अलिबाग : जिमाका महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (दि.1) सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अलिबागमधील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी …
Read More »लाच घेताना हवालदार जाळ्यात
पुणे ः प्रतिनिधी मोबाइल चोरी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदाराला रंगेहाथ पकडले. करीम मोहम्मद शरीफ शेख (47) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गेल्या आठवड्याभरात शहर पोलीस दलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा सापळा रचून कारवाई करीत …
Read More »अकोल्याला मागे टाकत नागपूरचा पारा 46.3 वर
नागपूर ः प्रतिनिधी उपराजधानीने आतापर्यंत तापमानात आघाडीवर असलेल्या अकोला शहराला मागे टाकले असून पारा 1.5 अंश सेल्सिअसने वाढून 46.3 वर पोहोचला आहे. या मोसमातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे. दरम्यान, हवामान खात्याने आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा दिल्याने नागपूरकरांना सूर्यनारायणाचा कोप झेलावाच लागणार आहे. उपराजधानीत विकासकामे …
Read More »राष्ट्रपती पदकविजेत्या अग्निशमन अधिकार्याचा अपघातात मृत्यू
नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रपती पदकविजेते नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे उपकेंद्रीय अधिकारी दीपक भटू गायकवाड (48) यांचा अमरावती येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते सुटी संपवून नागपूर येथे अग्निशमन विभागीय प्रशिक्षणाकरिता शिवशाही बसने हजर होत होते. बसला अमरावती येथे अपघात झाल्याने त्यात गायकवाड …
Read More »महाराष्ट्र थोर राष्ट्रनेत्यांच्या विचारांचे राज्य; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; राज्य स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर राष्ट्रनेत्यांचा वारसा असून आपले राज्य हे या विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे. त्यामुळेच राज्याने विविध क्षेत्रांत प्रगती करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री …
Read More »क्लासला गेलेली दोन मुले बेपत्ता
पनवेल : बातमीदार कळंबोली येथील क्लास सुटल्यावर बाहेर पडत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने दोन मुलांचे अपहरण केले आहे. अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीच्या क्लासला गेलेला 16 वर्षीय अभिषेक बाळासाहेब राखुंडे व दुसरा 14 वर्षीय अभय सुरेंद्र पांडे क्लासला गेले होते, मात्र ते घरी परत न आल्याने पालकांनी …
Read More »मुकी जनावरेही शोधताहेत पाण्याचा आसरा; प्रचंड उकाडा
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्याने मुकी जनावरेही त्रस्त झाली आहेत. उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळावा यासाठी गुरे पाण्याचा आसरा घेताना दिसत आहेत. मुके प्राणी पाण्यात राहून आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. पाताळगंगेच्या पात्रात गाई-म्हशी ठाण मांडत आहेत. उन्हाचा …
Read More »रसायनी परिसरात शांततेत मतदान
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी परिसरात शांततेत मतदान झाले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अंदाजे 55 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पाड पडावी यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद …
Read More »मतदान झाले, आता दीर्घ प्रतीक्षा! मावळमधील निकालाच्या अंदाजाबाबत सर्वत्र चर्चा
उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) मतदान झाले. या मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी उभे असताना खरी लढत मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे अशीच आहे. त्यामुळे मावळचा राजकीय मावळा कोण याकडे मतदारसंघातील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे …
Read More »पनवेलचे सखी मतदान केंद्र, सेल्फी पॉइंट लय भारी
पनवेल : नितीन देशमुख निवडणूक मग ती कोणतीही असो मतदानासाठी कोणत्याही मतदान केंद्रात प्रवेश करताच दरवाज्यावर पोलीस आणि आत चेहर्यावर खूप टेन्शन असलेले निवडणूक कर्मचारी, राजकीय पक्षांचे पोलिंग एजंट आणि बाहेर मतदारांची रांग हे नेहमीचे दृश्य, पण या वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper