Breaking News

Ankit Shah

‘देशाला पुरावा हवा की वीरपुत्र?’

मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल मेरठ ः वृत्तसंस्था : जमीन, आकाश आणि अवकाशात सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत चौकीदार सरकारने केली, असे सांगत एअर स्ट्राइकचा पुरावा मागणार्‍यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल केला. देशाला पुरावा हवा की वीरपुत्र, अशी विचारणा त्यांनी या वेळी केली. नरेंद्र मोदींनी मेरठ येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. …

Read More »

खालापूर तालुक्यातील अपंगांना कृत्रिम अवयव वाटप

खालापूर : प्रतिनिधी : एस. एच. केळकर आणि नॅसीहो सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने खालापूर तालुक्यातील 68 अपंग व्यक्तींना गरजेनुसार कृत्रिम अवयव आणि तीनचाकी सायकल वाटप करण्यात आले. खालापूर पंचायत समितीमध्ये दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील अपंग व्यक्तीची तपासणी व दाखले वाटप मोहीम राबविण्यात आली होती. त्यातील अतिशय गरजू व गरीब अपंग व्यक्तींना एस. …

Read More »

बैलाला नाल मारण्याच्या व्यवसायाला उतरती कळा

पाली : प्रतिनिधी : शेतात राबणार्‍या व बैलगाडी ओढणार्‍या बैलांचे पाय चालताना घसरू नये व खुरांची वाढ थांबावी यासाठी त्यांच्या पायांना नाल मारली जाते. 10-15 वर्षांपूर्वी हा नाल मारण्याचा व्यवसाय तेजीत होता, मात्र ट्रॅक्टर-टेम्पो आले, तसेच शेतकर्‍यांनी शेतीकडे  पाठ फिरविल्यामुळे आपोआप बैलांना नाल मारण्याचा व्यवसाय लोप पावू लागला आहे. मागील …

Read More »

नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे हिंदी निंबंध स्पर्धेत सुयश

मुरूड : प्रतिनिधी : हिंदी राजभाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारत सरकारचे पोत परिवहन मंत्रालय आणि दीपस्तंभ व दीपपोत निदेशालय (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान व हिंदी निंबंध लेखन स्पर्धेत यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले आहे. या सामान्य ज्ञान व …

Read More »

माथेरान जंगलात वणवा

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लहानग्यांचा पुढाकार कर्जत : बातमीदार : माथेरान पंचशील नगर परिसरातील जंगलाला सोमवारी (दि. 25) रात्री लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी येथील नागरिकांसह लहान मुलांनी पुढाकार घेऊन, शेकडो झाडे आगीच्या विळख्यात येण्यापासून वाचवली आहेत. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माथेरानच्या पंचशील नगर येथील जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना …

Read More »

अखेर ‘तो‘ सडलेला विजेचा खांब कोसळला

कर्जत : प्रतिनिधी : कर्जत नगर परिषद हद्दीतील विठ्ठलनगर परिसरातील सडलेला विजेचा खांब अखेर मंगळवारी (दि. 26) कोसळला. त्यामुळे पुन्हा एकदा वीजवितरण कंपनीचा गलथान कारभार समोर आला आहे. वीजवितरण कंपनीचे कर्जत शहरातील अनेक खांब मुळाशी सडले आहेत. हे खांब फक्त वरील वीजवाहिन्यांच्या आधारावर उभे आहेत. काही खांब रस्त्याच्या बाजूला आहेत, …

Read More »

म्हसळा शिवकृपा ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा कोबनाक यांची निवड

म्हसळा : प्रतिनिधी : तालुक्यातील शिवकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकाळ पूर्ण झाल्याने शैलेश कुमार पटेल यांनी त्यांच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संचालक मंडळातील कृष्णा कोबनाक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. …

Read More »

उरण तालुक्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियान :21 हजार टन कचर्याचे संकलन

उरण : वार्ताहर : जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून पद्मश्री  डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 24) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान  रेवदंडा -अलिबाग यांच्या वतीने उरण तालुक्यातील स्मशानभूमी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. उरण तालुक्यातील एकूण 80 गावे, वाड्या व वस्त्यांतील एकूण 95 स्मशानभूमी सदर स्वच्छता …

Read More »

रोडपालीचे युवक शिवसेनेत

पनवेल : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा झंझावात सर्वत्र पसरत असून, रोडपालीतील तरुणांनी शिवसेनेेत सोमवारी (दि.25 )जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून रोडपाली विभागामधील शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. सर्व तरुणांचे रायगड जिल्हा समन्वयक अनिल …

Read More »

प्रश्नमंजुषा, स्फूर्तिगीत स्पर्धेला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त : नववर्ष स्वागत समितीच्या वतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल शहरामध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येत असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आणि स्फूर्तिगीत स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नववर्ष स्वागत समिती गेली 25 वर्षे मराठी …

Read More »