तिचा खून केला होता. शेगावच्या ऋतुजा गवईने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. मुले अशी का वागतात? याकडे पैशाच्या मागे लागलेल्या …
Read More »ये क्या जगह है दोस्तो…
खय्यामसाहेब नसलेल्या जगात अभिजात भारतीय संगीताच्या भोक्त्यांची मनोवस्था ‘ये क्या जगह है दोस्तो, ये कौनसा दयार है’ अशीच झाली असावी. ‘उमराव जान’ या अद्भुतरम्य चित्रपटाला खय्यामसाहेबांनी आपल्या स्वरचांदण्याने अक्षरश: मढवून टाकले. त्यांची ही गाणी कालातीत आहेत. हा माणूस बहुप्रसवा नव्हता. या माणसाने साठ वर्षांच्या अख्ख्या कारकिर्दीत फक्त 54च चित्रपट केले. …
Read More »चॅरिटी शोला दोन लाखांची मदत
रोटरी क्लबतर्फे रामशेठ ठाकूर यांचा सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम रातत्याने राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत या क्लबच्या माध्यमातून ‘रोटरी ऑगस्ट मेलोडीस’ या चॅरिटी शोचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 18) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper