Breaking News

Ramprahar News Team

ड्रॅगनच्या कुरापती

चीनी वर्चस्ववाद आणि विस्तारवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पायबंद घातला हे विरोधकांनाही मान्य करावे लागेल. चीनच्या डरकाळ्यांना भीक न घालता गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना ठणकावले. त्यानंतर आता अधिक सावध राहिले पाहिजे. अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती गावात जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चीनला खणखणीत शब्दांत खडसावल्यानंतर …

Read More »

अधिकारी, कंत्राटदाराला धरले धारेवर

रस्त्याचे काम निकृष्ट ; ग्रामस्थांचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना साकडे सुधागड : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत असलेल्या नांदगाव ते गोमाशी रस्त्याचे काम अतिशय दर्जाहिन होत असल्याची तक्रार गोमाशी ग्रामस्थांनी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि.11) धैर्यशील पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन …

Read More »

ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर

रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरातील स्थिती; नवीन बांधकामे सुरुच; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष रेवदंडा : प्रतिनिधी स्थानिकांच्या जमीनी खरेदी करून काही स्थानिक मंडळी व धनदांडगे रेवदंडा आगरकोट किल्ल्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण क्षेत्रात प्रतिबंध व निर्बंधीत क्षेत्राचे उल्लघंन करून नियमबाह्य नवीन बांधकामे ऐतिहासिक अवशेष व वास्तूची तोडफोड करीत करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केंद्रीय …

Read More »

महड परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

पोल्ट्रीतील शिल्लक कचर्‍याची विल्हेवाट खोपोली ः प्रतिनिधी महड अष्टविनायक तीर्थक्षेञ परिसराचे पावित्र्यला धक्का लावण्याचे उद्योग काही जणांकडून सुरू असून, पोल्ट्रीमधील शिल्लक कचरा गोणी भरून उघड्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे तीन ते चार किमी परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महड नदिकिनारी बेकायदेशीरपणे मेलेल्या कोंबड्याची विल्हेवाट लावण्यासाठी …

Read More »

बदलती समीकरणे

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस यांचा राष्ट्रीय दर्जा तांत्रिक मुद्यावर रद्द झाला, परंतु त्याचवेळी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अवघ्या 11 वर्षांत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला ही बाब लक्षणीय मानायला हवी. देशातील समीकरणे बदलत चालली आहेत याचेच हे द्योतक आहे. भारतीय मतदार आपल्या जुन्या धारणा टाकून देऊन नवीन निवड करतो …

Read More »

चिखलेच्या उपसरपंचपदी भाजपच्या निकिता पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या निकिता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच निकिता पाटील यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. चिखले ग्रामपंचायतीच्या …

Read More »

पनवेलमध्ये झाडांच्या फाद्यांची छाटणी सुरू

महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांना वेग पनवेल : वार्ताहर पावसाळापूर्व कामांतर्गत धोकादायक झाडे तसेच झाडांच्या फांद्या छाटणीचे काम महापालिकेने सुरू केले आहे. सद्या खारघरमधील सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा आणणारी तसेच मोडकळीस आलेली झाडे आणि झाडांच्या फांद्या छाटणीचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले आहे. टप्याटप्याने पालिका हद्दीतील पनवेल, कामोठे, कळंबोली या सर्व नोडमधील …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये कार्यक्रमांना प्रतिसाद पनवेल ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 9) पनवेलमध्ये या यात्रेच्या समारोपावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर चौकात केले. पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात पुष्पवृष्टी …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल परिसरात भाजप-शिवसेना युतीतर्फे रविवारी (दि. 9) स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर मोटरसायकलवर स्वार होऊन सहभागी झाले होते. या गौरव यात्रेच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयजयकाराने पनवेल परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यवीर विनायक …

Read More »

सावळेतील शेकाप युवा कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासाची विचारधारा तसेच भाजप जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन रसायनी विभागातील सावळे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी …

Read More »