Breaking News

Ramprahar News Team

रेल्वेस्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अधिवेशनात आमदार महेश बालदी यांचे

धुतूम ग्रामस्थांकडून आभार उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील द्रोणागिरी, न्हावा शेवा आणि रांजणपाडा या चूकीच्या रेल्वे स्थानकातील नावात दुरुस्ती करून बोकडविरा, नवघर आणि धुतूम अशा मुळ गावाच्या नावावरून रेल्वे स्थानक म्हणून नामकरण करण्यात यावे यासाठी राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उरणचे आमदार महेश बालदी यांनी प्रश्न उपस्थित करून नामकरणासाठी आंदोलन उभारणार्‍या …

Read More »

अजिवली येथील शाळेला बेंचचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील अजिवली येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरासाठी बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. दशरथ म्हात्रे यांच्या आई कैलासवासी दुनकुरीबाई बाळू म्हात्रे यांच्या दुसर्‍या स्मरणार्थ त्यांनी …

Read More »

पनवेलमध्ये स्त्री सक्षमीकरणाला प्राधान्य

महिला आर्थिक विकास महामंडळ, पालिकेतर्फे तेजस्विनी उद्योग प्रदर्शन व विक्री पनवेल : वार्ताहर महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पनवेल महापालिका दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी उद्योग प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 24)गुजराती मैदानावरती करण्यात आले आहे. 24, 25, 26 मार्च तीन …

Read More »

विक्रीकरीता आणलेले अडीच हजार किलो गोमांस जप्त; आरोपी फरार

पनवेल : वार्ताहर महिंद्रा बोलेरो पिकप टेम्पोतून गाय बैल व म्हैस यांची कत्तल करून सुमारे अडीच हजार किलो मांस विक्री करण्याकरता ताब्यात बाळगल्या प्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर भाताण बोगदाच्या जवळ एक बोलेरो पिकप थांबली असून त्यातून लाल पाणी सोडत असल्याचे माहिती …

Read More »

तरुणीला जबरदस्तीने दारू पाजून ठेवले शारीरिक संबंध

ज्येष्ठ नागरिकाविरोधात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने एस टी प्रवासादरम्यान 26 वर्षीय तरुणीशी मैत्री करून त्यांनतर तिची ओळख वाढवून तिला पनवेलला फिरायला जाऊ असे सांगून पनवेलमधील एका हॉटेलमध्ये आणून त्यांनतर जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मोबाईल चित्रीकरण केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिसांकडे तरुणीने …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीतून माल चोरी केल्याप्रकरणी त्रिकुटाला अटक

पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील फेरोनिओबियम स्टोअरमधून  जवळ जवळ 6 लाखाचा फेरोनिओबियम धातू चोरी केल्याप्रकणी वडखळ पोलिसानी तिघांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी कि, सोमवार 20 मार्च सायंकाळी 7: 56 ते मंगळवार 21 मार्च सायंकाळी 7: 56 दरम्यान जे.एस.डब्ल्यु स्टील कंपनी डोलवी येथे फेरोनिओबियम स्टोअर मधून आरोपी नं. …

Read More »

केंद्र शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा -अश्विनी पाटील

खोपोली : प्रतिनिधी भाजप कार्यकर्त्यांनी बूथ सशक्तिकरण अभियान प्रभावीपणे राबवावे तसेच या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी, केंद्र शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती जनसामान्यांना द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले. भारतीय जनता पक्षाच्या बूथ सशक्तिकरण …

Read More »

मत्स्यदुष्काळामुळे बाजारात शुकशुकाट

मुरूडमध्ये होड्या किनारी विसावल्या; व्यावसायिक, खवय्यांना मासळीची प्रतीक्षा मुरुड : प्रतिनिधी मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे दर शनिवार, रविवार पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांना आवडणारे मासे मात्र महाग झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचीसुद्धा नाराजी वाढली आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून मासळी मिळण्याचे प्रमाण घटल्याने मासळी मार्केटमध्ये मासळी कमी येऊ लागली आहे. त्यामुळे …

Read More »

उतारवयातील शिक्षक कुटुंबांना फटका

बदली धोरण प्रक्रिया : दुसर्‍या तालुक्यात अतिदुर्गम शाळेत काम करण्याची नामुष्की मुरुड : प्रतिनिधी 2022 या शैक्षणिक वर्षातील शिक्षकांच्या बदल्या तब्बल एक वर्ष विलंबाने 2023च्या शैक्षणिक वर्षात होत आहेत.  त्यामुळे 53 वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या कित्येक शिक्षकांना या वयात आपला तालुका सोडून दुसर्‍या तालुक्यात अतिदुर्गम शाळेत काम करण्याची नामुष्की ओढवली आहे. …

Read More »

गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

टोळीने लाखो लुबाडले; पोलिसांकडून शोध सुरू पनवेल ः वार्ताहर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून त्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून एका टोळीने कामोठे येथील नागरिकाची एक लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे येथील बाळासाहेब दुरगुडे हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावरून एलआयसीच्या हप्त्याचे पैसे भरत …

Read More »