Breaking News

Ramprahar News Team

कर्जत एसटी आगारातील कर्मचार्‍यांचे उपोषण

कर्जत : बातमीदार एसटीच्या कर्जत आगारातील आठ कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने बदलीच्या ठिकाणी सोडले जात नाही. त्यामुळे या कामगारांनी बुधवार (दि. 1) पासून बेमुदत उपोषण सुरू केले. एसटी आगराबाहेर सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांची ठाणे येथील कामगार अधिकार्‍यांनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली, मात्र सर्व …

Read More »

अलिबाग-रोहा रस्ता होणार सुसाट; चौपदरीकरणास शासनाची मंजुरी

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग – रोहा रस्ता आता सुसाट होणार आहे. राज्य शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकणास मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर पोयनाड – नोगोठणे रस्त्याच्या कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे. या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या असून लवकरच कामांना सुरुवात होईल, अशी माहिती भाजपचे अलिबाग – मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष …

Read More »

महाडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा

महाड : प्रतिनिधी विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाने बुधवारी महाडमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यांत आला. महाराष्ट्र दिनानिमित्त महाडमधील चांदे क्रिडांगणावर आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी  पोलिसांतर्फे मानवंदना देण्यांत आली. या कार्यक्रमाला उप विभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, उप विभागीय पोलीस अधिकारी पाटील,  तहसिलदार इंद्रसेन पवार, नायब …

Read More »

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये झेंडावंदन

कर्जत : बातमीदार महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त बुधवारी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच जान्हवी साळुंखे यांचे हस्ते झेंडा फडकविण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सरपंच सुवर्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य केतन पोतदार, अर्चना भालेराव, मीना पवार, अश्विनी पारधी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडदे, माजी उपसरपंच सुमन लोंगले, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय मनवे, जयवंत …

Read More »

राज्य स्थापनेचा वर्धापन दिन कर्जतमध्ये उत्साहात साजरा

कर्जत : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन कर्जतमध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ झाला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, प्रांत अधिकारी वैशाली परदेशी – ठाकूर, तहसीलदार अविनाश कोष्टी, पोलीस उप विभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, जिल्हा परिषद सदस्या अनुसया पादिर, पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, …

Read More »

पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा गौरव

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर  ज्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक पदक, अंतरिक सुरक्षा पदक तसेच विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहेत, त्यांना पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी …

Read More »

रायगड जिल्ह्यात जय जय महाराष्ट्र माझा ; विविध जाती धर्माच्या लोकांनी सांस्कृतिक परंपरा जोपासली -पालकमंत्री चव्हाण अलिबागच्या पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण

अलिबाग :  जिमाका महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (दि.1) सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अलिबागमधील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण करण्यात आले.  या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी …

Read More »

लाच घेताना हवालदार जाळ्यात

पुणे ः प्रतिनिधी मोबाइल चोरी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदाराला रंगेहाथ पकडले. करीम मोहम्मद शरीफ शेख (47) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गेल्या आठवड्याभरात शहर पोलीस दलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा सापळा रचून कारवाई करीत …

Read More »

अकोल्याला मागे टाकत नागपूरचा पारा 46.3 वर

नागपूर ः प्रतिनिधी उपराजधानीने आतापर्यंत तापमानात आघाडीवर असलेल्या अकोला शहराला मागे टाकले असून पारा 1.5 अंश सेल्सिअसने वाढून 46.3 वर पोहोचला आहे. या मोसमातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे. दरम्यान, हवामान खात्याने आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा दिल्याने नागपूरकरांना सूर्यनारायणाचा कोप झेलावाच लागणार आहे. उपराजधानीत विकासकामे …

Read More »

राष्ट्रपती पदकविजेत्या अग्निशमन अधिकार्याचा अपघातात मृत्यू

नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रपती पदकविजेते नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे उपकेंद्रीय अधिकारी दीपक भटू गायकवाड (48) यांचा अमरावती येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते सुटी संपवून नागपूर येथे अग्निशमन विभागीय प्रशिक्षणाकरिता शिवशाही बसने हजर होत होते. बसला अमरावती येथे अपघात झाल्याने त्यात गायकवाड …

Read More »